Health | पोटाची चरबी कमी होत नसेल तर या हार्मोन्सची करून घ्या टेस्ट, जाणून घ्या सविस्तर

लठ्ठपणा कमी करताना , पोटाकडची अतिरिक्त चरबी घालवताना व्यायाम, पथ्य पाळूनही वजन कमी होत नसेल अशावेळी संबंधितांनी हार्मोन्स चाचणी करावी. या सर्व प्रक्रियेत शरीरातील नियंत्रण हार्मोन्स बदल महत्वाची भूमिका बजावते. पोटाची घेरी घटवताना कोणते घटक अडथळे ठरत आहे, याची माहिती हार्मोन्स चाचणीतील अहवालातून समजते.

Health | पोटाची चरबी कमी होत नसेल तर या हार्मोन्सची करून घ्या टेस्ट, जाणून घ्या सविस्तर
Follow us
| Updated on: Mar 05, 2024 | 2:56 PM

मुंबई : आपल्या शरीराच्या वजनाचा काटा आता नियंत्रणा बाहेर जाऊ लागला आहे ही भावनाच प्रत्येकाच्या मनात धडकी भरवते. त्यात भरीस भर म्हणजे पोटावरची वाढती घेरी. वजन कसे कमी करता येईल, यासाठी धावपळ सुरू होते. खाण्याचे पथ्य, व्यायाम यांचा भडीमार सुरू होतो. वजन कमी व्हावे, पोटाची घेरी जावी यासाठी अनेकजण निरोगी जीवनशैली आत्मसात करतात. या धावपळीत पोटाची घेरी काही केल्या जात नाही. याबाबत डॉ. अजय शाह, व्यवस्थापकीय संचालक, निबर्ग अजय शहा प्रयोगशाळा यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

वजन नियंत्रण करताना शरीरातील हार्मोन्सचे कार्य –

माणसाच्या शरीरात हार्मोन्स हे रासायनिक वाहनाचे काम करतात. शरीरातील चयापचयक्रिया, भूक लागणे, शरीरात अन्न गेल्यानंतर पचनक्रियेतून तयार होणाऱ्या चरबीची साठवण करण्याच्या प्रक्रियेचे नियंत्रण हार्मोन्स पार पाडतात. शरीरातील हार्मोन्सच जर अनियंत्रित झाले तर ही संपूर्ण प्रक्रिया बिघडते. परिणामी शरीरातील वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला ब्रेक लागतो. वजन यंत्रणासाठी पोटातील चयापचय क्रिया बाधित होते.

‘या’ हार्मोन्सची चाचणी करायलाच हवी

इन्सुलिन – स्वादुपिंड या अवयवात इन्सुलिन हार्मोन तयार होते. शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याचे महत्वाचे कार्य इन्सुलिन करते. कधीतरी स्वदुपिंडात इन्सुलिन प्रतिरोध स्थिती निर्माण होते. या स्थितीत शरीराच्या पेशी इन्सुलिनला कमी प्रतिसाद देतात, परिणामी रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि पोटावरील चरबीचा साठा वाढू शकतो. शरीरातील इन्सुलिन प्रतिरोध प्रक्रिया जाणून घेण्यासाठी इन्सुलिन चाचणी करता येईल जेणेकरून वजन वाढण्यामागील कारण समजेल.

कॉर्टीस्टॉल – शरीरावर येणाऱ्या ताण-तणावासाठी जबाबदार असलेला हार्मोन म्हणजे कॉर्टीस्टॉल. हा हार्मोन थेट पचनक्रिया आणि चरबी साठवणुकीच्या प्रक्रियेशी संबंधित आहे. तीव्र ताणामुळे कॉर्टीस्टॉलची पातळी वाढू शकते, परिणामी ओटीपोटावर चरबी जमा होते. सकाळी आणि संध्याकाळी शरीरातील कॉर्टीस्टॉल या हार्मोनची पातळी वेगवेगळी असते. त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळ या दोन प्रहारात

कॉर्टीस्टॉल चाचणी करणे आवश्यक ठरते. या चाचणींद्वारे शरीरावर येणाऱ्या तणावाची नेमकी पातळी समजून घेण्यास मदत होते. तुमचे शरीर तणावाच्या कोणत्या पातळीचा सामना करते आहे, याची माहिती मिळाल्यास वजन नियंत्रणातील बाधाही लक्षात येईल.

