तुमचा फ्रीज ठरू शकतो हानिकारक, फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न सेवन करण्याचे दुष्परिणाम माहीत आहेत का ?

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत अन्न जास्त वेळ साठवून नंतर खाणे अगदी सामान्य झाले आहे. यामुळे अन्न खराब होत नाही आणि वेळेचीही बचत होते, पण अनेकदा फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न आरोग्यासाठी चांगले आहे की नाही, असा प्रश्न पडतो.

तुमचा फ्रीज ठरू शकतो हानिकारक, फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न सेवन करण्याचे दुष्परिणाम माहीत आहेत का ?
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 8:32 AM

नवी दिल्ली – आजकालच्या वेगवान जीवनशैलीमुळे, बहुतेक लोकांना दररोज ताजे अन्न (cooking food) शिजविणे खूप कठीण झाले आहे. यामुळे, काही लोक अनेकदा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात अन्न शिजवून तयार करतात आणि नंतर वापरण्यासाठी ते रेफ्रिजरेटरमध्ये (food stored in fridge) साठवून ठेवतात. पण बरेच आरोग्य तज्ञ शिजलेले अन्न जास्त वेळ फ्रीजमध्ये न ठेवण्याचा सल्ला देतात. फ्रीजमध्ये जास्त काळ ठेवलेल्या अन्नाचे काय दुष्परिणाम (side-effects) आहेत आणि ते किती वेळ साठवून ठेवणे योग्य आहे, हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

फ्रीजमध्ये अन्न ठेवल्यास त्यातील पोषक घटक नष्ट होतात, असा लोकांमध्ये गैरसमज आहे. उलट, काही वेळा स्वयंपाक करतानाच अन्नातील अनेक पोषक तत्वे नष्ट होतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

फ्रीजमध्ये अन्न साठवणं योग्य आहे की नाही ?

हे सुद्धा वाचा

पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वं ही सर्वात अस्थिर आणि सहज गमावली जातील अशी पोषक तत्वं असतात, परंतु त्यापैकी बहुतेक तत्वं ही स्वयंपाक करताना गमावली जातात, फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे नव्हे. खरं तर जीवनसत्त्वं ही उष्णतेमुळे नष्ट होतात, थंडाव्यामुळे नव्हे. हवाबंद डब्यात शिजवलेले बहुतेक अन्न किमान दोन ते तीन दिवस टिकू शकते, अगदी एक आठवड्यापर्यंत चांगले राहू शकते, असे तज्ज्ञांनी नमूद केले. फ्रीझरमध्ये ठेवलेले अनेक खाद्यपदार्थ सहा महिन्यांपर्यंत टिकू शकतात. सर्व जैविक क्रिया या तापमानासह मंदावतात त्यामुळे अन्न खराब होण्याची शक्यता कमी असते.

काही पदार्थ लवकर खराब होतात

जरी या पदार्थांना काही अपवाद आहेत. साध्या शिजवलेल्या भातामध्ये कधीकधी असे जीवाणू वाढू शकतात जे कमी तापमानातही चांगले टिकतात. म्हणूनच एक किंवा दोन दिवसात त्यांचे सेवन करणे चांगले आहे. याशिवाय भारतीय खाद्यपदार्थांमध्ये मसाले, खारट आणि आंबटपणा असल्याने ते फ्रिज-फ्रेंडली बनते.

हे पदार्थ खाऊन लवकर संपवा

फ्रीजमध्ये ठेवल्याने वेळ वाचतो पण आरोग्यासाठी ते किती सुरक्षित आहे असा प्रश्न पडतो. तर मांस, पोल्ट्री, मासे, दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी यांसारखे नाशवंत पदार्थ फ्रीजमध्ये ठेवावेत आणि ते काही दिवसांत अथवा आठवडाभरात वापरावेत. तर ब्रेड, फळे आणि भाज्या यांसारखे लवकर खराब न होणारे पदार्थ जास्त काळ फ्रीजमध्ये साठवता येतात.

कशी रोखावी बॅक्टेरियाची वाढ?

अन्नामध्ये बॅक्टेरिया तयार होऊ नयेत म्हणून ते वाढून नयेत म्हणून सर्वप्रथम नाशवंत गोष्टी खाव्यात. यानंतर, उरलेले अन्न हवाबंद डब्यात साठवावे किंवा झाकून ठेवावे. तुमचे उरलेले अन्न रेफ्रिजरेटरच्या वरच्या रॅकमध्ये ठेवा जेणेकरून त्याला अधिक हवा आणि थंडपणा मिळेल. शिळे उरलेले फ्रीजच्या पुढच्या बाजूला आणि ताजे अन्न मागे ठेवावे. आणि ते लवकरात लवकर खाऊन संपवावे.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.