तुम्हीही बराच वेळ लघवी रोखून ठेवत असाल तर होऊ शकते गंभीर नुकसान
Side Effect Of Holding Pee : तुम्ही कधीकधी तासनतास लघवी रोखून ठेवता का? असे करत असाल तर सावधान, अन्यथा तुमच्या आरोग्याला अनेक मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.
नवी दिल्ली : अनेकवेळा कामाच्या व्यस्ततेमुळे आणि प्रवासादरम्यान सुविधांचा अभाव असल्यामुळे काही लोक लघवी बराच (holding pee) वेळ रोखून ठेवतात. आपल्यापैकी अनेकांनी हे कधी ना कधी हे केलेच असेल. पण असे केल्याने तुम्ही नंतर आजारी (health problem) पडू शकता हे तुम्हाला माहिती आहे का? ब्लॅडर लीकेजपासून (bladder leakage) एकंदर आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो. लघवी थांबवल्यामुळे कोणती गंभीर हानी होऊ शकते याबद्दल जाणून घेऊया.
युटीआय (UTI)
युटीआय अर्थात युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन ही महिलांमध्ये तसेच पुरुषांमध्ये एक सामान्य समस्या आहे, जी अनेक कारणांमुळे उद्भवते. यातील एक कारण म्हणजे लघवी रोखून ठेवणे. वेळेवर लघवी न केल्याने, बॅक्टेरिया वाढण्याची संधी मिळते, जे मूत्राशयाच्या आत देखील पोहोचू शकतात. हा संसर्ग वाढला की अनेक गंभीर आजार होऊ शकतात. अशा स्थितीत लघवी वेळेवर होणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हालाही UTI ची समस्या वारंवार होत असेल तर वेळेवर लघवी करा आणि पुरेसे द्रवपदार्थ आणि पाण्याचे सेवन करा.
युरिन लिकेज
युरिन लिकेज किंवा लघवी गळतीची समस्या बहुतेकदा वृद्ध लोकांमध्ये उद्भवते, जेव्हा ते लघवीवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. परंतु जर तुम्ही नियमितपणे लघवी धरून किंवा रोखून ठेवत असाल पेल्विक फ्लोअर कमकुवत होते आणि गळतीची ही समस्या तुमच्या लहान वयातही उद्भवू शकते. लघवी नियमित थांबवल्यामुळे मूत्राशय कमकुवत होऊ लागते, त्यामुळे लघवी गळतीची समस्या उद्भवते.
किडनी स्टोन
युरिक ॲसिड आणि कॅल्शियम ऑक्सलेट नावाची खनिजे मूत्रात असतात. अशा स्थितीत तुम्ही लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्यास किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो.
ब्लॅडर स्ट्रेचिंग
वारंवार दीर्घकाळ लघवी रोखून ठेवल्याने मूत्राशयाचे स्नायू ताणले जातात आणि कमकुवत होतात, ज्यामुळे मूत्राशय फुटणे यासारख्या गंभीर समस्येला दीर्घकाळानंतर सामोरे जावे लागते.
किडनीचे आजार
लघवी थांबल्यामुळे किडनीवर दाब पडतो, जे भविष्यात किडनीशी संबंधित गंभीर समस्यांचे मूळ बनू शकतो. याशिवाय लघवी जास्त वेळ रोखून ठेवण्याच्या सवयीमुळे किडनी आणि मूत्राशयात वेदना होतात. लघवी केल्यानंतर मूत्राशयाचे स्नायू कडक होतात, त्यामुळे पेल्विक क्रॅम्प्सची समस्या उद्भवते.
युरिनरी रिटेन्शन
तुम्हालाही युरिनरी रिटेन्शनची समस्या असू शकते. ही अशी स्थिती आहे जेव्हा मूत्राशय पूर्णपणे रिकामे होऊ शकत नाही. यामध्ये तुम्हाला वेदना आणि अस्वस्थता आणि लघवी करताना त्रास होऊ शकतो.