कोणत्या वयाच्या व्यक्तीने किती चालायला हवे ? लठ्ठपणा दूर करायचा आहे तर हा तक्ता पाहा
स्वीडनच्या युनिर्व्हर्सिटी ऑफ काल्मरच्या 14 रिसर्चर्सनी केलेल्या एका अभ्यासात हे सिद्ध झाले आहे की जर व्यक्ती आपले वय पाहून चालण्याच्या पद्धतीत बदल करत असेल तर ते त्याला फायदेशीर आहे.
मुंबई | 30 जुलै 2023 : ‘चालाल तर वाचाल’ अशी सध्या परिस्थिती आहे. पायी चालल्याने तुमच्या शरीराचा व्यायाम अधिक सहज होतो, तुम्हाला महागड्या जिममध्ये जाऊन पैसा खर्च करायची आवश्यकता राहत नाही. हेल्थ एस्क्पर्ट प्रत्येक वयाच्या व्यक्तीला चालण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. जर तुम्ही नियमित चालत असाल तर तुम्हाला अन्य व्यायाम करण्याची फारशी आवश्यकता लागत नाही. परंतू कोणत्या वयाच्या व्यक्तीने किती चालायला हवे याचा काही नियम आहे का ? या लेखात आपण तेच जाणून घेणार आहोत.
स्वीडनच्या युनिर्व्हर्सिटी ऑफ काल्मरच्या 14 रिसर्चर्सनी केलेल्या एका अभ्यासात हे सिद्ध झाले आहे की जर व्यक्ती आपले वय पाहून चालण्याच्या पद्धतीत बदल करत असेल तर ते त्याला फायदेशीर आहे. यामुळे वजन वाढण्यास प्रतिबंध तर करता येईलच शिवाय जीवनशैली संबंधीत आजारही बरे होण्यास मदत होईल. हार्ट डीसिज, डायबिटीस आणि हायब्लड प्रेशर सारख्या गंभीर आजारांवर सहज नियंत्रण ठेवता येईल. या संशोधनानूसार पाहूया कोणत्या वयाच्या व्यक्तीने किती चालावे ते पाहूयात…
कोणत्या वयाच्या व्यक्तीने किती पावले चालावीत याचा तक्ता
- संशोधनानूसार 6 ते 17 वयोगटातील मुलांनी जेवढे अधिक चालता येईल तेवढे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. या वयोगटातील मुलांनी रोज सतरा हजार पावले तरी चालले पाहीजे. मुलींनी 12,000 पावले तर उत्तम आहे.
- 18 ते 40 वयोगटातील व्यक्तींना महिला आणि पुरुषांनी रोज 12,000 पावले चालले पाहीजे.
- 40 नंतरच्या व्यक्तीमध्ये आरोग्याच्या तक्रारी सुरु झालेल्या असतात. तसेच या वयात वजन वाढण्याचा अधिक धोकाही असतो. अशावेळी हेल्थ एक्सपर्टच्या मते या वयात 11,000 पावले चालायला हवे.
- 50 वयोगटातील व्यक्तीने रोज 10,000 पावले चालायला पाहीजेत.
- 60 वयाच्या बुजुर्गांनी स्वास्थ्य राखण्यासाठी किमान रोज 8,000 पावले चालयला पाहीजे. चालता अगदी आरामात चालायला नको. झपझप एका लयीत चालले पाहीजेत.
- 60 वर्षांवरील व्यक्तींना चालता फिरताना त्रास होत असतो. पाय आणि गुडघे दुखत असतात. त्यामुळे त्यांनी दम लागत नाही तोपर्यंत चालावे, त्यामुळे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच चालावे.
( या लेखात सुचवलेले उपाय सामान्य माहीतीवर आधारित आहेत. प्रत्येक व्यक्तीला ते लागू होतीलच असे नाही. योग्य माहीतीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा )