लवकर झोपा अन् लवकर उठा… नाहीतर वाढेल हार्ट ॲटॅकचा धोका ! हे आम्ही नव्हे, संशोधन सांगतंय..
Heart disease : कर्करोगाप्रमाणेच आता हृदयविकारामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. लोक लहान वयातच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या आजाराच्या विळख्यात येत आहेत.
नवी दिल्ली : कर्करोग अथवा कॅन्सर नंतर आता हृदयविकार (heart attack) सर्वाधिक जीव घेत आहेत. हार्ट ॲटॅकमुळे लहान वयातच लोकांचा मृत्यू (death) होत आहे. हृदयविकाराच्या घटनांमध्ये खूप वाढ झाली आहे सध्या हार्ट ॲटॅकवरही अनेक प्रकारची संशोधने होत आहेत. एका संशोधनात असे म्हटले आहे की, रात्री योग्य वेळी झोपल्यास हार्ट ॲटॅकचा धोका टाळता येतो. एक्सेटर विद्यापीठाच्या संशोधनात (research) हा दावा करण्यात आला आहे.
या अभ्यासात असे म्हटले आहे की जे लोक 12 वाजेपर्यंत जागे राहतात त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. स्लिप पॅटर्न आणि हृदयविकाराचा थेट संबंध असल्याचे संशोधनात म्हटले आहे. या संशोधनात इंग्लंडमधील 88 हजार लोकांचा समावेश करण्यात आला होता. या अभ्यासात लोकांकडून त्यांच्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळांबद्दल माहिती घेण्यात आली. यासोबतच खाद्यपदार्थ आणि जीवनशैलीशी संबंधित इतर माहितीही घेण्यात आली.
चार वर्षांपर्यंत चेक करण्यात आले मेडिकल रेकॉर्ड
या लोकांचे चार वर्षांचे वैद्यकीय रेकॉर्ड तपासण्यात आले. अभ्यासात असे आढळून आले की जे लोक रात्री 11 वाजण्यापूर्वी झोपतात त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचक्याचे प्रमाण कमी होते, तर या कालावधीनंतर झोपलेल्यांमध्ये हृदयविकाराचा धोका 35 टक्के जास्त होता. संशोधनात असे म्हटले आहे की, उशीरा झोपल्याने शरीराचा सर्केडियन रिदम बिघडू लागते. त्यामुळे हृदयावरही परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत संशोधकांनी लोकांना 11 वाजेपर्यंत झोपण्याचा सल्ला दिला आहे.
योग्य लाइफस्टाइल राखणे महत्वाचे
अमेरिकन हार्ट जर्नलनुसार, हृदयविकार टाळण्यासाठी जीवनशैली योग्य ठेवणे देखील आवश्यक आहे. यासाठी वेळेवर झोपण्यासोबतच व्यायाम करणेही खूप गरजेचे आहे. तसेच मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यावर भर दिला पाहिजे. आनुवंशिक कारणांमुळेही अनेकांना हृदयविकार होऊ शकतो, असे डॉक्टर सांगतात. यासोबतच याआधी किरकोळ हृदयविकाराचा झटका आला असला तरी पुन्हा हा ॲटॅक येण्याचा धोका असतो. अनेकांना हृदयविकाराची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. याला सायलेंट हार्ट अटॅक म्हणतात.
या गोष्टींची घ्या विशेष काळजी
– आहारात फॅट्सचे प्रमाण कमी ठेवा
– तळलेले, मसालेदार व रस्त्यावरचे पदार्थ खाणे टाळावे.
– दर तीन महिन्यांनी हृदयाच तपासणी करून घ्यावी
– धूम्रपान करू नका.