Strees Health : धावपळीच्या जीवनाध्ये वाढतोय स्ट्रेस, घाबरू नका फक्त करा ही एक गोष्ट करून पाहा
तुमच्यावरही जास्त प्रमाणात स्ट्रेस असेल किंवा तुम्ही स्ट्रेस घेत असाल तर यातून तुमची सुटका करण्यासाठी काय केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याबाबत आपण जाणून घेणार आहोत. जेणेकरून तुम्हाला गंभीर समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
मुंबई : आजकालच्या जीवनात लोक मोठ्या प्रमाणात व्यस्त आयुष्य जगताना दिसतात. मग कामाचा ताणतणाव, आर्थिक परिस्थिती किंवा वैयक्तिक काही गोष्टी अशा अनेक गोष्टींमुळे लोकांवरती खूप स्ट्रेस असतो. तसेच सध्याच्या काळात लोक त्यांच्या कामांमध्ये खूपच बिझी असतात आणि कामाचा त्यांच्यावर ताण देखील असतो. कामाच्या तणावामुळे लोकांची खूप चिडचिड होते, तसेच याचा त्यांच्या शरीरावरती परिणाम देखील होताना दिसतो. आजकाल बहुतेक लोक स्ट्रेसमध्ये असतात आणि त्यांच्या स्ट्रेसचा परिणाम त्यांच्या शरीरातील हार्मोन्सवर होतो. मग काही लोकांचे पोट वाढणे, मधुमेह होणे किंवा डिप्रेशन येणे अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो.
स्ट्रेस कमी करण्यासाठी नेहमी हसत राहिलं पाहिजे. हसल्यामुळे आपल्या शरीरात हॅप्पी हार्मोन्स तयार तयार होतात जे आपलं डोकं शांत करण्यास मदत करतात. त्यामुळे प्रत्येकाने नेहमी आनंदी राहायला पाहिजे, हसत राहिलं पाहिजे. तसंच तुम्हाला तुमचा स्ट्रेस कमी करायचा असेल तर नेहमी कॉमेडी चित्रपट बघा, जोक्स वाचा यामुळे तुम्ही नेहमी हसत राहाल.
जर तुम्हाला तुमचा स्ट्रेस कमी करायचा असेल तर मेडिटेशन करणं खूप गरजेचे आहे. मेडिटेशन केल्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळते. तसेच तुमचा स्ट्रेस कमी होण्यास मदत होते, लठ्ठपणा, मधुमेह अशा अनेक समस्यांपासून देखील सुटका मिळवण्यास तुम्हाला मदत होते. त्यामुळे मेडिटेशन करणे खूप गरजेचे आहे.
जेव्हाही तुमच्यावर जास्त प्रमाणात स्ट्रेस असेल अशावेळी एकटे राहू नका. एकटे राहिल्यामुळे मनात नकारात्मक विचार येतात यामुळे आणखीन तुमचा ताणतणाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत, परिवारासोबत हसत खेळत राहा यामुळे तुमचा स्ट्रेस कमी होण्यास मदत होईल.
जेव्हा तुमच्यावरती खूप ताणतणाव असेल तेव्हा तुमच्या शरीराला आराम देणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे कितीही स्ट्रेस असला तरी स्वतःला वेळ द्या, आराम करा. शरीराला आराम दिल्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळते आढि तुमचा स्ट्रेस कमी होण्यास मदत होते.