Health : पावसाळ्यात त्वचाविकारांपासून दूर राहण्यासाठी अशा प्रकारे घ्या काळजी!

त्वचेच्या संसर्गाची कारणे कोणती आहेत ते जाणून घ्या. पायांवर सुटणारी खाज यासाठी कशा प्रकारे काळजी घ्यायची याबाबतची सर्व माहिती सविस्तर समजून घ्या.

Health : पावसाळ्यात त्वचाविकारांपासून दूर राहण्यासाठी अशा प्रकारे घ्या काळजी!
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 5:18 PM

मुंबई : पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दुषित पाणी, विषाणु तसेच जंतूचा त्वचेशी थेट संपर्क येऊन अनेक त्वचाविकार यांचा सामना करावा लागू शकतो. या दिवसांमध्ये आपण आपल्या त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्वचेच्या संसर्गापासून दूर राहण्याकरिता काय उपाय करता येतील. महत्त्वाचं म्हणजे त्वचेच्या संसर्गाची कारणे कोणती आहेत ते समजून घ्या. यासंदर्भात डॉ. रिंकी कपूर डर्मेटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट आणि डर्मेटो-सर्जन, द एस्थेटिक क्लिनिक्स यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

पावसाचे पाणी हवेतील प्रदूषकांमध्ये मिसळते (धुळीचे कण, रासायनिक धूळ इ.) त्यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवतात आणि त्वचेला खाज सुटते. पावसामुळे बुरशीचे प्रमाण वाढते आणि कीटकांची पैदास होते. ज्यामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात. हवेतील परागकण आणि पाळीव प्राण्यांच्या केसांमधील कोंडा हे देखील त्वचेच्या समस्येस कारणीभूत ठरते. जोपर्यंत तुम्ही त्वचेच्या संसर्गावर उपचार करत नाही तोपर्यंत जास्त खाज सुटु शकते.

पावसाळ्यात त्वचेचा संसर्ग निर्माण करणारे घटक कोणते

बुरशीजन्य संसर्गामुळे – ही बोटांच्या मधल्या भागात दिसून येते त्यामुळे त्वचेवर संसर्ग निर्माण होते. त्यामुळे त्वचला तडा जाणे, खाज सुटणे, लालसरपणा येतो. बुरशी-आधारित ऍलर्जीचे मुख्य कारण म्हणजे घाम येणे किती सतत पाण्यात राहणे.

ओले कपडे आणि बुटांमुळे ऍलर्जी – ओले कपडे, शूज आणि मोजे शरीरावर घर्षण करतात त्यामुळे मांडीच्या भागात खाज सुटते. सिंथेटिक कपड्यांमुळे ही त्वचेचा संसर्ग उद्भवतो. खाज सुटणे, पायाच्या बोटांमध्ये होणारी जखम आणि एक संसर्गजन्य बुरशीजन्य रोगामुळे खाज सुटून पांढरे फोड दिसून येतात. कधीकधी पायांना भेगा पडणे फोडांमध्ये जळजळ होण्याची शक्यता असते.

वातावरणात निर्माण झालेल्या थंडाव्यामुळे पृष्ठभाग आकुंचन पावतात आणि ओलसर होतात. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या ओलसरपणामुळे फर्निचर व साहित्यांवर रासायनिक किंवा बायोलॉजिकल क्रिया होऊ शकते. यामुळे घरामध्ये वायू प्रदूषण होऊ शकते. म्हणूनच ओलसरपणामुळे दमा आणि खोकला व घसा खवखवणे सारखे श्वसनविषयक आजार होण्याचा धोका वाढतो. उपचार न केल्यास बुरशीजन्य संसर्ग आणि यीस्ट संसर्गात वाढ होऊ शकते. रिंगवर्म दमट वातावरणात वाढतात आणि अनेकदा संसर्गजन्य असतात. ते टॉवेल्स, मेकअप, भांडी आणि सार्वजनिक शौचालयांचा वापर इत्यादींमुळे पसरू शकतात.

ॲथलेटीक फुट: कॅन्डिडा बुरशीमुळे होते यामध्ये पायांवर खाज सुटते, खपली येते आणि फोडांमुळे वेदना होतात.

एक्झिमाः हा संसर्गजन्य नसला तरी इसब त्वचेसाठी घातक ठरू शकतो. कारण त्यामुळे जळजळ, लालसरपणा आणि खाज सुटते. उपचार न केल्यास ते त्वचेला खडबडीत करू शकतात, त्वचेवर भेगा पडू शकतात. हे आर्द्रता, तापमानातील चढउतार यामुळे देखील उद्भवू शकते आणि त्यामुळे त्वचारोग निर्माण होतो. खरुज ही त्वचेची ऍलर्जी आहे जी पाण्याद्वारे पसरते आणि ती संसर्गजन्य असते. यामुळे त्वचेवर लहान फोड दिसून येतात.

ॲलर्जी कशी टाळाल?

• त्वचेची योग्य काळजी घेणे आणि ती स्वच्छ आणि कोरडी ठेवणे. • घट्ट कपडे आणि रबरच्या वस्तूचा वापरणे टाळा • सुती कपड्यांचा वापर करणे • जास्त वेळ ओले न राहणे आणि पावसात भिजल्यानंतर शक्य तितक्या लवकर स्वच्छ पाण्याने अंघोळ करणे किंवा हात पाय धुवावे • पावसाळ्यात रेनकोट आणि छत्रीचा वापर करावा. • घाणेरडे पाणी किंवा ऍलर्जी निर्माण करणाऱ्या घटकांपासून दूर रहा जसे की प्राण्यांची केस, धूळ, घाण आणि परागकण. • त्वचेची चांगली काळजी घेणे जसे की त्वचेला खाजवणे तसेच संसर्ग टाळणे • त्वचेकरिका औषधी साबण, अँटीफंगल आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पावडर वापरा जेणेकरून ज्या भागात त्वचा दुमडली जाते ते भाग कोरडे राहतील. • बाहेर पडण्यापूर्वी दररोज सनस्क्रीन वापरा • घरातील चादरी, टॉवेल, गाद्या स्वच्छ आणि कोरड्या ठेवा. योग्य निदान आणि उपचारासाठी त्वचाविकार तज्ज्ञांशी संपर्क साधा.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.