Heart Tips: हृदय रोगाला ठेवायचे असेल दूर तर फॉलो करा हे आठ टिप्स

भारतात हृदयरोग झपाट्याने जाळे पसरवीत आहे. खराब जीवनशैली यासाठी जबाबदार आहे. हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी काही टिप्स जाणून घेऊया.

Heart Tips: हृदय रोगाला ठेवायचे असेल दूर तर फॉलो करा हे आठ टिप्स
हृदय रोगापासून दूर राहण्यासाठी Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 09, 2022 | 1:33 PM

मुंबई, आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांच्या खाण्याच्या चुकीच्या सवयी त्यांना हृदयविकाराच्या (Heart attack) समीप नेत आहेत. भारतात येत्या 10 वर्षात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण सुमारे 75 टक्क्यांनी वाढले आहे असा धक्कादायक इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा भाग आहे. या वर संपूर्ण शरीर सुरळीत चालवण्याची जबाबदारी आहे. पण कळत-नकळत आपण रोज छोट्या छोट्या चुकांनी त्याच्या आरोग्याशी खेळतो. आपण सर्वजण आपल्या दैनंदिन जीवनात अशा अनेक गोष्टी खातो ज्या आपल्यासाठी हानिकारक असतात. अशा आठ गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे हृदयविकाराला दूर ठेवण्यास मदत होते (Tips to Keep Heart Healthy).

 आहाराला नियंत्रित करा

तुम्ही किती खात आहात हे जितके महत्त्वाचे आहे तितकेच तुम्ही काय खात आहातहे देखील महत्त्वाचे आहे. तुम्ही जर आधीच ताटभर जेवण वाढून घेतले तर स्वाभाविकपणे ते तुम्हाला संपवावेच लागेल. यामुळे शरीरात कॅलरीजचे प्रमाण वाढेल. रेस्टॉरंटमध्ये दिले जाणारे अन्न सामान्यतः व्यक्तीच्या गरजेपेक्षा जास्त असते. अशा परिस्थितीत, आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

 कमी कॅलरी आहार घ्या

प्रक्रिया केलेले किंवा फास्ट फूड यासारख्या उच्च उष्मांक आणि सोडियमयुक्त पदार्थांचे अतिसेवन हृदयासाठी हानिकारक आहे. हे लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकारासह अनेक रोगांना आमंत्रण देते. तुम्हालाही या आजारांना  दूर ठेवायचे असेल,या गोष्टींचे सेवन टाळा.

हे सुद्धा वाचा

 ताटात भाज्या आणि फळांना प्राधान्य द्या

भाज्या आणि फळे हे शरीरासाठी जीवनसत्त्वे आणि खनिजांचे चांगले स्रोत आहेत. भाज्या आणि फळांमध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असतात. भाजीपाला, फळे आणि वनस्पतीजन्य पदार्थ हृदयविकार टाळण्यास मदत करतात.

आहारात कडधान्यांचा समावेश करा

संपूर्ण धान्यांमध्ये फायबर आणि अनेक पोषक घटक आढळतात, ज्यामुळे रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. जर तुम्ही तुमच्या आहारात प्रक्रिया केलेल्या अन्नाऐवजी कड धान्याचा समावेश केला तर ते तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले राहील आणि भविष्यात हृदयविकाराच्या जोखमीपासूनही तुम्ही दूर राहाल

फॅटयुक्त पदार्थाचे सेवन टाळा

तुम्ही जितके कमी सॅच्युरेटेड फॅट वापरता  तुम्हाला कोलेस्टेरॉल, मधुमेह आणि हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता कमी असते. उच्च कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक तयार करते, ज्यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

 कमी प्रथिनेयुक्त पदार्थांशी मैत्री करा

चिकन, मासे, अंडी, कमी चरबीयुक्त घटक आणि दुग्धजन्य पदार्थ हे प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत आहेत. निरोगी प्रथिने मिळविण्यासाठी, तुम्ही तळलेले चिकन पॅटीजऐवजी बेक केलेले किंवा ग्रील्ड चिकन खाऊ शकता आणि फुल क्रीम दुधाऐवजी स्किम्ड दूध वापरू शकता.

बिया देखील आहे फायदेशीर

सर्व प्रकारच्या बिया, सोयाबीन, मटर आणि कडधान्यांमध्येही भरपूर प्रथिने आढळतात. त्यामध्ये चरबीचे प्रमाण खूप कमी असते आणि त्यात कोलेस्टेरॉल वाढवणाऱ्या गोष्टी अजिबात नसतात, त्यामुळे ते उच्च चरबीयुक्त प्रथिनांसाठी एक चांगला पर्याय आहेत. प्राण्यांच्या सर्वोत्तम प्रथिनांच्या ऐवजी, तुम्ही तुमच्या आहारात वनस्पती-आधारित प्रथिनांचा समावेश करून तुमचे हृदय निरोगी ठेऊ शकता.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.