थायरॉईड हार्मोन्स – (टी३, टी४,टीएसएच)

थायरॉईड ग्रंथीमधून तयार होणाऱ्या हार्मोन्सचा शरीरातील चयापचय क्रियेवर थेट परिणाम होतो. थायरॉईड हार्मोन्स सक्रिय नसेल (याला हायपोथायरॉईडीझम असे संबोधले जाते.) तर शरीरातील पचनक्रिया मंदावते आणि वजन वाढते. थायरॉईडवर नियंत्रण ठेवणारे टीएसएच हार्मोन (टीएसएच) तसेच थायरॉक्साईन (टीफोर), ट्रीओथायरोलाईन (टी४) या तिन्ही हार्मोन्सच्या चाचण्या केल्यानंतर थायरॉईडच्या कार्यपद्धतीत झालेला बिघाड लक्षात येतो.

लॅप्टीन

शरीरातील चरबी वाढवणाऱ्या रक्तातील (पेशिंमधून) लॅप्टीन हार्मोन निर्माण होतो. माणसाला भूक लागणे, शरीरातील अन्न पचवणे या दोन महत्त्वाच्या प्रक्रियेवर लॅप्टीन हार्मोन काम करते. कधीकधी मेंदू या कार्यात बिघाड आणतो. जर मेंदूने लॅप्टीन कडून येणाऱ्या सिग्नलला योग्य प्रतिसाद दिला नाही तर लॅप्टीन प्रतिरोध नामक स्थिती निर्माण होते. माणसाला गरजेयुक्त अन्नापेक्षाही जास्त भूक लागते आणि भरमसठ वजन वाढते. पोटावर वाढणाऱ्या चरबीचे लॅप्टीन हार्मोन हे प्रमुख कारण बनते. लॅप्टीनच्या पातळीची चाचणी केल्याने लेप्टिनची कार्यपद्धती आणि वजन कमी होण्यावर त्याचा परिणाम तपासण्यात मदत होऊ शकते.

वजन वाढीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या सर्व हार्मोन्सच्या चाचण्या केल्यानंतर थेट डॉक्टर किंवा पोटविकारतज्ञांना भेटा. शरीरावरील अतिरिक्त वजन, पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी अहवालातून समोर येणाऱ्या निष्कर्षांमधून तज्ञ मंडळीच योग्य मार्गदर्शन करतात. तुमच्या शरीरात नेमकी कशाची कमतरता आहे हे जाणून घेतल्यानंतर जीवनशैलीत आवश्यक बदल, जेवणातील पथ्य बदल, तणाव व्यवस्थापन, हार्मोन बदल थेरपी, हार्मोनल असंतुलन दूर करण्यासाठी औषध आदी उपाययोजनांबाबत तज्ज्ञ शिफारस करतात.

सातत्याने उपाययोजना करूनचाचणी अहवालानंतर उपाययोजना –ही पोटाची घेरी कमी होत नसेल तर मनात चिडचिड निर्माण होते, मन वैफल्यग्रस्त होते. शरीरातील हार्मोन्स असंतुलित होत असल्यास इन्सुलिन, कॉर्टीस्टॉल, थायरॉईड हार्मोन्स, लॅप्टीन पातळी या घटकांवर होणारा बिघाड हार्मोन्स चाचणीमधून लक्षात येतो. हार्मोन्स चाचणी, त्यावर आधारित उपचार पद्धती आत्मसात केल्यास वाढत्या वजनावर यशस्वीरित्या मात करता येते. पोटाची घेरीही पूर्णपणे घालवायची असेल तर हार्मोन्स चाचणीला पर्याय नाही. तुम्हाला तज्ञांची मदत घ्यावीच लागणार. योग्य उपचार पद्धती सुरू केल्यास पोटाची घेरी कायमची निघून जाईल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.