‘कोविशील्ड’ लस भारतासाठी किती प्रभावी? उपयुक्तता ते किंमत, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

'कोविशील्ड' या लसीची तपासणी आणि निर्मिती भारतात 'सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' करत आहे

'कोविशील्ड' लस भारतासाठी किती प्रभावी? उपयुक्तता ते किंमत, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर
Serum Institute of India's vaccine candidate, Covishield approved for emergency use
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 10:15 AM

नवी दिल्ली : ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ने ‘कोविशील्ड’च्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज केला आहे. अमेरिकन औषधी कंपनी फायझरनंतर भारतातही ऑक्सफर्डची कोरोना लस ‘कोविशील्ड’ला मान्यता मिळवण्यासाठी सीरमने रविवारी अर्ज केला. भारतीय औषध नियंत्रकाकडे (डीसीजीआय) आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागणारी सीरम ही पहिली स्वदेशी कंपनी ठरली आहे. (how much sii oxford vaccine covishield effective for india know all the things about oxford astrazeneca)

ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेका यांनी विकसित केलेल्या ‘कोविशील्ड’ या लसीची तपासणी आणि निर्मिती भारतात ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ करत आहे. ‘कोविशील्ड’ लस भारतासाठी किती उपयुक्त आहे, तिची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

गंभीर रुग्णांवर परिणामकारक

मीडिया रिपोर्टनुसार, वैज्ञानिक ​​चाचणीच्या अहवालानुसार कोरोनाची लक्षणं असलेल्या गंभीर रुग्णांच्या बाबत ‘कोविशील्ड’ अत्यंत प्रभावी आहे, असे सीरमने आपल्या अर्जात नमूद केले आहे. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी कोरोनाची लस ‘कोविशील्ड’ चाचणीत 90 टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचा दावा केला होता. अ‍ॅस्ट्राजेनेकाबरोबर 10 कोटी डोसचा करार झाल्याची माहितीही त्यांनी दिली होती. जानेवारीपर्यंत ‘कोविशील्ड’च्या किमान 10 कोटी डोस उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कोविशील्ड लसीची चाचणी एप्रिल महिन्यापासून ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत सुरु आहे. यामध्ये सहभागी 24 हजार स्वयंसेवकांशी निगडीत आकडेवारीचे विश्लेषण केले गेले. कोणतेही प्रतिकूल परिणाम आढळले नाहीत, असं वैज्ञानिकांनी सांगिलं आहे. काही दिवसांपूर्वी सीरम इन्स्टिट्यूटने कोविशील्डचा प्रतिकूल परिणाम झाल्याचा आरोप एका स्वयंसेवकाने केला होता. मात्र सीरमने हे दावे पूर्णपणे खोडून काढत लस सुरक्षित असल्याचं सांगितलं होतं.

फायझरच्या तुलनेत अधिक प्रभावी

एमआरएनए तंत्रज्ञानावर आधारित फायझर आणि मॉडर्ना लस तयार केल्या आहेत. यामुळे त्या अनुक्रमे -70 आणि -20 अंश सेल्सियस तापमानात ठेवाव्या लागतील. अशा परिस्थितीत त्यांचे स्टोरेज आणि वाहतूक भारतात आव्हानात्मक आहे. तर ऑक्सफोर्डची अ‍ॅस्ट्राजेनेका लस वेक्टर आधारित आहे. ती 2 ते 8 अंश सेल्सियस तापमानात साठवली जाऊ शकते. अशा परिस्थितीत हे भारतासाठी अधिक आव्हानात्मक ठरु शकते. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी लसीचे कोडनेम एझेडडी -1222 आहे. या लसीमुळे ज्येष्ठांमध्येही प्रचंड प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. (how much sii oxford vaccine covishield effective for india know all the things about oxford astrazeneca)

कोविशील्डची किंमत काय?

ऑक्सफोर्डच्या लस उत्पादनासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने करार केला आहे. यातील निम्म्या लशी देशासाठी राखीव असतील. आयसीएमआर आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या म्हणण्यानुसार, कोविशिल्ड हे भारतातील मानवी चाचण्यांमध्ये आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट लस असल्याचे सिद्ध झाले आहे. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्राजेनेका लसीच्या दोन डोसची किंमत 1000 रुपयांपर्यंत असू शकते. म्हणजेच खासगी बाजारामध्ये या लसीचा एक डोस 500 ते 600 रुपयांपर्यंत असू शकतो. त्याच वेळी, फायझर आणि मॉडर्ना लसीची किंमत 3 ते 4 हजार रुपये असू शकते.

आपत्कालीन मंजुरी म्हणजे काय?

आणीबाणीच्या वापराची मंजुरी लस, औषधे, निदान चाचण्या आणि वैद्यकीय उपकरणांना दिली जाते. भारतात यासाठी सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) ही नियामक संस्था आहे. लस आणि औषधे सुरक्षित आढळल्यानंतरच ते मंजूर केले जातात. सर्वसाधारणपणे लसीच्या मान्यतेसाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. मात्र कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या संकटकाळात सुरक्षित आणि प्रभावी असल्याच्या पुराव्यांवर औषध आणि लसींना मंजुरी दिली जात आहे.

संबंधित बातम्या :

सीरमनेही मागितली लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी, ठरली पहिली भारतीय कंपनी

(how much sii oxford vaccine covishield effective for india know all the things about oxford astrazeneca)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.