डायबिटीज असेल तर हे पदार्थ बिनधास्त खा, नाही वाढणार शुगर लेव्हल, पाहा कोणते ?
डायबिटीज भारतात वेगाने पसरत आहे. हा आजार खूपच गंभीर आहे. खराब लाईफस्टाईलमुळे हा आजार होत असतो. या आजारावर उपचार नाही. केवळ डाएट आणि हेल्थी लाईफ स्टाईलद्वारे या आजारावर कंट्रोल मिळवता येते.
डायबिटीज एक न बरा होणारा आजार आहे. या आजाराला चांगले राहाणीमान आणि योग्य आहार तसेच व्यायाम यानेच नियंत्रणात ठेवता येते. चीन नंतर भारत दुसरा सर्वाधिक डायबिटीज पेशंट असणारा देश असल्याचे स्टेटिस्टाचा रिपोर्ट आहे. या आजारावर उपचार नसल्याने केवळ डाएट आणि हेल्थी लाईफस्टाईलच त्यावर नियंत्रण मिळवून देऊ शकते. हा आजारच मूळात खराब लाईफस्टाईलमुळे होतो. त्यामुळे योग्य आहार आणि विहार उपयोगाचा असतो. त्यामुळे डायबिटीजमध्ये काय खाणे आपल्या फायद्याचे पाहूयात…
फळं आणि भाज्या खाव्यात
डायबिटीज रुग्णांसाठी कच्चे केळ, लिची, डाळींब, एव्हाकाडो आणि पेरु खाणे आरोग्यदायी आहे.या आजारात सफरचंद, संत्री, डाळींब, पपई, आणि कलिंगड खाल्ल्याने तुम्हाला चांगले फायबर मिळते. तर केळे, आंबा आणि द्राक्षे सारखे हाय कॅलरीची फळे जास्त खाणे चुकीचे आहे. फ्रुट्स एण्ड व्हेजिटेबल्स ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्ल लो आहे. म्हणजे जो आपल्या शरीरात शुगर हळूहळू रिलीज करतो अशी फळे खाण्याने काही तोटा होत नाही. तसेच योग्य प्रमाणात प्रोटीनयुक्त आहार खावा,त्यासाठी डाळ,स्प्राऊट्स, लीन मीट्स, अंडी, मासे, चिकन खावे.
सॅच्युरेटेड फॅटपासून दूर राहा
ज्या अन्नात फॅट जास्त आहेत. किंवा सॅच्युरेटेड फॅट आहेत असे तळलेले पदार्थ खावू नयेत.
शुगर जास्त असलेले पदार्थ खाऊ नयेत. शुगर जास्त असलेली सरबत पिऊ नयेत.
अल्कोहोल प्राशन करु नये तसेच स्मोकिंग करु नये
रोज फिजिकल एक्टीव्हीटी करा
तुम्हाला रोज किमान २० ते ३० मिनिटे चालले पाहीजे.डायबिटीज पेशंटने उपाशी पोटी चालायला जाऊ नये, थोडे भिजवलेले बदाम किंवा अक्रोड खावेत आणि चालायला जावे. त्यानंतर कोणतेही प्रोटीन इनटेक घेऊ शकता. शुगर असलेल्या लोकांनी उपाशी पोटी व्यायाम करणे धोकादायक असते.
कार्ब्जचा सेवन करणे मर्यादीत करावे
आपण कोणते कार्बोहायड्रेट वापरत आहात त्याची निवड करावी. लोकांना वाटते की कार्बोहायड्रेट अवॉईड केल्याने शुगर कमी होते असे नाही. कार्बोहायड्रेट आपल्या शरीरासाठी सर्वात जास्त एनर्जी देतात. आपण कोणत्या प्रकारचे कार्बोहायड्रेट निवडता त्यावर सर्व अवलंबून आहे. आपण होल ग्रेन, मल्टी ग्रेन खाऊ शकता. बाजरी, नाचणी अशा पासून भाकरी बनवून खाऊ शकता.
( Disclaimer : या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा )