Hot water Benefit: रिकाम्या पोटी गरम पाणी पिण्याचे आहेत असंख्य फायदे, ‘या’ समस्यांपासून मिळेल मुक्ती
कोमट पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. नियमीत गरम पानी पिल्यास अनेक आजारांपासून सुटका होऊ शकते.
मुंबई, रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने (Hot Water benefits) शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळे गॅस आणि अॅसिडिटीची समस्या दूर होते. यामुळे शरीर पूर्णपणे निरोगी राहते. याशिवाय आतड्यांचे आकुंचन होण्यास मदत होते. यामुळे आतड्यांमध्ये अडकलेला मल बाहेर येतो आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. लहान मुलांपासून ते तरुण आणि वृद्धदेखील गरम पाणी पिऊ शकतात. याचा फायदा सर्वांनाच होतो.
काय आहेत फायदे?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान वाढते, ज्यामुळे शरीरातील अंतःस्रावी यंत्रणा सक्रिय होऊन घाम येतो आणि त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. मासिक पाळीच्या काळात ओटीपोटात दुखणे, पाठदुखी, पाय दुखणे हे महिलांना सामान्य झाले आहे. अशा स्थितीत कोमट पाणी प्यायल्याने पोटदुखी आणि दुखण्यांपासून बऱ्याच अंशी आराम मिळतो. यासोबतच शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.
हृदयासाठी फायदेशीर
कोमट पाणी शरीरात साठलेली चरबी काढून टाकते, ज्यामुळे तुम्हाला तणावमुक्त वाटते. यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचा धोकाही कमी होऊ शकतो. वजन कमी करणे सोपे होते. वजन कमी करण्याचे अनेक मार्ग असतील. रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने चेहऱ्याची चमक वाढते.
शरीरातील अंतर्गत प्रणाली सुधारली की त्याचा परिणाम त्वचेवरही दिसू लागतो. पचन आणि रक्त परिसंचरण सुधारते. कोमट पाणी प्यायल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळी वर्तुळे यासारख्या वृद्धत्वाच्या समस्या टाळता येतात. तसेच ते मुरुमे होण्यापासून प्रतिबंधित करते. परिणामी, त्वचा अधिक चमकदार आणि स्पष्ट दिसते.