Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खळखळुन हसाल तर अनेक मानसिक आजार दूर राहतील, लाफ्टर थेरपीचे 8 जबरदस्त फायदे पाहा

हसण्यामुळे तुमचा ताण कमी होतो. कोणत्याही आजारासाठी हे एक अतिशय प्रभावी आणि स्वस्त औषध मानले जाते. एक मोकळे हास्य हे कोणत्याही डॉक्टरकडे न जाता तुम्हाला तणावातून मुक्त करण्यासाठी एक मोफत औषधाचे काम करते.

खळखळुन हसाल तर अनेक मानसिक आजार दूर राहतील, लाफ्टर थेरपीचे 8 जबरदस्त फायदे पाहा
Follow us
| Updated on: Mar 21, 2025 | 2:57 PM

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना ताण आणि तणावाचा सामना करावा लागत आहे. हसल्याने आणि आनंदी राहिल्याने अनेक आजारांपासून आपण दूर रहातो.हसल्याने आपल्या शरीरातील स्रायूंवरील ताण कमी होतो. आपण टीव्हीवरील कार्टून पाहून हसा किंवा न्यूजपेपरमधील जोक वाचून हसा. हसण्याचे अनेक फायदे आहेत. आपल्या हसल्याने ताण कमी होतोच शिवाय तुमच्या मांसपेशींना ४५ मिनिटांपपर्यंत आराम पडतो.त्यामुळे तुम्ही रिलॅक्स होता. हसल्यामुळे शरीरातील ट्रेस हार्मोन लेव्हल कमी होतो. जो शरीराच्या एंटीबॉडीजसाठी फायद्याचा असतो.

हसल्याने हृदयाचे आरोग्य देखील चांगले रहाते. तसेच डिप्रेशन, एंग्जायटी सारख्या मानसिक समस्यांना दूर ठेवण्यास मदत होते. यामुळे हृदयविकार आणि अनेक समस्यांना दूर ठेवण्यात मदत होते. जे लोक मोकळेपण हसतात ते लोक अधिक आनंददायी आणि आरोग्यदायी जीवन जगतात असे संशोधनातून निष्पन्न झाले आहे.त्यामुळे आजकल लाफ्टर थेरपीला अधिक महत्व दिले जात आहे.

इम्युन सिस्टीम मजबूत बनते …

जेव्हा आपण खळखळून हसता तेव्हा एंडोर्फिन नावाचे हार्मोन रिलीज होते. हे स्ट्रेसला कमी करण्यास मदत करते.तसेच इम्युनिटी वाढविण्यास देखील मदत करते. यामुळे आजारांशी लढण्यासाठी ताकद मिळते.

हे सुद्धा वाचा

ब्लड सर्क्युलेशनमध्ये होतो सुधार –

असे म्हणतात हसल्याने मोठ मोठे आजार दूर होतात. जर तुम्ही आनंदी असाल आणि मोठ्या हसत असाल तर ब्लड सर्क्युलेशन चांगल्या पद्धतीने होते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार दूर होतात.

मूड चांगला होतो –

हसल्याने शरीरातील सेरोटोनिन नावाच्या हार्मोनची पातळी वाढते. त्यामुळे आपला मूड चांगला होतो. आणि डिप्रेशन आणि एंग्जायटीचा धोका कमी होतो.

डिप्रेशन आणि एंग्जायटी कमी होते –

हसल्याने एडोर्फिन हार्मोनचे उत्पादन वाढते. जे स्ट्रेस, एंग्जायटी आणि डिप्रेशनला दूर करते. हसल्याने आपले मानसिक आरोग्य चांगले रहाते.ज्यामुळे आपल्या स्मृतीत चांगली वाढ होते, मेंदू चांगले कार्य करु लागतो.

झोपेशी संबंधीत समस्या दूर होतात –

लाफ्टर थेरपीने अनिंद्रेच्या समस्या दूर होतात. हसल्याने आपल्या शरीरातील मेलानिन हार्मोनचे प्रमाण वाढते. त्यामुळे आपल्याला चांगली झोप लागते.

वेदना कमी करण्यात मदत –

लाफ्टर थेरपीच्या मदतीने शरीरात नेचरल पेनकिलर हार्मोन रिलीज होतात. त्यामुळे डोकेदुखी, मायग्रेन आणि सांधेदुखीत आराम मिळतो.

डायबिटीजचा धोका कमी होतो –

हसल्याने हाय ब्लड शुगरची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे डायबिटीजचा धोका कमी होतो. तसेच तुम्ही आतून आनंदी राहू लागता.

मेमरी चांगली होते –

हसल्याने डोक्यातील ऑक्सीजनचे प्रमाण वाढते. त्यामुळे आपली मेमरी चांगली होते. मेंदूचा थकवा दूर होतो. आपल्याला शरीराला यामुळे रिचार्ज व्हायला होते.

काय आहे लाफ्टर थेरपी ?

लाफ्टर थेरपी एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. ज्यात हसण्याला एक एक्सरसाईज प्रमाणे मानले जाते. ही थेरपी खासकरुन तणाव, चिंता, डिप्रेशन आणि अन्य मानसिक समस्यांपासून आराम देण्यासाठी असते.

हसण्यासाठी काय करावे –

दररोज कॉमेडी चित्रपट वा मजेदार व्हिडीओ पाहावे

जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद लुठा

कुटुंब आणि मित्रांसोबत अधिक वेळ व्यतित करा आणि मोकळेपणे हसा

लाफ्टर योगा क्लब किंवा ग्रुप जॉईंट करा

एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणणारा कुणाल कामरा नेमका आहे तरी कोण?
एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणणारा कुणाल कामरा नेमका आहे तरी कोण?.
कोण गद्दार आणि कोण खुद्दार हे जनतेने दाखवून दिलं आहे - मुख्यमंत्री
कोण गद्दार आणि कोण खुद्दार हे जनतेने दाखवून दिलं आहे - मुख्यमंत्री.
माझ्याकडे बंदूक...,माजी आमदाराच्या मुलाची धमकी, सरकारी अधिकारीही भिडला
माझ्याकडे बंदूक...,माजी आमदाराच्या मुलाची धमकी, सरकारी अधिकारीही भिडला.
कुणाल कामराची करामत अन् शिवसेना आक्रमक, शिंदेंवरील 'या' गाण्यामुळं वाद
कुणाल कामराची करामत अन् शिवसेना आक्रमक, शिंदेंवरील 'या' गाण्यामुळं वाद.
'मुंबई पोलीस आयुक्तांची बदली झाली पाहिजे..', संजय राऊतांचा टोला
'मुंबई पोलीस आयुक्तांची बदली झाली पाहिजे..', संजय राऊतांचा टोला.
'ते कधी निवडून...', राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अजितदादांचा खोचक टोला
'ते कधी निवडून...', राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अजितदादांचा खोचक टोला.
कल्याणात श्रेयावरून सेनेतच राडा, महिला कार्यकर्ता - माजी नगरसेवकात वाद
कल्याणात श्रेयावरून सेनेतच राडा, महिला कार्यकर्ता - माजी नगरसेवकात वाद.
शिंदेंवरील गाण्यामुळे वाद, कामराला शिवसैनिकांची शिवीगाळ, क्लिप व्हायरल
शिंदेंवरील गाण्यामुळे वाद, कामराला शिवसैनिकांची शिवीगाळ, क्लिप व्हायरल.
कामराच्या शोच्या सेटची शिवसेनेकडून तोडफोड, सर्व शो बंद; प्रकरण काय?
कामराच्या शोच्या सेटची शिवसेनेकडून तोडफोड, सर्व शो बंद; प्रकरण काय?.
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं.