गरोदरपणात पाय सुजल्याने त्रास होतोय? तर ‘या’ सोप्या टिप्स देतील आराम
गरोदरपणात महिलांच्या पायाला सूज येणे ही एक सामान्य समस्या आहे, परंतु यामुळे खूप अस्वस्थता येते. याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, तसेच काही सोप्या टिप्स मुळे पायाच्या सुजण्यापासून आराम मिळू शकतो.
![गरोदरपणात पाय सुजल्याने त्रास होतोय? तर 'या' सोप्या टिप्स देतील आराम गरोदरपणात पाय सुजल्याने त्रास होतोय? तर 'या' सोप्या टिप्स देतील आराम](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/swelling.jpg?w=1280)
गरोदरपणात प्रत्येक महिलेच्या शरीरात अनेक बदल होत असतात. 9 व्या महिन्यांच्या टप्प्यात जेवणापासून अगदी छोट्या छोट्या गोष्टींचीही विशेष काळजी घ्यावी लागते. अशातच अनेक महिलांना गरोदरपणात पायाला सूज येते आणि ही समस्या सामान्य आहे. परंतु गर्भवतींसाठी पायाला अधिक सूज येणे हे त्रासदायक वाटू शकते. अशा वेळी एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा, जेणेकरून त्यामागचे कारण जाणून घेऊन तुम्हाला योग्य माहिती देऊ शकतील. याशिवाय जळजळ कमी करण्यासाठी तसेच गरोदरपणातील थकवा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय खूप उपयुक्त ठरू शकतात.
गरोदरपणात पायाला सूज येणे हे शरीरात अतिरिक्त द्रव जमा झाल्यामुळे होते. विशेषत: जास्त वेळ उभे राहू नका हे लक्षात घेतले पाहिजे. याशिवाय गर्भधारणा जसजशी वाढत जाते तसतसे दाबामुळे पायांच्या रक्ताभिसरणावर परिणाम होऊ लागतो आणि त्यामुळे पायांच्या पोटऱ्यांना आणि बोटांना सूज येऊ शकते. यासाठी या समस्यांपासून आराम मिळावा यासाठी हे टिप्स तुम्हाला फायदायचे ठरू शकते.
सोडियमचे सेवन कमी करा
गर्भवती महिलांना पायातील सूज कमी करायची असेल तर आहारात मिठाचे सेवन मर्यादित करा, कारण शरीरात सोडियम वाढल्याने पाण्याचे प्रमाण वाढते आणि पायांना सूज येऊ लागते. तसेच प्रक्रिया केलेले पदार्थ, हवाबंद असलेले पदार्थ इत्यादी खाणे टाळा. त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात मिठ असते.
पायांना कोमट पाण्याने शिकवा
सूज कमी करण्यासाठी पायांना कोमट पाण्याने शकवावे. एका टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात पाय सुमारे २० मिनिटे ठेवा. पाण्यात सैंधव मीठही घालावे. यामुळे खूप आराम मिळतो. झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने पाय शेकल्यास झोपही चांगली येते.
कोमट तेलाने पायांची मसाज करणे
गर्भवती महिलांनी पायांची सूज कमी करण्यासाठी मसाज या उत्तम मार्गाचा अवलंब करू शकता. यामुळे थकवा ही कमी होतो आणि वेदना ही दूर होतात. मोहरी किंवा नारळाचे तेल घेऊन ते हलके गरम करून पायांच्या टाचा, पोटऱ्या आणि तळव्यांना मसाज करावा. अशाने तुमच्या पायांना आराम मिळतो व सूज कमी होते.
हर्बल चहा फायदेशीर आहे
पायातील सूज कमी करण्यासाठी प्रत्येक गर्भवती महिलेने हर्बल चहाचा समावेश रोजच्या आहारात करून घ्यावा, कारण यामुळे जळजळ कमी होते. त्याचबरोबर चहा-कॉफी आहारातून कमी करावी. तसेच गर्भवती महिलांनी हर्बल चहा घेण्याआधी कोणत्या आणि किती घ्यावा, यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.