वजन कमी करायचे आहे? तर या ‘पाच’ सवयींना बनवा तुमच्या आयुष्याचा भाग; जाणून घ्या फायदे

असे म्हणतात की वाढलेले वजन (Weight) अनेक आजारांचे माहेरघर असते. तुमचे वजन प्रमाणाबाहेर वाढल्यास तुम्हाला विविध आजारांची (Illness) लागण होऊ शकते. सामान्यत: ज्यांचे वजन अधिक आहे, अशा व्यक्तींना मधुमेह (Diabetes), ब्लड प्रेशर यासारखे आजार असल्याचे दिसून येते.

वजन कमी करायचे आहे? तर या 'पाच' सवयींना बनवा तुमच्या आयुष्याचा भाग; जाणून घ्या फायदे
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 11:53 PM

असे म्हणतात की वाढलेले वजन (Weight)अनेक आजारांचे माहेरघर असते. तुमचे वजन प्रमाणाबाहेर वाढल्यास तुम्हाला विविध आजारांची (Illness) लागण होऊ शकते. सामान्यत: ज्यांचे वजन अधिक आहे, अशा व्यक्तींना मधुमेह (Diabetes), ब्लड प्रेशर यासारखे आजार असल्याचे दिसून येते. तसेच अशा व्यक्तींना चालताना धाप लागते, थकवा देखील येतो. त्यामुळे प्रत्येक जण हा आपले वजन नियंत्रणात कसे राहील यासाठी प्रयत्न करत असतो. वजन कशामुळेही वाढू शकते. वजन वाढीचे अनेक कारणे असतात. अपूर्ण झोप, अवेळी जेवन, जंक फूडचे अति सेवन, अति मद्यपान, व्यायाम न करणे असे अनेक घटक वजन वाढीसाठी कारणीभूत असतात. एकदा का शरीराचे वजन वाढले की, त्यावर नियंत्रण मिळवणे हे अतिशय कठिण होऊन जाते. मात्र तुम्ही तुमच्या रोजच्या सवयींमध्ये काही बदल करून तुमचे वजन नियंत्रित ठेवू शकता. आज आपण अशाच काही घरगुती उपयांबद्दल माहिती घेणार आहोत.

नाश्ता ठरलेल्या वेळेतच करा

अनेक लोक असे असतात की, त्यांचा नाश्ता करण्याचा वेळ हा निश्चित नसतो, कधी ते सकाळी लवकर नाश्ता करतात, तर कधी -कधी त्यांना नाश्ता करण्यासाठी खूप उशीर होतो. नाश्त्यामध्ये असलेली अनियमितता देखील तुमचे वजन वाढू शकते. त्यामुळे दररोज ठरलेल्या वेळेत नाश्ता करा, तसेच नाश्त्यामध्ये विविध फळाचा समावेश अधिक करा.

दररोज व्यायाम करा

सकाळी झोपेतून उठल्यावर व्यायाम करायची सवय लावून घ्या. नियमित व्यायाम केल्याने तुमच्या शरीरातील अतिरिक्त कॅलरी जळतात. त्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. सध्या कोरोनामुळे सर्वत्र वर्क फॉर्म होमच चालू आहे. वर्क फॉर्म होममुळे व्यायामाचे प्रमाण कमी झाले आहे. व्यायाम नसल्याने वजन वाढीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे स्वत:हाला तंरुस्त ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा.

भरपूर पाणी प्या

पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. पाणी पिल्यामुळे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात. त्यामुळे तुम्ही निरोगी राहाता. तसेच तुम्ही जर भरपूर प्रमाणात पाणी पीत असाल तर तुम्हाला भूक कमी लागते. कमी जेवल्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

आहारात पौष्टीक पदार्थांचा समावेश करा

वजन नियंत्रित ठेवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण उपाय आहे. जेवताना आहारात पौष्टीक पदार्थांचा जसे पालेभाज्या, फळं यांचा समावेश करा. शक्यतो आहारात जंक फूडचा समावेश टाळा. असे केल्यास तुमचे वजन तर कमी होईलच सोबत तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकता.

वजन कमी करण्याचे उदिष्ट ठरवा

तुम्ही जोपर्यंत तुमचे वजन कमी करण्याचे उदिष्ट ठरवणार नाहीत, तोपर्यंत तुमचे वजन कमी होऊ शकत नाही. उदिष्ट ठरवणे म्हणेज जर तुमचे वजन 75 किलो असेल तर येत्या दोन महिन्यात किमान पाच किलो तरी वजन कमी करण्याचा निश्चय करणे. जोपर्यंत तुम्ही वजन कमी करण्याचा निश्चय करणार नाहीत तोपर्यंत तुमचे वजन कमी होऊ शकत नाही.

संबंधित बातम्या

भविष्यात ओवेरियन कॅन्सर होऊ नये म्हणून महिलांनो चुकून ही या करणांकडे करू नका दुर्लक्ष!

खराब केसांवर महागड्या केराटिन ट्रीटमेंट ऐवजी घरगुती उपचारही ठरेल लाखमोलाचा!

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नेमकी कोणती डाळ खायची? उत्तर इथे मिळेल!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.