नवी दिल्ली – सणासुदीच्या (festivals) काळात आपल्या घरी फराळाचे विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. आपण मिठाईही विकत आणतो. मात्र या पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने आपले आरोग्यही (health) बिघडू शकते. ज्यामुळे आपल्या शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची (cholesterol) पातळी वाढू शकते. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने हृदयरोग आणि हार्ट फेल होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत औषधे वापरल्याने आपले कोलेस्ट्रॉल सुधारण्यास मदत होऊ शकते. पण नेहमी औषधांचा वापर करण्याऐवजी कोलेस्ट्रॉल सुधारण्यासाठी दैनंदिन आयुष्यात काही बदल केले तरी कोलेस्ट्रलवर नियंत्रण मिळवता येते.
आहारात काही बदल करून तुम्ही कोलेस्ट्ऱॉलची पातळी नियंत्रित करू शकता व हृदयाचे आरोग्यही सुधारू शकता. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
फॅटयुक्त पदार्थांचे सेवन कमी करावे –
जागरण डॉट कॉम नुसार, मांस आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळणारी चरबी आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढविण्याचे कार्य करते. फॅट किंवा चरबीयुक्त अन्नाचे सेवन कमी केल्याने लिपोप्रोटी कोलेस्ट्रॉल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते.
सॉल्यूबल फायबरचा आहारात करा समावेश –
जास्त प्रमाणात विरघळणाऱ्या फायबरचे सेवन केले पाहिजे. ते आपल्या रक्तप्रवाहात कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरते.
प्रोटीनयुक्त पदार्थ खावेत –
प्रोटीन्स किंवा प्रथिने ही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. एका संशोधनात असे दिसून आले आहे की प्रथिने एलडीएल कोलेस्ट्रॉल तसेच रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.
रोज व्यायाम करावा –
आपण दररोज थोडा तरी व्यायाम केला पाहिजे. व्यायामामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते.
धूम्रपान करू नये –
धूम्रपान हे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असते, त्यामुळे सिगारेट पिऊ नये. धूम्रपान बंद केल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात येण्यास मदत होते.
दारू पिणे बंद करावे –
अल्कोहोल कमी प्रमाणात प्यायले पाहिजे. जास्त मद्यपान केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते.