डायबिटीज असेल तर आजपासूनच बंद करा या अन्नपदार्थांचे सेवन, वाढू शकते शुगर लेव्हल
डायबिटीजमध्ये साखर आणि मैद्यापासून तयार झालेले अन्नपदार्थ खायचे नाहीत असे सांगितले जाते. मात्र या आजारातील व्यक्तींनी हे पदार्थ अजिबात खाऊ नयेत असे म्हटले जाते. ते पदार्थ कोणते पाहूयात...
नवी दिल्ली : जगभरात मधुमेहींची संख्या वाढत आहे. आपल्या देशात तर डायबिटीजचे सर्वाधिक रूग्ण आहेत. हा आजार आपल्या रहाणीमानाच्या बदललेल्या सवयींमुळे होणारा आजार आहे. त्यामुळे आपले रहाणीमान आणि आहाराच्या सवयीत बदल करुन आपल्याला या आजारावर नियंत्रण करता येते. या आजारात रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवावे लागते. डायबिटीज जर कायम वाढत राहिला तर त्याचा परिणाम आपल्या डोळे, ह्दयावर आणि अन्य अवयवावर होत असतो. त्यामुळे अशा लोकांनी कोणते पदार्थ टाळावेत ते पाहूयात..
डायबिटीजच्या आजार असलेल्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. लहान वयात देखील हा आजार लोकांना होत आहे. चुकीचा आहार आणि बिघडलेली जीवनशैली यामुळे हा आजार होत असतो. तो आटोक्यात ठेवणे एवढेच आपल्या हातात आहे. रक्तातील साखरेवर नियंत्रण न राहिल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो. साखर वाढल्याने हृदय, मूत्रपिंड, फुफ्फुसे आणि डोळे अशा शरीरातील अनेक महत्त्वाच्या अवयवांचे नुकसान होऊ शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तणावापासून दूर राहणे, शरीर सक्रिय ठेवणे आणि खाण्यापिण्याच्या सवयी बदलणे आवश्यक आहे.
डायबिटीजमध्ये साखर आणि मैद्यापासून तयार झालेल्या वस्तू खायच्या नाहीत असे सांगितले जाते. तशाच अन्य काही वस्तू देखील आहेत. ज्यांना या आजारातील व्यक्तींनी अजिबात खाऊ नये म्हटले जाते. ते पदार्थ कोणते पाहूयात…
हिरवा वाटावा ….
तसे पाहिले तर हिरवा वाटा खाणे हे प्रकृतीसाठी चांगले मानले जाते. परंतू डायबिटीजवाल्यानी मात्र जादा हिरवा वाटाणा खाणे धोकादायक आहे. कारण हिरव्या वाटाण्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते.
स्टार्चवाल्या भाज्या खाऊ नयेत…
डायबिटीजच्या लोकांनी स्टार्च असलेल्या भाज्या खाऊ नयेत. बटाटा आणि रताळे या दोन्हींमध्ये अधिक शर्करा असल्याने या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करू नये असे म्हटले जात आहे.
फास्ट फूट –
आजकाल प्रत्येक जण रेडी टू इट किंवा फास्टफूड खाण्यासाठी प्राधान्य देत असतो. परंतू फास्टफूड खाणे धोकादायक असते. पिझ्झा, बर्गर, पास्ता सारख्या फास्ट फूड पचनासाठी चांगले नसते. त्यामुळे ते डायबिटीजवाल्यासाठी अपायकारक आहे.
मक्याचे कणिस –
अनेकांना मक्याचे कणिस आवडत असते. कारण याचे दाणे चवीला गोड असतात. असे असले तरी ते डायबिटीजवाल्यांच्या प्रकृतीसाठी चांगले नसते. यात अनेक पोषक तत्व असतात. परंतू काब्रोहायड्रेड आणि कॅलरीचे प्रमाण जास्त असल्याने ते शुगर असलेल्यांना चालत नाही.