Health : शुगर वाढली असेल तर उशिर न करता करा ‘या’ 3 गोष्टी, जाणून घ्या!

काही वेळा तुम्ही निष्काळजीपणा केल्यास तुमच्या शरीरातील शुगरची लेव्हल अचानक वाढू शकते. अशावेळी लोकांना काय करायचे कळत नाही, लोक घाबरून जातात. पण रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढल्यास घाबरून जाण्याची गरज नाही. अशावेळी खाली दिलेल्या टिप्स फॉलो करा जेणेकरून तुम्हाला  शुगरवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. तर आता या आपण टिप्सबाबत जाणून घेणार आहोत.

Health : शुगर वाढली असेल तर उशिर न करता करा 'या' 3 गोष्टी, जाणून घ्या!
मधुमेहImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 26, 2023 | 10:01 AM

मुंबई : सध्याच्या काळात बहुतेक लोकांना डायबिटीसची समस्या असते. ताण तणाव, धावपळीचे जीवन, अनहेल्दी आहार अशा अनेक गोष्टींमुळे मधुमेहाची समस्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसते. तर डायबिटीसची समस्या झाल्यानंतर ती नियंत्रणात आणण्यासाठी आपल्या शरीराची काळजी घेणे खूप गरजेचे असते. डायबिटीस झाल्यानंतर निष्काळजीपणा अजिबात करू नये. आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी व्यायाम करणं, योग्य आहार घेणं, वेळेत औषध घेणे खूप गरजेचे असते.

जर तुमची शुगर अचानक वाढली तर अशावेळी उच्च फायबरयुक्त अन्न खा. यामुळे तुमची साखर नियंत्रणात आणण्यास मदत होईल. तुमच्या रक्तातील साखरेचा संबंध हा बद्धकोष्ठतेशी असतो. जर तुमचे पोट नीट साफ होत नसेल तर तुमच्या रक्तातील साखर वाढू शकते, त्यामुळे अशावेळी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करणे खूप गरजेचे असते. फायबरयुक्त पदार्थ तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात तसेच तुमची शुगर नियंत्रणात आणण्यास मदत होते.

भरपूर पाणी प्या – जर तुम्हाला डायबिटीसचा त्रास असेल आणि शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात आणायची असेल तर भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. पाणी तुमची शुगर नियंत्रणात आणण्यास मदत करते. पाणी हे इन्सुलिनच्या कार्याला प्रभावीपणे प्रोत्साहन देते. त्यामुळे पाणी पिल्यामुळे आपली अचानक वाढलेली शुगर अगदी कमी वेळात नियंत्रणात येण्यास मदत होते. त्यामुळे भरपूर पाणी आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते.

शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. व्यायाम हा आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतो. व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीराची हालचाल होते आणि त्यामुळे आपल्या शरीराला उर्जा मिळते, स्नायू मजबूत होतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात येण्यास मदत होते.

आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.