वारंवार बारबेक्यू मटण खात असाल तर थांबा; कर्करोग होण्याचा धोका? कसे ते पाहा
बारबेक्यू किंवा तळलेले मटण जर तुम्हाला खूप आवडत असेल तर थोडं थांबा. कारण जास्त प्रमाणात बारबेक्यू मटणचे सेवन केल्याने कर्करोगाचा धोका नक्कीच वाढू शकतो असं म्हणतात. तर पाहुया नेमकं काय कारण आहे.
नॉनवेज म्हटलं की मासे, चिकन , अंडी असतातच पण काहींना मटण खायला खूप आवडतं. मांसाहारामध्ये मटण खाणारे खवय्येही खूप आहेत. पण जर तुम्ही अतिप्रमाणात मटण खात असाल तर त्याच्या परिणाम नक्कीच तुमच्या शरिरावर होऊ शकतो आणि तेही थेट कर्करोगाच्या स्वरुपात.
‘ग्रील्ड मटण’ खाणे आरोग्यासाठी नुकसानकारक
मटणामध्ये ‘ग्रील्ड मटण’ खाणे आरोग्यासाठी नुकसानकारक मानले जाते. कारण उच्च तापमानात ग्रील केलेल्या मांसाबद्दल तुमचे प्रेम तुम्हाला कर्करोगाकडे ढकलू शकते आणि तुम्हाला कळणारही नाही.
असं म्हटलं जातं की उच्च तापमानात मांस शिजवल्याने अनेक समस्यांना सामना करावा लागू शकतो. त्यामध्येच येत ग्रील्ड मटण खाणे. हे मटण आरोग्यासाठी किती हानिकारक आहे? त्यामागचे कारण काय आहे ते पाहुया.
तज्ज्ञांच्या मते, उच्च तापमानात मांस शिजवल्याने शरीरात विविध रासायनिक प्रतिक्रिया आणि बदल होतात. त्या रासायनिक प्रक्रियंमुळे शरिरात कर्करोग पसरण्याचा धोका असतो. Maillard रिएक्शन ही अमिनो ऍसिड आणि साखर यांच्यातील रासायनिक प्रतिक्रिया आहे, ज्यामुळे मांसाला रंग आणि चव मिळते.
Maillard रिएक्शनसाठी उच्च तापमानात अन्न शिजविणे आवश्यक आहे, जे मांस अधिक स्वादिष्ट बनवते, परंतु याचमुळे कर्करोग होण्याचे प्रमाणही वाढते?
‘ग्रील्ड मटण’ धोकादायक कसे? उच्च तापमानात मांस शिजवणे, विशेषत: मोठ्या फ्लेमवर शेकणे किंवा भाजणे, यामुळे HCAs म्हणजे हेटरोसायक्लिक अमाइन आणि PAHs म्हणजे पॉलीसायक्लिक सुगंधी हायड्रोकार्बन्स सारखी रसायने तयार होतात, जी शरिरासाठी अत्यंत हानिकारक असतात. याच रसायनांमुळे मांस शिजत असताना ते रसाळ दिसतात आणि त्यातून धूरही निघू लागतो, ज्यामुळे मांसाचे कार्सिनोजेनिक गुणधर्म वाढू शकतात. त्यामुळे ‘ग्रील्ड मटण’ धोकादायक मानले गेले आहे.
मांस कमी उष्णतावर शिजवणे आणि शिजवण्यापूर्वी मॅरीनेट करणे कधीही उत्तम. उच्च आचेवर मांस शिजवल्याने कर्करोगाचा धोका वाढू शकतो. मांसाचे तुकडे थायम किंवा रोझमेरीने मॅरीनेट केले पाहिजेत, कारण या औषधी वनस्पतींमध्ये असलेले गुणधर्म उष्णतेच्या संपर्कात असताना मांसातील कार्सिनोजेनिक गुणधर्मांना रोखू शकतात. त्यामुळे कदाचित कर्करोगाचा धोका हा टळू शकतो.