गरमीमुळे पुण्यात कांजिण्या, कंजंक्टिव्हायटिसच्या रुग्णांमध्ये झाली वाढ, डॉक्टरांकडून काळजी घेण्याचा सल्ला
वाढत्या उन्हाळ्यामुळे पुण्यात आजार वाढत असून कांजिण्या, तसेच कंजंक्टिव्हायटिसच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
पुणे : उन्हाळ्यातील वाढत्या उष्णतेमुळे( heat) डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह म्हणजेच कंजंक्टिव्हायटिस (conjunctivitis) आणि चिकनपॉक्सची (chicknepox) प्रकरणे वाढत आहेत. कंजंक्टिव्हायटिसच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याची (cases are increasing) पुष्टी करताना, अपोलो क्लिनिकचे नेत्रचिकित्सक डॉ. राकेश गौड यांनी गुरुवारी सांगितले, “आम्ही दररोज सरासरी 10 कंजक्टिव्हायटिसची प्रकरणे हाताळतो. मात्र आता ही संख्या आता दुप्पट झाली आहे.
कंजंक्टिव्हायटिस किंवा गुलाबी डोळे, हे डोळ्यातील बुबुळांच्या बाह्य भागाचा व पापणीच्या आतील भागाच दाह झाल्यामुळे होणारा त्रास आहे. उन्हाळ्यातील वाढत्या उष्णतेव्यतिरिक्त, ॲडेनोव्हायरस हा डोळ्यांच्या संसर्गाच्या वाढीचा प्रमुख घटक आहे,” असे डॉ गौड म्हणाले.
नेत्रचिकित्सक संजय पाटील म्हणाले की, उन्हाळ्यात उष्णतेमुळे डोळे कोरडे होतात, परिणामी संसर्ग होतो. “याशिवाय, परागकणांची ॲलर्जी आणि प्राण्यांच्या डोक्यातील कोंड्यामुळे ॲलर्जीक कंजंक्टिव्हायटिस होण्याची शक्यता वाढते. अशा प्रकरणांवर स्थानिक अँटीहिस्टामाइन आय ड्रॉप्सने उपचार केले जाऊ शकतात.”
ते म्हणाले की संसर्ग कमी करण्यासाठी जिवाणूंमुळे कंजंक्टिव्हायटिस झालेल्या रुग्णांसाठी अँटीबायोटिक आय ड्रॉप्स वापरण्याची शिफारस केली जाते. “संसर्ग टाळण्यासाठी डोळ्यांची स्वच्छता राखली पाहिजे. तसेच एखाद्या व्यक्तीला हा संसर्ग झाला असेल तर इतर लोकांना त्या व्यक्तीचे कपडे किंवा टॉवेल वापरणे टाळले पाहिजे. अतिनील किरण आणि धुळीपासून संरक्षणासाठी दिवसा बाहेर पडणाऱ्या लोकांना सनग्लासेस वापरण्याचा सल्ला दिला जातो.
चिकनपॉक्स म्हणजे कांजण्यांच्या प्रकरणांमध्येही वाढ होताना दिसत आहे. या संदर्भात डॉ. प्रकाश महाज म्हणाले, “कांजण्यांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने पाच वर्षांखालील मुलांमध्ये होत असला तरी, या उन्हाळ्यात आम्ही किशोरवयीन मुलांमध्येही हा संसर्ग पाहत आहोत. हे इतर संसर्गग्रस्तांच्या जवळ गेल्यामुळेही असू शकते”, असे डॉक्टरांनी नमूद केले.
ससून जनरल हॉस्पिटलच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. आरती किणीकर म्हणाल्या, “आम्ही हॉस्पिटलमध्ये कांजण्यांच्या रुग्णांची संख्या वाढताना पाहत आहोत. हा हंगामी संसर्ग आहे आणि उन्हाळ्यात वाढतो. चिकनपॉक्स हा व्हेरिसेला-झोस्टर विषाणूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य रोग आहे.