High Cholesterol: हातावर जाणवत असलेल्या या दोन समस्या देतात, कोलेस्ट्रॉल वाढल्याचे संकेत

कोलेस्टेरॉलची धोक्याची लक्षणे तुमच्या शरीरावरही दिसतात. यातील काही लक्षणे हातावरही दिसतात. जर तुम्हालाही तुमच्या हातावर उच्च कोलेस्टेरॉलची ही लक्षणे दिसली तर ताबडतोब तुमच्या शरीरातली  कोलेस्टेरॉलची पातळी तपासा.

High Cholesterol: हातावर जाणवत असलेल्या या दोन समस्या देतात, कोलेस्ट्रॉल वाढल्याचे संकेत
उच्च कोलेस्ट्रॉल Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 7:14 PM

आजकाल धावपळीच्या जीवनात बहुतेक लोक उच्च कोलेस्टेरॉलने (High Cholesterol symptoms) त्रस्त आहेत. शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असणे खूप हानिकारक असू शकते. उच्च कोलेस्टेरॉल असणे म्हणजे तुमच्या रक्तातील ‘खराब’ कोलेस्टेरॉलचे प्रमाण खूप जास्त आहे, ही अत्यंत धोकादायक स्थिती आहे. उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकार (heart disease) होण्याची शक्यता वाढते. यामुळे हृदयविकाराचा झटका (Heart attack), पक्षाघात होऊ शकतो. हल्ली  लोकांची जीवनशैली (Bad lifestyle) आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायाम न करणे यामुळे कोलेस्टेरॉलची समस्या सामान्य होत आहे. कोलेस्टेरॉलची धोक्याची लक्षणे तुमच्या शरीरावरही दिसतात. यातील काही लक्षणे हातावरही दिसतात. जर तुम्हालाही तुमच्या हातावर उच्च कोलेस्टेरॉलची ही लक्षणे दिसली तर ताबडतोब तुमच्या शरीरातली  कोलेस्टेरॉलची पातळी तपासा.

हातात उच्च कोलेस्टेरॉलची लक्षणे

प्रत्येकाने आपल्या कोलेस्ट्रॉलच्या पातळीचे नियमित निरीक्षण केले पाहिजे, जेणेकरून हृदयविकाराची समस्या आणि रक्तवाहिन्यांमधील अडथळे लवकर ओळखता येतील आणि संभाव्य धोका टाळता येईल.  काही लोकांना उच्च कोलेस्टेरॉल असतानाही मोठी लक्षणे दिसत नाहीत. परंतु काही छोट्या समस्येवरूनही याचा अंदाज लावल्या जाऊ शकतो. कधीकधी हाताला वेदना आणि मुंग्या येण्यासारख्या समस्या जाणवत असल्यास ते कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याचे संकेत देते.

खांद्यापासून हात दुखणे

जेव्हा तुमच्या धमन्यांमध्ये प्लेक जमा होतो, तेव्हा ते रक्तवाहिन्यांना ब्लॉक करते, ज्याला एथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. ही एक गंभीर समस्या आहे. हे खराब कोलेस्टेरॉल, फॅटी पदार्थ, कॅल्शियम आणि फायब्रिनचे बनलेले आहेत. शरीरात कोलेस्टेरॉल अधिक प्रमाणात जमा होत असल्याने हातातील रक्तवाहिन्याही बंद होऊ शकतात. काळजी न घेतल्यास कोलेस्टेरॉल सतत वाढू शकते. कोलेस्टोल पातळी वाढल्यानंतर हात खांद्यापासून दुखतो. तुम्हालाही ही समस्या वारंवार जाणवत असल्यास एकदा तुमच्या कोलेस्टेरॉलची चाचणी करून घ्या.

हे सुद्धा वाचा

हाताला मुंग्या येणे

हाताला वारंवार मुंग्या येणे, हात सुन्न होणे हे चांगले लक्षण नाही. हे उच्च कोलेस्टेरॉलचे संभाव्य लक्षण असू शकते. शरीराच्या विशिष्ट भागात रक्तप्रवाहात व्यत्यय आल्यास हाताला मुंग्या येणे सुरू होते. रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असल्याने रक्तप्रवाह घट्ट होतो आणि त्यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्ताच्या सामान्य प्रवाहावर परिणाम होतो, ज्यामुळे हातांना मुंग्या येतात. जे लोक खूप मद्यपान करतात किंवा ज्यांना टाइप 2 मधुमेह आहे त्यांना देखील हात आणि पायाला मुंग्या येण्याची समस्या जाणवते. तुम्हालाही मुंग्या येत असतील तर लगेच डॉक्टरांना डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.