रणरणत्या उन्हामुळेही पडू शकतात डोळे कोरडे, ही काळजी घेऊन राखा डोळ्यांची निगा

How to Manage Dry Eyes During the Summer: उन्हाळ्यात कोरड्या डोळ्याची समस्या टाळण्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे.

रणरणत्या उन्हामुळेही पडू शकतात डोळे कोरडे, ही काळजी घेऊन राखा डोळ्यांची निगा
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 8:17 AM

नवी दिल्ली : आजच्या काळात वाढते प्रदूषण, धूळ आणि सूर्यप्रकाश, संगणक किंवा लॅपटॉपवर सतत काम करणे, यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या अधिक लोकांमध्ये दिसून येत आहेत. ड्राय आय सिंड्रोम (Dry Eye Syndrome) ही डोळ्यांशी संबंधित एक गंभीर समस्या आहे, या समस्येमध्ये तुमचे डोळे कोरडे होतात. कोरड्या डोळ्यामुळे तुम्हाला डोळ्यांशी संबंधित इतरही अनेक समस्या (eye problem) असू शकतात. उन्हाळ्यात डोळे कोरडे पडण्याची समस्या अधिक वाढते. दीर्घकाळ या समस्येला बळी पडल्याने तुमची दृष्टी कमी (impact on vision) होऊ शकते आणि अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात डोळे कोरडे पडण्याच्या समस्येपासून वाचवण्यासाठी डोळ्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात कोरड्या डोळ्यांची समस्या टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, या लेखात सविस्तर जाणून घेऊया.

डोळे कोरडे पडणे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर डोळ्यातील अश्रू सुकतात. डोळ्यांमध्ये पुरेसा ओलावा नसल्यामुळे तुम्हाला डोळ्यांशी संबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. यामुळे तुमच्या डोळ्यात खाज सुटणे, जळजळ होणे, लालसरपणा आणि वेदना होऊ शकतात.

उन्हाळ्यात डोळे कोरडे पडण्याच्या समस्येचा धोका वाढतो, चला जाणून घेऊया उन्हाळ्यात डोळे कोरडे टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात-

हे सुद्धा वाचा

1) एअर कंडीशनिंगची काळजी घ्या

उन्हाळ्यात डोळे कोरडे पडण्याची डोळ्याची समस्या उद्भवू नये म्हणून, आपण एअर कंडिशनिंगची काळजी घेणे आवश्यक आहे. डोळ्यांमध्ये खूप थंड हवा अचानक गेल्यास तुमच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डोळ्यांतून पाणी येऊ लागते आणि नंतर डोळे कोरडे होऊ शकतात.

2) धूर आणि धूळ टाळा

उन्हाळ्यात धूर आणि धुळीमुळे डोळ्यांशी संबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. यामुळे तुमचे डोळे कोरडे होऊ शकतात. ही समस्या टाळण्यासाठी बाहेर जाताना धूळ आणि धूर टाळण्यासाठी चष्मा अथवा गॉगल वापरावा.

3) स्विमिंग पूलमध्ये जाताना डोळे कव्हर करावेत

उन्हाळ्यात वाढत्या तापमानाचा कहर टाळण्यासाठी लोक स्विमिंग पूलवर जातात. स्विमिंग पूलमध्ये पोहण्यापूर्वी डोळे झाकून घ्यावेत. यामुळे तुमच्या डोळ्यातील पाणी, घाण कमी होईल आणि संसर्गाचा धोका कमी होईल.

4) आय ड्रॉप्सचा वापर करा

डोळे कोरडे होण्याच्या समस्येमध्ये डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर आय ड्रॉप्स वापरावेत. उन्हाळ्यात डोळे कोरडे पडण्याची समस्या टाळण्यासाठी आय ड्रॉप्सचा वापर खूप फायदेशीर आहे.

5) शरीर हायड्रेटेड ठेवावे

उन्हाळ्यात शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे तुम्हाला अनेक गंभीर समस्यांचा धोका असतो. यामुळे तुम्हाला डोळे कोरडे होण्याची समस्या देखील होऊ शकते. त्यामुळे डोळ्यांचे नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे.

डोळे कोरडे पडत असल्याची समस्या दिसल्यास अथाव तशी लक्षणे आढळल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. योग्य वेळी उपचार घेतल्यास, तुम्ही या गंभीर समस्येचे बळी होण्यापासून टाळू शकता. याशिवाय उन्हाळ्यात डोळे कोरडे पडण्याची समस्या टाळण्यासाठी वर नमूद केलेल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.