डिलीवरी नंतर अर्धवट सोडलेले करीअर पूर्ण करायचे स्वप्न पाहताय? तर काही टिप्सच्या आधारे पुन्हा घेऊ शकता गगन भरारी!
प्रेग्नेंसी अनेक प्रकारच्या समस्या समोर येत असतात त्याचबरोबर डिलिव्हरी झाल्यानंतर अनेक महिलांना मुलांची चिंता सतावत असते. या सगळ्या परिस्थितीत आपले अर्धवट सोडलेले करीअर पुन्हा सुरू करणे अनेक महिलांसाठी आव्हानात्मक ठरते जर तुमच्यासोबत सुद्धा असेच काही घडत असेल तर आज आम्ही तुम्हाला तुमचे अर्धवट सोडलेले करिअर पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही लवकरच मोठी गगन भरारी घ्याल.
मुंबई : आई बनणे सोपे नसते. मातृत्व अशी एक सत्वपरीक्षा आहे की ज्यातून महिला अनेक दिव्य पार पाडत असते. प्रेग्नेंसी (Pregnancy)च्या दरम्यान अनेक समस्या उद्भवत असतात त्याचबरोबर डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा अनेक महिलांना सुरुवातीच्या वेळेत मध्ये आपल्या नवजात बालकांना कडे लक्ष देणे गरजेचे ठरते त्याशिवाय आपल्या बाळाची काळजी घेणे ,त्याचे संगोपन करणे, त्याला काय हवे आहे काय नको आहे या सर्व गोष्टींची काळजी आईला घ्यावी लागते. या सगळ्या परिस्थितीत जर तुम्ही प्रेग्नेंसी अगोदर कोठे काम करत असाल आणि डिलिव्हरी ( Delivery)नंतर या सर्व जबाबदाऱ्यांमधून तुमचे करिअर पुन्हा सुरू करण्याचे विचार करत असाल किंवा स्वप्न पाहत असाल तर अशावेळी महिलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता जाणवू लागते तसेच नऊ महिन्याचा जो गॅप पडलेला आहे त्यामुळे सुद्धा महिलांना नव्याने आपला नोकरीचा, व्यवसायाचा प्रवास सुरू करण्यासाठी खूप वेळा विचार करावा लागतो आणि म्हणूनच अनेक महिलांना नव्याने व्यवसाय किंवा करीअर( Career) सुरू करणे आव्हानात्मक ठरते.
अनेकदा आपल्या आजूबाजूला पाहतो पाहतो की आत्मविश्वासाची कमतरता निर्माण झाल्यामुळे अनेक महिला भविष्यात आपल्या करीअरवर पाणी सोडतात आणि घरामध्ये गृहिणी म्हणूनच राहून आपल्या स्वप्नांवर पाणी सोडतात.जर तुम्ही करीअर ओरिएंटेड महिला आहात आणि डिलिव्हरी नंतर अर्धवट सोडलेले करीअर पूर्ण करण्याची इच्छा मनामध्ये असेल तर अजिबात चिंता करू नका. आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत ,ज्या टिप्स ना तुम्ही फॉलो केले तर तुमच्यासाठी काहीच अशक्य ठरणार नाही चला तर मग जाणून घेवूया त्याबद्दल.
स्वतःला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करा
अनेक महिला डिलिव्हरी झाल्यानंतर मुलांचे पालन संगोपन करण्यात मध्ये एवढे व्यस्त होऊन जातात की स्वतः कडे लक्ष देत नाही. या सर्व कारणांमुळेच महिलांच्या बाबतीत अनेकदा आत्मविश्वासाची कमतरता जाणवून येते. जर तुम्हाला तुमचे अर्धवट सोडलेले करीअर पुन्हा सुरू करायचे असेल तर अशावेळी तुमच्या क्षेत्राशी जोडली गेलेली प्रत्येक माहिती मध्ये अपडेट राहायला शिका. तुमच्या क्षेत्रांमध्ये नवीन कोणत्या गोष्टी घडत आहेत याबद्दल नेहमी अपडेट राहण्याचा प्रयत्न करा.
योग्य प्लॅनिंग करूनच गॅप घ्या
जर तुम्हाला तुमच्या मुलाबरोबरच तुमच्या करीअरवर पूर्ण लक्ष केंद्रित करायचे असेल तर अशावेळी प्रेग्नेंसीच्या दरम्यान योग्य प्लॅनिंग करून ठेवा. तुम्हाला कधी पर्यंत कार्य करायचे आहे. कधी ब्रेक घ्यायचा आहे याबद्दलची निर्णय योग्य वेळी ठरवा आणि त्यानंतरच नवीन सुरुवात करा. अनेकदा आपण पाहतो की अनेक महिला योग्य प्लॅनिंग करत नाही आणि त्यामुळेच अनेक समस्यांना सामोरे जावे लागते परंतु तसे न करता जास्त गॅप निर्माण होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर योग्य प्लॅनिंग आवश्य करा.
वर्क फ्रॉम होम कोरोनाच्या काळामध्ये अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. हल्लीच्या दिवसात वर्क फ्रॉम होम ही नवीन संस्कृती उदयास आलेली आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या संगोपनाची बद्दल चिंता सतावत असेल तर अशावेळी तुम्ही वर्क फ्रॉम होम या पर्यायचा सुद्धा विचार करू शकता यामुळे तुमचे तुमच्या मुलांवर लक्ष देखील राहील आणि तुमच्या करीअरची सुरुवात सुद्धा नव्याने करण्यास मदत होईल.
नेहमी सकारात्मक राहा
खूप मोठ्या गॅपनंतर जर तुम्ही एखाद्या इंटरव्यूसाठी जात असेल तर अशा वेळी चिंता अजिबात करू नका. अगदी सकारात्मक विचार करा आणि जो तुमचा इंटरव्यू घेणार आहे त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोनातून माहिती करून द्या जेणेकरून तुमच्या इंटरव्यूववर कोणताही प्रकारचा नकारात्मक प्रभाव पडणार नाही. जर तुम्ही नेहमी अपडेट राहण्याचा प्रयत्न कराल तर तुमच्या करीयर संबंधित असलेली जागरूकता मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होईल. म्हणून अशावेळी तुम्हाला किती महिन्याचा गॅप आहे याचा कोणताच फरक पडणार नाही म्हणून प्रत्येक वेळी प्रत्येक कामाबद्दल नेहमी सकारात्मक विचार करा आणि त्याचा सकारात्मक दृष्टिकोनातून नेहमी योग्य पाऊल टाका.
इतर बातम्या-
Mahesh Manjarekar : महेश मांजरेकरांचं कॉन्ट्रॅक्ट संपलं, आता बिग मराठीचं सूत्रसंचालन कोण करणार?
रात्रीची थंडी असह्य होतेय? स्वेटर घालूनच झोपताय? सावध रहा, याचे दुष्परिणाम आधी वाचून घ्या!