Health : खराब हवामानामुळे साथीच्या आजारांपासून वाचण्यासाठी या 4 गोष्टी ठेवा लक्षात, जाणून घ्या
Health : जर एकाच कुटुंबातील एका व्यक्तीला ताप आला तर त्याच्यामुळे कुटुंबातील इतर लोकांना देखील ताप येऊ शकतो. तर आता आपण हा व्हायरल ताप कसा टाळता येऊ शकतो किंवा काय काळजी घेऊ शकतो याबाबत जाणून घेणार आहोत.
मुंबई : सध्या राज्यभरात बदलते वातावरण दिसत आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस पडतो तर काही भागांमध्ये कडक ऊन अशा बदलत्या वातावरणामुळे वेगवेगळे आजार निर्माण होताना दिसत आहेत. मुसळधार पाऊस पडला तर पाणी साचल्यामुळे डेंग्यू, खोकला, सर्दी अशा आजारांना निमंत्रण मिळत आहे. बदलत्या वातावरणामध्ये विषाणूजन्य ताप मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत आहे. विषाणूजन्य ताप म्हटलं की एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतोच.
मास्कचा वापर करा – बदलत्या वातावरणामध्ये स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यात आपण गर्दीच्या ठिकाणी गेलो तर आपल्याला व्हायरल ताप येण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असते. कारण एकापासून दुसऱ्याला संसर्ग होऊ शकतो. अशावेळी स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. कारण गर्दीच्या ठिकाणी गेलं तर कोणी ना कोणी शिंकतं, खोकतं त्याच्यामुळे आपल्यालाही त्रास होऊ शकतो. तर अशावेळी मास्कचा वापर तुम्ही करा आणि बाहेरून आल्यानंतर हात -पाय स्वच्छ धुवा. जेणेकरून तुम्ही बाहेर कुठेही स्पर्श केलेला असेल तेथील जंतू तुमच्या शरीरात जाणार नाहीत. त्यामुळे शरीराची स्वच्छता ठेवा आणि गर्दीत गेल्यानंतर मास्कचा वापर करा.
बाहेरचे पदार्थ खाणं टाळा – बहुतेक लोकांना बाहेरचे पदार्थ खायला मोठ्या प्रमाणात आवडतं. पण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेरचे पदार्थ खाऊ नये. कारण तुम्ही बाहेर कोणतेही पदार्थ खात असाल किंवा पीत असाल यावेळी तुम्हाला सहज संसर्ग होऊ शकतो आणि विषाणूजन्य ताप येऊ शकतो. त्यामुळे बाहेरचे पदार्थ खाणं टाळा आणि घरचे पौष्टिक, गरम अन्न खा तसेच गरम पाणी प्या यामुळे तुमचे व्हायरल तापापासून संरक्षण होईल.
आजारी रूग्णापासून लांब रहा – तुम्ही जर तुमच्या जवळच्या आजारी व्यक्तीच्या संपर्कात असाल तर त्याच्यापासून थोडं अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण त्या आजारी व्यक्तीपासून तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता असते आणि तुम्हाला व्हायरल ताप देखील येण्याची शक्यता असते. तुम्ही जर आजारी व्यक्तीच्या संपर्कात राहिला तर तुम्हाला लगेच वायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशावेळी आजारी व्यक्तीपासून अंतर ठेवणं खूप गरजेचं आहे. आजारी व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमी असते त्यामुळे त्यांच्यापासून आपल्याला विषाणूजन्य संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे जास्तीत जास्त त्या व्यक्तीपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा.