Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Foods For Better Sleep : मुझे नींद न आए, मुझे चैन ना आए… रात्री गाढ झोप येत नाही?; ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर

अनेक लोकांना रात्री झोपताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. जेव्हा तुम्ही दिवसा खूप मेहनत करता तेव्हा तुम्हाला रात्री चांगली झोप लागते. पण असे अनेक लोक आहेत ज्यांना दिवसभर थकल्यानंतरही रात्री झोपण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो.

Foods For Better Sleep : मुझे नींद न आए, मुझे चैन ना आए... रात्री गाढ झोप येत नाही?; 'या' गोष्टी ठरतील फायदेशीर
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 1:06 PM

नवी दिल्ली – चांगल्या आरोग्यासाठी जसा सकस आहार (healthy food) आवश्यक आहे, त्याचप्रमाणे गाढ झोपही खूप महत्त्वाची आहे. झोप न मिळाल्याने अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. झोप पूर्ण झाल्यामुळे आपल्या शरीराचे अवयव व्यवस्थित काम करतात, मेंदूचे कार्य सुधारते आणि अनेक आजारांचा धोका कमी होतो. पण काही लोकांना रात्री झोपण्यासाठी खूप अडचणींचा (sleep problem) सामना करावा लागतो. झोपेच्या कमतरतेमुळे लठ्ठपणा, वजन वाढणे (weight gain)आणि स्मृतिभ्रंश यांसारखे गंभीर आजारही होतात. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, प्रत्येक व्यक्तीने रात्री 7 ते 8 तासांची झोप घेतली पाहिजे. पण जर तुम्हाला रात्री लवकर झोप येत नसेल किंवा रात्री मध्येच तुम्हाला जाग येत असेल तर ही समस्या टाळण्यासाठी काही पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया.

नट्स – नट्स हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये अनेक प्रकारची आवश्यक जीवनसत्त्वं आणि खनिजे आढळतात, ज्यामुळे मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. नट्सचे सेवन केल्याने झोपेची गुणवत्ता देखील वाढते कारण ते मेलाटोनिनचे खूप चांगले स्त्रोत आहेत.

कॅमोमाईल टी – कॅमोमाईल टी ही अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याव्यतिरिक्त, ते चिंता आणि तणाव देखील कमी करते आणि त्वचेचे आरोग्य सुधारते. अनेक अभ्यासांनुसार, कॅमोमाईल टी मधील अँटीऑक्सिडंट्स हे मेंदूतील रिसेप्टर्सला प्रोत्साहन देतात, जे तुमची झोप नियंत्रित करतात आणि निद्रानाशाच्या समस्येवर मात करतात.

हे सुद्धा वाचा

तांदूळ – तांदूळ जगभर मोठ्या प्रमाणात वापरला जातो. तांदूळ हा फायबर, पोषक आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतो. तांदळात कार्बोहायड्रेट्स जास्त प्रमाणात असतात आणि त्याचा जीआय इंडेक्सही खूप जास्त असतो. रात्री झोपण्याच्या एक तास आधी भात खाल्ल्याने झोप येण्यास मदत होते.

चेरी – चेरीमध्ये मेलाटोनिन भरपूर प्रमाणात असते जे शरीराच्या अंतर्गत चक्राचे नियमन करण्यास मदत करते. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, झोपण्यापूर्वी मूठभर चेरीचे सेवन केल्याने चांगली झोप येण्यास मदत होते. ताज्या चेरी उपलब्ध नसतील तर चेरीचा रस किंवा फ्रोझन चेरीच्या स्वरूपात देखील तुम्ही त्याचे सेवन करू शकता. ते खूप फायदेशीर सिद्ध होईल.

दूध – रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध पिणे खूप फायदेशीर ठरू शकते. दुधात ट्रिप्टोफॅन आणि सेरोटोनिन असते, त्यामुळे चांगली व शांत झोप येण्यास मदत होते.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.