तुम्ही जी फळं पौष्टिक आहार म्हणून घेताय त्यामुळेच तुमचं वजन वाढतंय; ही फळं आणि त्यांच्या ज्यूसपासून लांबच राहा

जगभरात आजकाल लठ्ठपणाची समस्या वाढतच चालली आहे. लठ्ठपणा रोखण्यासाठी आहारवर नियंत्रण ठेवणे अतिशय गरजेचे आहे.

तुम्ही जी फळं पौष्टिक आहार म्हणून घेताय त्यामुळेच तुमचं वजन वाढतंय; ही फळं आणि त्यांच्या ज्यूसपासून लांबच राहा
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 10:00 AM

नवी दिल्ली : लठ्ठपणा (obesity) ही जगातील एक मोठी समस्या आहे. गेल्या 30 वर्षांत लठ्ठ लोकांची संख्या 3 पट वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (world health organization) च्या मते, लठ्ठपणाने ग्रस्त प्रौढांची संख्या 2 अब्जांपेक्षा जास्त झाली आहे. आजकाल बहुतेक मुलांचे वजनही वाढले आहे. 2020 च्या आकडेवारीनुसार, 5 वर्षांखालील 3.9 कोटी मुलांचे वजन जास्त आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह (diabetes) , हृदयविकार, किडनी समस्या, मेंदूची समस्या अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणूनच लठ्ठपणावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे.

आजकाल हिवाळा असो वा उन्हाळा लोकं तसंही जास्त खात असतात. जर त्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर लठ्ठपणाचा घेर लवकरच वाढेल. म्हणूनच आपल्या आहाराकडे पुरेसे लक्ष देऊन कोणते पदार्थ जास्त वजन वाढवतात हे जाणून घेतले पाहिजे. साधारणपणे, ज्या अन्नात खूप जास्त कॅलरी असतात, ते लठ्ठपणा आणखी वाढवते. जर तुम्हीही वाढलेल्या वजनाने त्रस्त असाल तर उन्हाळ्यात जास्त कॅलरी असलेल्या अन्नपदार्थांना हातही लावू नका, अन्यथा लठ्ठपणा धोकादायक पातळीवर पोहोचेल.

हे सुद्धा वाचा

असं म्हटलं जातं की फळ ही आपल्या आरोग्यासाठी खूफ फायदेशीर असतात. त्यातून आपल्याला पोषक घटक मिळतात, पण काही फळांचे ज्यूसच्या रुपात सेवन केल्याने वजन वाढून लठ्ठपणाचा धोका निर्माण होऊ शकतो.

लठ्ठपणा टाळायचा असेल तर या फ्रुट ज्यूसपासून लांब रहावे

ऑरेंज ज्यूस – हेल्थलाइनच्या बातमीनुसार, जर तुम्ही लठ्ठपणाने त्रस्त असाल, तर तुम्ही बहुतेक फळांचे रस पिऊ नये. फळांपासून जो फायदा मिळतो तो रसातून मिळणार नाही कारण त्यातील फायबरचे प्रमाण कमी होईल आणि साखर म्हणजेच कार्बोहायड्रेट्स वाढतील. अशावेळी संत्र्याचा रस पिणे हे अधिक हानिकारक ठरू शकतो.

स्ट्रॉबेरी ज्यूस – तुम्हालाही लठ्ठपणाचा त्रास असेल तर स्ट्रॉबेरीच्या ज्यूसकडे पाहूही नका. कारण स्ट्रॉबेरीचा ज्यूस हाही वजन वाढवण्यास हातभार लावतो. स्ट्रॉबेरीच्या ज्यूसमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे अनेक रोगांशी लढण्यास मदत करतात, परंतु जेव्हा त्यातील फायबर काढून टाकले जाते तेव्हा त्यामुळे लठ्ठपणा वाढतो.

आंबा – आंबा आवडत नसेल अशी व्यक्ती सापडणे विरळच. आता उन्हाळा सुरू झाला असून थोड्याच दिवसांत घराघरांत आंब्याचा घमघमाट सुटेल. मात्र लठ्ठपणाचा सामना करणाऱ्यांसाठी आंब्याच्या रसाचे सेवन करणे हे फारसे फायदेशीर ठरणार नाही. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आंबा खूप हानिकारक आहे. आंब्याच्या रसाने लठ्ठपणा आणखी वाढेल. आंब्यामध्ये जास्त कॅलरी कार्बोहायड्रेट असते ज्यामुळे वजन झपाट्याने वाढते.आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. म्हणूनच ज्यांना ब्लड शुगरचा त्रास असेल त्या रुग्णांनी जास्त आंबा खाऊ नये.

केळ्यापासून लांब रहावे – कृश व्यक्तींनी केळी खावीत, असा सल्ला तुम्ही अनेक लोकांकडून ऐकला असेल. ही गोष्ट खरी आहे. केळं खाल्ल्याने वजन वाढते. केळं हे अत्यंत आरोग्यदायी फळ आहे. केळ्यामध्ये भरपूर कॅलरीज असतात ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. दिवसातून दोन केळीही खाल्ल्यास वजन वाढण्याचा धोका असतो. म्हणून लठ्ठपणाचा सामना करणाऱ्यांनी केळं खाऊ नये.

ॲव्हाकॅडो – ॲव्हाकॅडो हे देखील एक उच्च कॅलरी असलेले फळ आहे. त्यामध्ये अनेक रोगांशी लढण्याची शक्ती असते परंतु ॲव्हाकॅडो वजन वाढवण्यास देखील कारणीभूत ठरते. म्हणूनच लठ्ठपणाचा त्रास असलेल्या लोकांनी ॲव्हाकॅडोचे सेवन करू नये.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.