नवीन वर्षांत काही संकल्प केले असतील. आजारांपासून दूर राहायचे असेल तर काही सवयी लावून घ्याव्या लागतील. आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणावा लागेल. तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलून आरोग्यसंपन्न राहू शकता.
उशिरापर्यंत झोपणे वाईट सवय आहे. म्हणून सकाळी उठण्याची सवय लावा. आरोग्यसंपन्न राहण्यासाठी दिवसाची सुरुवात एखादं फळ खाऊन करा. एकवीस दिवसांत तुम्हाला याची सवय लागेल. रात्री नऊ वाजतापूर्वी जेवण करा. जेवणानंतर अर्धा तास हळूहळू चाला.
नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचे जेवण याचा प्लान तयार करा. नाश्ता आणि दुपारचे जेवण चांगले घेऊ शकता. परंतु, रात्री सहज पचन होईल, असे जेवण करा. आपल्या आहारात प्रोटीन, कॅल्शियम आणि फायबरसारखे पोषक तत्त्व असणारे अन्न घ्या.
ताज्या, ऋतुनुसार होणारा आणि घरी बनविलेला आहार जास्त पौष्टिक असतो.
म्हणून ऋतुनुसार खाण्याच्या वस्तू निवडा. ताज्या वस्तू खा. घरी बनलेल्या वस्तू खाण्याची सवय लावा. सगळे आजार दूर पळतील. हिरवा भाजीपाला भरपूर प्रमाणात सेवन करा. त्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन, झिंक, न्यूट्रीएंट्स असतात. हे आपल्याला आरोग्यसंपन्न राहण्यासाठी मदत करतात.
आरोग्यसंपन्न राहण्यासाठी मनाचं आरोग्य चांगलं राहणं आवश्यक आहे. यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा. सहा-ते आठ तास झोप घ्या. तुमचा मेंदू योग्य पद्धतीनं काम करेल. तणावरहीत राहालं. चांगली पुस्तकं वाचा, संगीत ऐका आणि वेळ काढून फिरायला जा.
पाणी चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. एक पुरुषानं रोज जवळपास साडेतीन लीटर पाणी घेतले पाहिजे. तर महिलेनं तीन लीटर पाणी घेतले पाहिजे. पाणी आपल्या शरीरातील विषारी तत्व शरीराच्या बाहेर काढतात.
तुम्हाला रोज व्यायाम करण्याची सवय लावली पाहिजे. यासाठी जीम किंवा फिटनेस सेंटरला जाण्याची आवश्यकता नाही. घरी राहूनही तुम्ही व्यायाम करू शकता. आठवड्यातील पाच दिवस रोज ४५ मिनिटे वर्कआउट केल्यास तुम्ही फिट राहाल.
बाहेरचे तळलेले, मसालेदार पदार्थ खाऊ नये. जास्त साखर किंवा मिठाचे पदार्थ टाळले पाहिजे. जंक फूड तर अजिबात खाऊ नये. ते तब्येतीवर वाईट परिणाम करतात.
कोरोनाकाळात हे जास्त प्रचिलीत झाले. कारण हाताने आपण जेवण करतो. हातावर जंतू आल्यास ते सरळ आपल्या पोटात जातात. त्यामुळं वारंवार हात धुणे अत्यंत आवश्यक आहे. शिवाय चांगली संगत आपण ठेवली पाहिजे.