धावल्यानंतर तुमच्याही गुडघ्यात होतात नेहमी वेदना ? या 4 टिप्स फॉलो करून गुडघेदुखीला करा बाय-बाय

Knee Pain After Running : धावण्याचा व्यायाम केल्यानंतर काही लोकं तीव्र गुडघेदुखीची तक्रार करतात. अशा परिस्थितीत तुम्ही काही सोप्या टिप्सचा अवलंब करू शकता.

धावल्यानंतर तुमच्याही गुडघ्यात होतात नेहमी वेदना ? या 4 टिप्स फॉलो करून गुडघेदुखीला करा बाय-बाय
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 10:25 AM

नवी दिल्ली : आजच्या काळात लोक स्वतःला फिट ( to be fit) ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात. या प्रयत्नांमध्ये विविध व्यायाम तसेच नियमितपणे धावणे (running exercise) हे देखील समाविष्ट असते. पण अनेकवेळा धावताना किंवा धावल्यानंतर लोकांना अचानक गुडघेदुखी होते, (knee pain) त्यामुळे उठणे आणि चालणे कठीण होते. अशा परिस्थितीत धावणे शक्य होत नाही. ही परिस्थिती टाळण्यासाठी, धावण्याआधी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स फॉलो कराव्या लागतील, ज्यामुळे तुम्ही गुडघेदुखी आणि पेटके येण्याची समस्या टाळू शकता.

धावताना अथवा नंतर होणाऱ्या गुडघेदुखीपासून कसा करावा बचाव ?

धावण्यापूर्वी करा वॉर्मअप

धावल्यानंतर तुम्हाला गुडघेदुखी किंवा पायात क्रॅम्प्स येण्याचा त्रास होत असेल, तर हा आधी वॉर्मअप न केल्याचा परिणाम असू शकतो. त्यामुळे जेव्हाही तुम्ही धावत असाल तेव्हा आधी वॉर्मअप करायला विसरू नका. वॉर्मअप करण्यासाठी, धावण्यापूर्वी धिम्या गतीने चाला किंवा थोडे धावा. यामुळे गुडघेदुखीची समस्या बऱ्याच अंशी कमी होऊ शकते.

शरीर ठेवा हायड्रेटेड

धावल्यानंतर गुडघेदुखीची अस्वस्थता कमी करण्यासाठी तुम्हाला तुमचे शरीर हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. वास्तविक, अनेक वेळा शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे, स्नायूंमध्ये क्रॅम्प्स आणि पेटके येणे सारख्या समस्यांची शक्यता वाढते. ही परिस्थिती टाळण्यासाठी, आपण धावल्यानंतर शरीर हायड्रेटेड ठेवणे आवश्यक आहे. दिवसभरात थोड्या – थोड्या वेळाने पुरेसे पाणी पीत रहावे.

आईस पॅकने शेकावे

जर तुम्हाला धावल्यानंतर वेदना किंवा क्रॅम्पिंग वाटत असेल, तर बर्फाने शेक घेणे हे तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. लक्षात ठेवा गुडघ्याला बर्फाने फक्त 15 मिनिटे शेक द्या. यापेक्षा जास्त वेळ गुडघे शेकू नका. याशिवाय तुम्ही तेलानेही मसाज करू शकता. यामुळे दुखण्यापासून बऱ्याच अंशी आराम मिळेल.

योग्य मापाचे बूट घालावेत

काही वेळा योग्य आकाराचे आणि चांगल्या दर्जाचे बूट न ​​घातल्याने गुडघे आणि पाय दुखण्याची तक्रारही होऊ शकते. म्हणून, बूट खरेदी करण्यापूर्वी, आपल्या पायांचा आकार आणि बुटाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या. त्यामुळे धावताना दुखणे आणि पेटके येण्याची समस्या बऱ्याच अंशी कमी होऊ शकते.

धावल्यानंतर तुम्हाला गुडघेदुखी किंवा पेटके येण्याची तक्रार असेल तर या सोप्या टिप्सचे अनुसरण करा. यामुळे तुमची समस्या बर्‍याच प्रमाणात आटोक्यात येईल. तसेच, जर तुमची समस्या खूप वाढत असेल तर अशा परिस्थितीत तज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.