Men Health Tips: हवे सुखी वैवाहिक जीवन? ही लक्षणे जाणवताच करुन घ्या फर्टिलिटी टेस्ट
महिला असो वा पुरुष , फर्टिलिटी टेस्ट दोघांसाठीही महत्वपूर्ण असते. वाढत्या वयानुसार, दोघांचीही प्रजनन क्षमता (Fertility) कमी होऊ लागते. खराब जीवनशैली, आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे मुलं होण्याच्या क्षमतेवर गंभीर परिणाम (Serious Consequences) होऊ शकतात. स्त्री असो वा पुरुष धावपळीचे जीवन, ताणतणाव याचा परिणाम दोघांच्या प्रजनन क्षमतेवर होऊ शकतो. अयोग्य आहार, पुरेशी जोप न घेणे, मानसिक […]
महिला असो वा पुरुष , फर्टिलिटी टेस्ट दोघांसाठीही महत्वपूर्ण असते. वाढत्या वयानुसार, दोघांचीही प्रजनन क्षमता (Fertility) कमी होऊ लागते. खराब जीवनशैली, आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे मुलं होण्याच्या क्षमतेवर गंभीर परिणाम (Serious Consequences) होऊ शकतात. स्त्री असो वा पुरुष धावपळीचे जीवन, ताणतणाव याचा परिणाम दोघांच्या प्रजनन क्षमतेवर होऊ शकतो. अयोग्य आहार, पुरेशी जोप न घेणे, मानसिक ताण-तणाव, धूम्रपान, मद्यपान, मोबाईल रेडिएशन, इत्यादी बाबींचाही प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होऊ शकतो व त्यामुळे गर्भधारणेत अडचण येऊ शकते. त्यामुळे दोघांनीही फर्टिलिटी टेस्ट (Fertility Test) करुन घेणे गरजेचे असते. इनफर्टिलिटीची (वंध्यत्व) लक्षणे अशी दिसून येत नाहीत, पण तरीही त्यासंदर्भातील चाचणी करणे महत्वाचे असते. सुखी वैवाहिक जीवन हवे असेल तर पुरुषांनाही फर्टिलिटी टेस्ट करुन घ्यावी. अशी कोणतीही लक्षणे जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित चाचणी करावी. तज्ज्ञांनुसार, ज्या लोकांना टेस्टिक्युलर डॅमेज , इरेक्टाइल डिसफंक्शनचा त्रास सहन करावा लागतो, किंवा ज्यांची कर्करोगाची ट्रीटमेंट सुरु असेल, अथवा युरिनरी ट्रॅकची शस्त्रक्रिया झाली असेल अशा लोकांनी फर्टिलिटी टेस्ट जरुर करून घ्यावी.
मेडिकल हिस्ट्री असेसमेंट ( Medical History Assessment)
यामध्ये डॉक्टर्स पुरुषांमधील इनफर्टिलिटीच्या (वंध्यत्व) अनेक कारणांबद्दल , जसे की, अपघात, एखादा ( पूर्वी झालेला ) आजार, शस्त्रक्रिया याबद्दल माहिती सांगू शकतात. तसेच तुमच्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या परिणांमाची माहिती देतात, ज्यावर उपचार केल्यामुळे वंध्यत्वाची समस्या दूर होऊ शकते.
सीमेन ॲनॅलिसीस (Semen Analysis)
सीमेन ॲनॅलिसीसमध्ये ( वीर्य चाचणी) पुरुषांच्या स्पर्मचे ( शुक्राणू) आरोग्य आणि विकास क्षमतेबद्दल माहिती मिळते. शुक्राणूंची संख्या, शुक्राणूंचा आकार आणि त्यांची मूव्हमेंट ( हालचाल) या तीन पातळ्यांवर ही चाचणी केली जाते.
जेनेटिक टेस्टिंग (Genetic Testing)
सीमेन ॲनॅलिसीसमध्ये शूक्राणूंची संख्या कमी आढळल्यास अनुवांशिक कारणांमुळे तुम्हाला वंध्यत्वाचा सामना करावा लागत आहे, हे स्पष्ट होते. त्यानुसार उपचारांची दिशा ठरते.
हार्मोन लेव्हल ब्लड टेस्ट (Hormone Levels Blood Test)
शरीरातील महत्वपूर्ण केमिकल्स असणारे हार्मोन्स, शूक्राणूंचे उत्पादन नियंत्रित करतात. तसेच या हार्मोन्समुळे शारीरिक संबंधांची इच्छा आणि क्षमता यावरही प्रभाव पडतो. हार्मोन्स कमी वा जास्त झाल्यामुळे या सर्व बाबींवर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही फर्टिलिटी टेस्ट करणे गरजेचे आहे.