Health : हिवाळ्यामध्ये कमी पाणी पित असाल तर होऊ शकतात हे गंभीर आजार, दिवसात इतकं ग्लास पाणी प्यायचंच

कमी पाणी पिल्यामुळे आपले शरीर हायड्रेट राहत नाही त्यामुळे शरीरातील घाण देखील निघून जात नाही. त्यामुळे पाणी पिणे खूप गरजेचे आहे. पाणी पिल्यामुळे आपले शरीर दिवसभर हायड्रेट राहते तसेच शरीरातील घाण देखील बाहेर काढून टाकते. तर थंडीच्या दिवसांमध्ये कमी पाणी पिल्यामुळे नेमके काय दुष्परिणाम होतात याबाबत आता आपण जाणून घेणार आहोत.

Health : हिवाळ्यामध्ये कमी पाणी पित असाल तर होऊ शकतात हे गंभीर आजार, दिवसात इतकं ग्लास पाणी प्यायचंच
पाणी: पाणी भरपूर प्यायलं की डिहायड्रेशन होत नाही. डिहायड्रेशनने खूप भूक लागते त्यामुळे भरपूर पाणी प्यायलं तर शरीर हायड्रेटेड राहतं आणि अर्थातच भूक लागत नाही. उपवासाच्या दिवसात सतत पाणी पिणे खूपच महत्त्वाचे आहे. लिंबूपाणी प्यायल्याने सुद्धा भुकेवर नियंत्रण राहते. पाण्याने पचन सुद्धा चांगले होते. महत्त्वाचं म्हणजे भूक कमी लागते.
Follow us
| Updated on: Dec 07, 2023 | 9:10 PM

मुंबई : सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. थंडीच्या या दिवसांमध्ये अनेक आजार निर्माण होत असतात. मग ताप, थंडी, सर्दी, खोकला असे अनेक आजार निर्माण होताना दिसतात. त्यात थंडीच्या दिवसात लोक जास्त पाणी पित नाहीत. कारण हिवाळ्यामध्ये जास्त तहान लागत नाही. त्यामुळे लोकं फार कमी पाणी पितात. मग कमी पाणी पिल्यामुळे त्याचे आपल्या शरीरावर दुष्परिणाम दिसतात. मग लोकांना अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो.

किडनीवर वाईट परिणाम- जर तुम्ही थंडीच्या दिवसांमध्ये कमी पाणी पिलं तर त्याचा तुमच्या किडनीवर वाईट परिणाम होतो. किडनीवर कोणताही परिणाम होऊ द्यायचा नसेल तर भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर किडनीवर दबाव येतो, त्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा ट्रॅकमध्ये जळजळ अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये तहान जरी लागली नाही तरी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.

अशक्तपणा येतो –  थंडीच्या दिवसांमध्ये कमी पाणी पिले तर शरीरात अशक्तपणा निर्माण होतो. पाण्याच्या कमतरतामुळे आपले शरीर कमजोर होते त्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताची, ऑक्सिजनची कमतरता भासते. मग आपल्याला थकवा येतो अशक्तपणा येतो. त्यामुळे प्रत्येकाने भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.

पोटाशी संबंधित आजार – शरीरात पाण्याची कमतरता असेल तर त्याचा परिणाम आपल्या पोटावर होतो. मग बद्धकोष्ठतापासून ते अन्नपचनाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. तर अशा गंभीर समस्यांचा सामना करायचा नसेल तर भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.

त्वचा निस्तेज होते – शरीरात पाण्याची कमतरता असेल तर आपले शरीर हायड्रेट राहत नाही. तसेच शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे आपली त्वचा निस्तेज होते म्हणजेच आपली त्वचा कोरडी पडते. त्यामुळे जर तुम्हाला तुमची त्वचा कोरडी पडू द्यायची नसेल आणि दिवसभर ओलसर ठेवायची असेल तर दररोज पाच ते सात ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे यामुळे आपली त्वचा निरोगी आणि चमकदार राहते.

थंडीच्या दिवसांमध्ये निरोगी राहायचे असेल तर भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने तीन ते चार लिटर पाणी पिणे खूप गरजेचे आहे. थंडीच्या दिवसांमध्ये गंभीर आजारांपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर दिवसाला सात ते आठ ग्लास पाणी प्या, यामुळे तुम्हाला कोणतेही आजार होणार नाहीत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.