Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी पायी चालताय? जाणून घ्या कितीवेळ चालणे फायदेशीर

चालण्याचा व्यायाम केल्यामुळेही शरीराचे वाढलेले वजन कमी होऊ शकते. किती वेळ आणि किती अंतर चालणे गरजेचे आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे.

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी पायी चालताय? जाणून घ्या कितीवेळ चालणे फायदेशीर
वजन कमी करण्यासाठी उपाय Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 01, 2022 | 1:52 PM

Weight Loss: आजकालची व्यस्त जीवनशैली, धावपळीचे जीवन, अपुरी झोप आणि अनियमित खाणं-पिणं यामुळे अनेक लोकांचे वजन वाढलेले दिसते. हे वजन कमी करण्यासाठी (Weight Loss) बहुतांश लोक कठोर वर्कआऊट, व्यायाम (Workout) करण्यावर भर देतात. मात्र फक्त असा व्यायाम केल्यानेच वजन कमी होते, असे नाही. सकाळी- संध्याकाळी चालायला जाऊनही (Walking) वजन कमी करू शकता. जरी या पद्धतीने वजन कमी होण्यास थोडा जास्त वेळ लागत असला तरी चालण्याची योग्य पद्धत असेल तर वजन कमी करणे फारसे कठीण जात नाही. विशेषत: ज्या लोकांना कठोर व्यायाम करणे जमत नाही किंवा त्यासाठी वेळ काढणे शक्य होत नाही, ते लोक सकाळी अथवा संध्याकाळी चालायला जाऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी किती वेळ आणि किती अंतर चालणे गरजेचे आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे.

वजन कमी करण्यासाठी चालणे –

चाला इतकी पावले –

वजन कमी करायची इच्छा असेल तर रोज सुमारे 15,000 पावले चालणे गरजेचे आहे. मोबाईलवरील ॲपमध्ये किंवा स्मार्ट वॉचमधील स्टेप ट्रॅकरद्वारे तुम्ही किती पावलं चाललात याची नोंद ठेवू शकता. दोन्ही पद्धतीने तुमच्या पावलांची नोंद ठेवता येते. आणि हे फक्त सकाळी किंवा संध्याकाळी किती चाललात याचीच नव्हे तर दिवसभर तुम्ही जिथे-जिथे फिराल किंवा चालाल त्या पावलांचीही नोंद ठेवली जाते.

चढावर चालणे –

चालण्याचा व्यायाम करताना सरळ भागात चालण्यऐवजी चढ्या भागावर चालावे. त्यामुळे खूप फरक पडतो. चढावर चालताना जास्त एनर्जी, शक्ती लागते आणि फॅट बर्न होण्यास मदत मिळते. तसेच त्यामुळे स्नायूंचाही व्यायाम होतो व मेटाबॉलिज्मही सुधारते.

हे सुद्धा वाचा

किती मिनिटं चालावे?

दिवसभरात तुम्हाला एकसलग चालणे शक्य नसेल तर 3 वेला कमीतकमी 20 मिनिटे चालावे. 15 ते 20 मिनिटे चालणे हे ब्लड प्रेशरसाठी चांगले ठरते. एकाचवेळी 45 ते 50 मिनिटे चालण्यापेक्षा 3 वेळा 20 मिनिटांपर्यंत चालावे.

जास्तीत जास्त चालावे –

जर तुम्हाला कामाच्या व्यस्ततेमुळे दिवसभरात खूप वेळ चालण्यास वेळ मिळत नसेल तर तुमची रोजची कामे करताना चालण्याचा प्रयत्न करा. एखाद्या ठिकाणी जायचे असेल तर गाडी अथवा रिक्षाने जाण्याऐवजी चालत जावे. तुमची गाडी अथवा कार थोडी दूर पार्क करावी. लिफ्टचा वापर करण्याऐवजी जिन्याचा वापर करावा. तसेच घरच्या -घरी थोडा थोडा वेळ तरी चालत रहावे.

ग्रीन टी –

चालायला जाण्यापूर्वी ग्रीन टी पिणेही चांगले आणि फायदेशीर ठरते. त्यामुळे मेटाबॉलिज्मही सुधारते, ज्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. तसेच फॅट बर्निंग प्रक्रियेचाही वेग वाढतो.

( टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व देण्यात आलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.