Heatwave in India: अतिउष्णता वाढते आहे काळजी घ्या; ज्येष्ठांनी बाहेर पडताना ही घ्या काळजी
उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेची लाट 2 मेपर्यंत कायम राहणार आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यात संपूर्ण भारताचे सरासरी तापमान 35.05 अंश होते, हे तापमान 122 वर्षांतील चौथ्या क्रमांकाचे उच्चांकी तापमान आहे.
मुंबईः देशात सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात तापमान वाढत (Rise In temperature) आहे, त्यामुळे उष्णतेची वाढती लाट लक्षात घेऊन केंद्राकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आवश्यक ती औषधे आणि सर्व आवश्यक उपकरणांच्या पुरेशा उपलब्धतेसाठी त्यांच्या आरोग्य सुविधांच्या तयारीचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासही सांगितले आहे. शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले आहे की, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेची लाट 2 मेपर्यंत कायम राहणार आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यात संपूर्ण भारताचे सरासरी तापमान 35.05 अंश होते, हे तापमान 122 वर्षांतील चौथ्या क्रमांकाचे उच्चांकी तापमान आहे.
वाढत्या तापमानाचा अनेकांना फटका
दिल्लीच्या बिर्ला रुग्णालयातील औषध विभागाच्या प्रमुख डॉ. राजीव गुप्ता यांनी सांगितले की, वाढत्या तापमानामुळे अनेकांना याचा फटका बसत आहे, विशेषत: ज्यांना हायपरथायरॉईडीझम (Hyperthyroidism) आणि मधुमेह (Diabetes) आहे. त्यांना उन्हाळ्याच्या महिन्यांत त्रास होणार आहे.
तापमानात प्रचंड वाढ
डॉ. गुप्ता यांनी सांगितले की, “हायपरथायरॉईडीझमचा त्रास असलेल्या लोकांचे शरीरातील तापमान वाढत असते. त्यामुळे शरीरात धडधडणे, घाम येणे आणि गरम वाटणे यासारखा त्रास होत असतो. गेल्या काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ होत असून त्याचा त्यामुळे लोकांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जर एखाद्या वृद्ध व्यक्तीला हायपरथायरॉईडीझमचा त्रास असेल तर त्यांनी घरात राहणेच चांगले आहे.”
ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या
सर्वोदय हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे वरिष्ठ सल्लागार डॉ. सुमित अग्रवाल यांनी सांगितले की उष्णतेमुळे चयापचय दरामध्ये असंतुलन निर्माण होते. “याचा अर्थ असा आहे की ते अतिसार, उष्माघात, ताप, विषमज्वर, सर्दी आणि खोकला यांसारख्या आरोग्याशी संबंधित समस्य निर्माण होतात. साधारणत: अशा वाढत्या तापमानामध्ये वृद्धांनी घरामध्येच थांबावे, पण जर त्यांना बाहेर जावे लागले तर त्यांना तरुणांपेक्षा जास्त धोका असतो.
जास्त पाणी प्या
तज्ज्ञांच्या मते या ऋतूत ज्येष्ठांनी घरचे ताजे अन्नच खाणे चांगले राहणार आहे. त्याचबरोबर जास्त पाणी पिणे, जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही.
या ऋतुत अधिक धोका
जे रुग्ण अंथरुणावर पडलेले आहेत, त्यांना या ऋतुत अधिक धोका असल्याचे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले. या लोकांना भूक कमी लागते त्यामुळे ते पाणी कमी पितात. याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
छोटासा आजारदेखील मोठी समस्या
डॉ. अग्रवाल यांनी सांगितले आहे की, जी ज्येष्ठ मंडळी एसीमध्ये राहतात, आणि बाहेर जाताना कारमधील एसीचा वापर करतात, त्यांनी हे जाणले पाहिजे की, दोन्ही एसीच्या वातावरणात बदल असतो. त्यामुळे फरक पडत असतो, त्यामुळे तापमानात बदल झाला की, खोकला, सर्दी आणि विषाणूजन्य या सामान्य समस्या निर्माण होतात. वृद्धांसाठी, त्यांच्यामुळे होणारा एक छोटासा आजार देखील मोठी समस्या बनू शकतो.