Electric Shock First Aid : शॉक लगा लगा लगा शॉक लगा …! स्वत: सेफ राहून अशी करा दुसऱ्यांची मदत

तुमच्या समोर एखाद्या व्यक्तीला वीजेचा धक्का लागल्यास प्रथमोपचार म्हणून काय करावे? स्वत: सुरक्षित राहून समोरच्या जखमी व्यक्तीची मदत कशी करावी, ते जाणून घ्या.

Electric Shock First Aid : शॉक लगा लगा लगा शॉक लगा ...! स्वत: सेफ राहून अशी करा दुसऱ्यांची मदत
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 10:25 AM

नवी दिल्ली – तुमच्या समोर एखाद्या व्यक्तीला वीजेचा झटका अथवा शॉक (electric shock) लागल्याची घटना घडली आहे का ? असा प्रसंग किंवा अपघात फारच कमी वेळा घडतो, पण त्यामुळे आपण पॅनिक (do not panic) होऊ शकतो, काय करावं ते समजत नाही. मात्र अशा वेळी शांत राहून तत्काळ जखमी व्यक्तीची मदत करणे अपेक्षित असते. तुम्ही उपस्थित असताना एखाद्या व्यक्तीला वीजेचा धक्का लागल्यास प्रथमोपचार (first aid) म्हणून काय करावे? स्वत: सुरक्षित राहून तुम्ही समोरच्या जखमी व्यक्तीची मदत कशी करू शकाल, ते जाणून घ्या.

वीजेचा झटका किंवा इलेक्ट्रिक शॉक लागल्यास काय करावे ?

आपले शरीर वीजेचे चांगले वाहक असते, त्यामुळेच जर तुम्ही वीजेच्या स्त्रोताशी जोडलेल्या व्यक्तीला स्पर्श केला तर तुमच्या शरीरातून वीज वाहू शकते आणि तुम्हालाही शॉक लागू शकतो. तज्ञांच्या सांगण्यानुसार, इलेक्ट्रिक शॉकची गंभीरता ही आपल्याला लागलेला करंट आणि व्होल्टेज याच्यावर अवलंबून असते. इलेक्ट्रिक शॉक लागल्यास गंभीर इजा होऊ शकते, अथवा भाजू शकते आणि काही वेळेस ते प्राणाघातकही ठरू शकते. तसेच त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊन शरीराचे गंभीर नुकसानही होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

कधी असते मेडिकल इमर्जन्सी ?

एखाद्याला शॉक लागल्यावर खालील लक्षणे दिसल्यास मेडिकल इमर्जन्सी उद्भवते. अशा वेळेस वैद्यकीय मदत मागवावी. जर –

– जखमी व्यक्तीच्या शरीरावर गंभीर जखमा असतील.

– जखमी व्यक्ती गोंधळलेली असेल

– श्वास घेण्यास त्रास होत असेल

– हृदयाचे ठोके मंद किंवा अधिक जलद झाल्यास.

– हृदयविकाराचा झटका आल्यास

– स्नायू दुखणे किंवा कडक होणे

– स्ट्रोक येणे

– बेशुद्ध होणे

एखाद्या व्यक्तीला शॉक लागल्यास कशी करावी मदत ?

तुमच्या समोर एखाद्या व्यक्तीला वीजेचा धक्का बसला किंवा शॉक लागला तर तत्काळ मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसला कॉल करावा :

– वीजेच्या तारेला किंवा जिथून विद्युत प्रवाह येत आहे त्या ठिकाणी हाताने स्पर्श करू नका. यामुळे तुम्हालाही वीजेचा धक्का लागू शकतो.

– शॉक लागलेल्या व्यक्तीला हलवू नका.

– जेथून विद्युतप्रवाह होत आहे, तो बंद करा. ते शक्य नसेल तर लाकडी काठीच्या सहाय्याने शॉक लागलेल्या व्यक्तीला वीज प्रवाहापासून दूर करा.

– संबंधित व्यक्ती वीजेच्या तारेपासून दूर झाल्यानंतर त्या व्यक्तीचा श्वास व नाडी नीट सुरू आहे ना, ते तपासा.

– शॉकची चिन्हे दिसल्यास, व्यक्तीला जमिनीवर ठेवा. त्याचे पाय वर करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचे डोके धडापेक्षा किंचित खाली ठेवण्याचा प्रयत्न करा.

– जर शॉक लागलेल्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत असेल, ती व्यक्ती बेशुद्ध झाली असेल , अथवा चक्कर येत असेल, स्नायू दुखत असतील किंवा हृदयाचे ठोके जलद झाले असतील, तर शक्य तितक्या लवकर वैद्यकीय मदत घ्या.

– जर ती व्यक्ती श्वास घेत नसेल, खोकला येत असेल किंवा कोणतीही हालचाल करत नसेल तर CPR सुरू करा.

– जखमी व्यक्तीचे शरीर थंड पडू न देण्याचा प्रयत्न करा.

– ज्या ठिकाणी ते जळले आहे त्या ठिकाणी पट्टी किंवा औषध लावावे. मात्र ब्लँकेट किंवा चादर वापरू नये, कारण ब्लँकेटचे दोरे जळलेल्या त्वचेला चिकटू शकतात.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.