थंडीत वाढतो स्किन इन्फेक्शनचा धोका, बचावासाठी करा हे उपाय
त्वचेला इन्फेक्शन अथवा संसर्ग होणे हे सामान्य असले तरी बऱ्याच वेळेस ही स्थिती गंभीर होऊ शकते. हिवाळ्यात इन्फेक्शनचा धोका वाढतो.
नवी दिल्ली – संसर्गजन्य स्किन इन्फेक्शन (skin infection) आहे, जे विविध प्रकारच्या फंगस (fungus) अथवा बुरशीमुळे होते. त्वचेच्या वेगवेगळ्या भागांवर त्याचा परिणाम होतो. बुरशीचा प्रकार आणि शरीराच्या कोणत्या भागावर बुरशी आली आहे हे लक्षात घेऊन त्याचे नाव दिले जाते. या संसर्गावक उपचार करण्यासाठी ओव्हर-द-काउंटर अँटीफंगल औषधे (medicines) वापरता येऊ शकतात. पण हे इन्फेक्शन वारंवार होऊ शकते, थंडीच्या दिवसात स्किन इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. बचावासाठीचे उपाय जाणून घेऊया.
योग्य कपडे निवडा
थंड वातावरणाचा आपल्या शरीरावर खोलवर परिणाम होतो. जसजसे तापमान कमी होते तसतशी त्वचेतील ओलावा किंवा आर्द्रतेचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे त्वचेला संसर्ग होऊ शकतो किंवा काही वेळेस इतर समस्याही निर्माण होतात. त्यामुळे हिवाळ्यात स्किन इन्फेक्शन टाळायचे असेल तर नॅचरल फायबरपासून बनलेले कपडे वापरावेत. म्हणूनच कापूस वापरणे चांगले मानले जाते. तसेच पायांना संसर्ग होऊ नये यासाठी ते स्वच्छ ठेवणे महत्वाचे ठरते. आपले मोजे आणि चपला, बूट इतर कोणाशीही शेअर करू नये.
त्वचा कोरडी ठेवावी
हिवाळ्यात आपली त्वचा योग्यरित्या कोरडी ठेवणे खूप महत्वाचे आहे, विशेषत: बोटांच्या दरम्यानचे भाग नीट तपासावेत. आर्द्रतेमुळे त्वचेला इन्फेक्शन होऊ शकते.
ह्युमिडिफायर
एखादा चांगाला ह्युमिडिफायर वापरावा. त्यामुळे हवेत आर्द्रता वाढते. आणि त्वचेला होणारे इन्फेक्शन टाळता येते.
नैसर्गिक उत्पादनांचा वापर करावा
बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांमध्ये केमिकल्स अथवा रसायने असतात. यामुळे त्वचेला इन्फेक्शन होऊ शकते. म्हणून नैसर्गिक उत्पादनांचा वापर करावा. विशेषतः ग्लिसरीन, शिया बटर किंवा ऑलिव्ह ऑइलपासून बनवलेले साबण वापरावेत.
(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)