Health Care | मध्यमवयीन महिलांमध्ये वाढतेय ‘UTI’ची समस्या, ‘हे’ उपाय येतील कामी!

नोकरीनिमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या महिलांमध्ये ही समस्या वाढताना दिसत आहे. बाहेर जात असल्याने त्यांना सार्वजनिक शौचालयांचा वापर करावा लागतो.

Health Care | मध्यमवयीन महिलांमध्ये वाढतेय ‘UTI’ची समस्या, ‘हे’ उपाय येतील कामी!
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 2:51 PM

मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीतील ‘युरीनल ट्रॅक इन्फेक्शन’ अर्थात मुत्र मार्गातील संसर्ग ही सर्वात मोठी समस्या म्हणून समोर येत आहे. पुरुषांपेक्षा महिलांना याचा अधिक त्रास होतो. नोकरीनिमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या महिलांमध्ये ही समस्या वाढताना दिसत आहे. बाहेर जात असल्याने त्यांना सार्वजनिक शौचालयांचा वापर करावा लागतो. अस्वच्छ शौचालयांचा वापर हे UTIचे मुख्य कारण आहे (Home Remedies to get relief from Urinary Tract Infection).

मध्यमवयीन म्हणजे 15 ते 40 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये यूटीआयचा धोका सर्वाधिक आहे. टीनएजर मुली मासिक पाळीच्या काळात स्वतःची योग्य काळजी घेण्यास असमर्थ असतात. याशिवाय रजोनिवृत्तीनंतर अर्थात मेनोपॉजनंतर महिलांना यूटीआयचा त्रास होतो. कारण, या काळात शरीरात इस्ट्रोजेन संप्रेरकाचे प्रमाण कमी होते. एका अहवालानुसार देशातील 50 टक्के महिला यूटीआयमुळे त्रस्त आहेत.

या रोगाचा वेळेवर उपचार न केल्यास गंभीर परिणाम उद्भवू शकतात. काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेऊन UTIची समस्या कमी करण्यासाठी उपाय केले जाऊ शकतात.

भरपूर पाणी प्या.

जेव्हा शरीरात डिहायड्रेशन होते, तेव्हा मूत्र संसर्ग अर्थात UTI होऊ शकतो. म्हणून दिवसभरात शक्य तितके पाणी प्या. पाणी आपल्या मूत्रमार्गातील संसर्गापासून शरीराचा बचाव करण्याचे कार्य करते. पाणी पिण्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते.

स्वच्छतेची काळजी घ्या.

जननेंद्रियाच्या भागांतील मूलभूत स्वच्छतेची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. यासाठी आपण फेमेलिन इंटीमेट वॉश वापरू शकता. तसेच, लघवी बराच काळसाठी रोखून धरू नये.

लसूण

लसूण हा UTIवरील घरगुती उपचार आहे. लसूणच्या वापराने UTI संसर्गावर बरा होतो. लसूण संसर्ग पसरवणार्‍या बॅक्टेरियांना थांबवण्याचे कार्य करते. आपण आपल्या आहारात दररोज लसूण वापरू शकता (Home Remedies to get relief from Urinary Tract Infection).

धावत्या जगाचं, धावतं बुलेटीन, पाहा न्यूज टॉप 9, दररोज रात्री 9 वा. टीव्ही 9 मराठीवर

हीटिंग पॅड

यूटीआय संक्रमणादरम्यान वेदना कमी करण्यासाठी आपण हीटिंग पॅड वापरू शकता.

प्रोबायोटिक्सचे सेवन करा.

यूटीआय संसर्ग टाळण्यासाठी प्रोबायोटिक्सयुक्त अन्न खा. किमची, दही यामध्ये प्रोबायोटिक घटक आढळतात. हे आपल्या पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवतात. म्हणून आहारात दररोज प्रोबायोटिक्सचा समावेश करा.

या गोष्टी लक्षात ठेवा

– शरीर संबंधांच्या दरम्यान कंडोमचा वापर करा.

– ओले कपडे घालणे टाळा.

– नेहमी कॉटन अंडरगारमेंट्स वापर करा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)

(Home Remedies to get relief from Urinary Tract Infection)

हेही वाचा :

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.