Cholesterol problem In Children: मुलांमध्येही वाढतेय कोलेस्ट्रॉलची समस्या, या उपायांनी ठेवा नियंत्रण

ज्या मुलांमध्ये एलडीएलचे प्रमाण जास्त असते त्यांना कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांचा धोका अधिक असतो.

Cholesterol problem In Children: मुलांमध्येही वाढतेय कोलेस्ट्रॉलची समस्या, या उपायांनी ठेवा नियंत्रण
Follow us
| Updated on: Dec 10, 2022 | 5:16 PM

नवी दिल्ली – हाय कोलेस्ट्रॉलच्या (high cholesterol )समस्येने केवळ मोठ्या व्यक्तींनाच त्रास होत नाही. लहान मुलांमध्येही कोलेस्ट्रॉल (cholesterol problem in kids) वाढण्याची समस्या असू शकते. लहानपणी हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर वाढत्या वयात आरोग्यासंदर्भातला धोकाही वाढतो. कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त वाढल्यामुळे हृदय आणि शरीराच्या इतर भागांना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये प्लाक जमा होऊ लागते. या प्लाकमुळे धमन्या आकुंचन पावू लागतात, ज्यामुळे हृदयापर्यंत सुरळीतपणे रक्तपुरवठा होत नाही. या सर्व स्थितीमुळे हृदयासंबंधित आजार व समस्या वाढू शकतात. कोलेस्ट्रॉललमुळे स्ट्रोक (stroke) येण्याचा धोकाही खूप वाढतो.

अनुवांशिकता, आहार आणि लठ्ठपणा ही लहान मुलांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याची प्रमुख कारणे आहेत. बहुतांश प्रकरणात ज्या आई-वडिलांना हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास असतो, त्यांच्या मुलांमध्येही हा त्रास आढळून येतो. मुलांचे हाय कोलेस्ट्रॉलपासून संरक्षण करण्यासाठी व त्यावर उपचार करण्यासाठी लाईफस्टाइलमध्ये बदल करणे आवश्यक आहे.

अशी ओळखा मुलांमधील हाय कोलेस्ट्रॉलची समस्या

हे सुद्धा वाचा

साध्या रक्त तपासणीद्वारे लहान मुलांमधील कोलेस्ट्रॉल तपासले जाऊ शकते. एखाद्या कुटुंबात हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असेल किंवा पालकांना हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर अशा अशा मुलांची तपासणी करणे आवश्यक ठरते. रक्त तपासणीच्या रिपोर्चवरूनच मुलांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी किती आहे हे समजू शकते.

मुलांमध्ये कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढण्याचे कारण

पौष्टिक नसलेले पदार्थ आणि जंक फूड खाल्ल्याने मुलांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. आजकाल मुलांची शारीरिक हालचाल फार कमी असते, बहुतांश मुलं ही मोबाईल, लॅपटॉपवर व्यस्त असतात आणि खेळण्यासाठी घराबाहेर पडत नाहीत. काही मुलांचे वजन जास्त असेल तर त्यांना हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असू शकते. जर मुलाच्या आई वडिलांना हाय कोलेस्ट्रॉलची समस्या तर मुलावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

मुलांमधील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी करा हे उपाय

– फॅट्स, सॅच्युरेडेट फॅट्स कमी असलेले पदार्थ मुलांना खायला द्यावेत

– दररोज नियमितपणे व्यायाम करावा. सायकल चालवणे, पोहोणे, धावायला जाणे आणि बाहेर खेळणे, यामुळे शारीरिक हालचाल होते.

– मुलांचे वजन नियंत्रणात ठेवावे.

– सॅच्युरेटेड फॅटऐवजी अनसॅच्युरेटेड फॅटचा वापर करावा.

– पोषक तत्वं असलेला आहार मुलांना खाण्यास द्यावा.

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.