फक्त मद्यपानच नव्हे, तर या पदार्थांच्या सेवनामुळेही होऊ शकते तुमचे लिव्हर खराब

Liver Health : खराब जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी हे आपले लिव्हर खराब होण्यामागचे कारण आहे. आज आपण अशाच काही खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेऊया, जे खाल्ल्याने लिव्हर अर्थात यकृतावर वाईट परिणाम होऊ शकतो.

फक्त मद्यपानच नव्हे, तर या पदार्थांच्या सेवनामुळेही होऊ शकते तुमचे लिव्हर खराब
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 11:01 AM

नवी दिल्ली : आपले यकृत अर्थात लिव्हर (liver) हा शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. असे म्हटले जाते की जर तुमचे लिव्हर खराब झाले तर संपूर्ण शरीर देखील खराब होऊ शकते. यामुळेच यकृत निरोगी ठेवणे (healthy liver) खूप गरजेचे आहे. आजकाल अनेकांना लहान वयातच यकृताशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत आहे. खराब जीवनशैली (bad lifestyle) आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी हे यकृत खराब होण्यामागचे कारण आहे. आज आपण अशाच काही खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेऊया, जे खाल्ल्याने लिव्हरवर वाईट (liver problem) परिणाम होऊ शकतो.

कोणते पदार्थ ठरतात लिव्हरसाठी हानिकारक ?

  1. जर तुम्ही साखरेचे जास्त सेवन करत असाल किंवा गोड पदार्थ जास्त खात असाल तर तुम्ही आताच सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण जास्त साखर खाल्ल्याने यकृत साखरेचे फॅटमध्ये रूपांतर करू शकते. ही चरबी यकृतासह तुमच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात जमा होऊ शकते. यामुळे तुम्हाला फॅटी लिव्हरची समस्या असू शकते.
  2. सोडा, कोल्डड्रिंक्स अर्थात शीतपेये यांसारख्या आपण पेयांपासूनही दूर राहिले पाहिजे. कारण ते प्यायल्याने यकृत खराब होऊ शकते आणि इतर अनेक शारीरिक समस्या देखील उद्भवू शकतात. या पेयांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, तसेच सोडाही असतो. यामुळे लठ्ठपणा आणि शरीरातील चरबी वाढू शकते.
  3. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यानेही तुमच्या यकृताला हानी पोहोचू शकते. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने शरीरात पाणी टिकून राहते (water retention), जे शरीरासाठी चांगले नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनेच खारट बिस्किटे, चिप्स, स्नॅक्स इत्यादी पॅकेज केलेले खाद्यपदार्थ खाणे टाळावे. कारण त्यात सॅच्युरेटेड फॅट आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते. यामुळे फॅटी लिव्हर आणि लठ्ठपणा होऊ शकतो.
  4. रेड मीट हे देखील यकृताचे नुकसान करू शकते. लाल मांस पचवणे हे यकृतासाठी थकवणारे काम आहे. कारण लाल मांसामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथिने तोडणे हे यकृतासाठी अवघड काम असते. लाल मांसाच्या अतिसेवनामुळे यकृताचे आजार होऊ शकतात.
  5. अल्कोहोल किंवा मद्याचे सेवन केल्याने यकृताचे आजार होऊ शकतात तसेच यकृत निकामी होऊ शकते. जास्त मद्यपान केल्याने अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (AFLD) होऊ शकतो. जास्त वेळ मद्यपान केल्याने देखील लिव्हर सिरोसिस होऊ शकतो. तसेच लिव्हर सिरोसिसमुळे यकृताचा कर्करोगही होऊ शकतो.
  6. पिझ्झा, ब्रेड आणि पास्ता यांसारख्या मैद्यापासून बनवलेल्या खाद्यपदार्थांमुळे तुमचे यकृत खराब होऊ शकते. याशिवाय चरबीयुक्त खाद्यपदार्थ देखील तुमच्या यकृतासाठी समस्या बनू शकतात.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.