मुळव्याध टाळायचा असेल तर या पाच अन्नपदार्थांना टाळा, पाहा कोणते ते पदार्थ
मुळव्याधापासून दूर रहायचा असेल तर आपल्या आहारात बदल करायला हवा, पचायला जड असलेले पदार्थ खाऊ नयेत. न्युट्रीशनीस्ट काय म्हणतात पाहा
नवी दिल्ली | 7 सप्टेंबर 2023 : मुळव्याध या आजाराचा त्रास प्रत्येकाला केव्हा ना केव्हा होतच असतो. मुळव्याधाला इंग्रजी पाईल्स म्हणतात. यात पोट साफ न झाल्याने शौचास खुपवेळ बसल्याने किंवा कडक शौचास आल्याने गुदद्वाराच्या नसांना सुज येते बऱ्याचदा आणि जखम होऊन रक्तही पडते. ओबेसिटीमुळे तसेच व्यायामाचा अभाव यामुळे देखील पोट साफ होत नाही. या आजाराला बद्धकोष्टतेचा मोठा हातभार लागत असतो. जर बद्धकोष्टता वाढविणाऱ्या अन्नपदार्थ टाळले तर आपणाला मुळव्याधीला चार हात दूर ठेवता येते.
न्युट्रीशनीस्ट वरुण कत्याल यांच्यामते मुळव्याधला टाळायचे असेल तर ज्यादा मैदा वापरतात ते पदार्थ बिस्कीटे, केक, फास्ट फुड, पॅकबंद अन्नपदार्थ, कार्बोहायड्रेड किंवा चरबीयुक्त अन्नपदार्थ खाऊ नये. कारण त्यामुळे बद्धकोष्ठता वाढते. पाणी कमी पिल्याने देखील पोट खराब होते. त्यामुळे पाणी प्यायचे प्रमाण वाढवले तर मुळव्याध होण्याचा धोका कमी होतो.
डीप फ्राईड आणि प्रोसेस्ड फूड
जर तुम्ही जास्त तळलेले पदार्थ, फास्टफुड खात असाल तर तुम्हाला मुळव्याधाचा त्रास होऊ शकतो. प्रोसेस्ड फूड मध्ये फ्रोजन मीट, फास्ट फूड आणि डीप फ्राईड पदार्थ पचायला जड असतात. या पोषण तत्व नसतात तसेच मीठ आणि अनारोग्यकारक फॅट खूप जास्त असते. त्यामुळे पाचक यंत्रणा बिघडते.
मिठाचे प्रमाण जादा असणारे पदार्थ
लहान मुलांना खारवलेले अन्न पदार्थ अनेकांना आवडतात. चिप्समध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते. जर तुम्हाला आधीपासून पाईल्सचा आजार असेल तर जास्त मीठाच्या पदार्थांमुळे शरीरातले पाणी कमी होते. त्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांवरही परिणाम होतो.
कच्ची फळे
पाईल्स झाल्यावर अनेकदा फळे खायला सांगितले जाते. परंतू फळे खाताना ती नीट पिकलेली असावीत. अर्धवट कच्ची फळे खाल्ल्याने तुमच्या पचन बिघडून तुम्हाला बद्धकोष्ठता वाढू शकते.
ग्लुटेनवाले पदार्थ
ग्लुटेन म्हणजे गव्हातील पिष्टमय पदार्थ वगळून उरते त्या चिकट पदार्थाला ग्लुटेन म्हणतात.ग्लुटेनचे पदार्थ नेहमीच बद्धकोष्ठता आणि पाईल्सला निमंत्रण ठरतात. गव्हात ग्लुटेन आढळते. हा पदार्थ काही लोकांत ऑटोइम्युन डीसीज विकसित करून इम्युन सिस्टीम आणि त्याच्या पाचक तंत्राला खराब करतो. त्यामुळे त्याव्यक्तीला बद्धकोष्ठता आणि मुळव्याधाचा त्रास होऊ शकतो.
गायीचे दूध आणि दूधाचे पदार्थ
काही लोकांना दूध किंवा दूधापासून तयार झालेले पदार्थ खाल्ल्याने मुळव्याधला आमंत्रण देतात. दूधातील प्रोटीनमुळे पोट साफ होत नाही. अशा लोकांना पारंपारिक दूधा ऐवजी सोया दूधाचा वापर करायला हवा.