Health : पावसाळ्यात भिजल्याने मोठ्या प्रमाणात गळतात केस, करा हे घरगुती उपाय!
पावसात केस भिजल्यानंतर ते चिकट होणे, तुटणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. या समस्यांमुळे महिला मोठ्या प्रमाणात त्रस्त असतात. यामुळे मोठ्या प्रमाणात केस गळतात मात्र यावर घरगुती उपाय आहे.
मुंबई : सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत त्यामुळे पावसाळ्यात केसाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. पावसात केस भिजल्यानंतर ते चिकट होणे, तुटणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. या समस्यांमुळे महिला मोठ्या प्रमाणात त्रस्त असतात, तसेच या समस्या टाळण्यासाठी त्या अनेक घरगुती उपायांचा अवलंब करत असतात. अशा हेअर मास्कबाबत जाणून घ्या जे आपल्या केसांच्या समस्या थांबवण्यास मदत करतात आणि आपले केस मजबूत करतात.
खोबरेल तेल आणि दही- जर पावसामुळे तुमचे केस गळत असतील तर खोबरेल तेल आणि दही यांचा हेअर मास्क तुम्ही केसांना लावू शकता. हा हेअर मास्क तयार करण्यासाठी अर्धा कप खोबरेल तेल घेऊन त्यात चार ते पाच चमचे दही मिक्स करा. तसेच त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला. हे सर्व मिश्रण एकत्र चांगलं मिक्स करा आणि ते तुमच्या केसांच्या मुळांमध्ये लावा आणि अर्ध्या तासानंतर तुमचे केस स्वच्छ धुवा. यामुळे केसातील कोंडा निघून जातो आणि केसांची चमकही वाढते.
व्हिनेगर आणि दही – तुमच्या केसांसाठी व्हिनेगर आणि दहीचा हेअर मास्क जरूर लावा. हा हेअर मास्क तयार करण्यासाठी एक कप कोमट पाण्यात व्हिनेगर आणि मध मिसळा. त्यानंतर हा मास्क तुमच्या केसांच्या मुळांमध्ये लावा. काही वेळ हा मास्क तसाच केसांमध्ये राहूद्या आणि त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळे तुमचे केस सॉफ्ट होण्यास मदत होतील.
दूध आणि मध – तुम्ही तुमच्या केसांना दूध आणि मधाचा हेअर मास्क लावू शकता. दुधामध्ये फॅटचे प्रमाण असते जे आपल्या केसांना सॉफ्ट बनवण्यास मदत करतात. तसंच यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते जे केसांच्या पेशी दुरुस्त करण्यास मदत करते. हा मास्क बनवण्यासाठी अर्धा कप दूध घ्या आणि त्यात एक चमचा मध मिसळा. हा मास्क केसांना लावा आणि थोड्या वेळाने केस धुवा.
स्ट्रॉबेरी आणि मध – केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही स्ट्रॉबेरी आणि मधाचा हेअर मास्क लावू शकता. हा मास्क तयार करण्यासाठी सहा ते आठ स्ट्रॉबेरी घ्या आणि त्यात एक चमचा नारळ तेल आणि मध मिक्स करा. या सर्व गोष्टी मिक्सरमध्ये नीट बारीक करा, तयार झालेला हा हेअर मास्क तुमच्या केसांना लावा. त्यानंतर ते दहा ते पंधरा मिनिटं तसंच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने केस चांगले धुऊन घ्या. या मास्कमुळे केस स्वच्छ होतात आणि कोरडेपणा देखील दूर होतो तसेच केस चमकदार होतात.