Sugar Level नियंत्रित राखायची आहे, तर झोपण्यापूर्वी ही पाच कामे करा
झोपताना डायबिटीजच्या रुग्णांनी स्वत:ची नीट काळजी घ्यावी. डायबिटीजच्या रुग्णांनी आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यासाठी खालील सोप्या टीप्स पाळव्यात. आपल्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घ्यावी असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
मुंबई | 18 मार्च 2024 : डायबिटीज ( Diabetes) रुग्णांना आपल्या शरीरातीतल साखरेची पातळी वाढू द्यायची नसते. ही एक गंभीर समस्या आहे. या आजारावर सध्या तरी केवळ आपला आहार आणि व्यायाम याआधारेच नियंत्रण मिळविता येते. शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी डायबिटीजच्या रुग्णांनी काही नियम पाळणे गरजेचे असते. या लेखात आपण रात्री झोपताना डायबिटीजच्या रुग्णांनी रात्री झोपताना नेमकी काय काळजी घ्यायची हे पाहायचे आहे. जर डायबेटीजच्या रुग्णांना या टीप्स फॉलो केल्यातर त्यांना आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखण्यास मदत होईल. तर पाहूयात कोणते आहेत उपाय..
झोपण्यापूर्वी चहा पिऊ नका
चहा आणि कॉफीत कॅफीन असते. याच्या सेवनाने झोपेची समस्या निर्माण होऊ शकते. संशोधनात असे सिद्ध झाले आहे मधुमेही रुग्णांना किमान 7 ते 8 तासांची चांगली झोप आवश्यक असते. त्यामुळे चांगली झोप येण्यासाठी बिछान्यावर जाण्यापूर्वी तीन तास आधी चहा किंवा कॉफी घेऊ नये.
रात्रीच्या जेवणावर लक्ष ठेवा
मधुमेह झाल्यानंतर आपल्या आहारावर लक्ष ठेवावे, कारण जर तुमचा आहार चुकीचा असेल तर शुगर लेव्हल वाढू शकते. रात्रीचे ब्लड शुगर स्थिर ठेवण्यासाठी डीनरमध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि हेल्दी फॅटचे मिश्रण असलेला आहार घ्यावा. तसेच रात्री हलका आहार घ्यावा.
फिजकली एक्टीविटी आवश्यक
डायबिटीजच्या रुग्णांनी फिजिकल एक्टीविटी कराव्यात. रात्रीच्या जेवणानंतर हलका व्यायाम करावा. थोडे चालून यावे. जेवल्यानंतर शतपावली केल्याने शुगर लेव्हल नियंत्रित होण्यास मदत मिळते.
श्वसनाचा व्यायाम
रात्री झोपण्यापूर्वी आराम देणारे मेडीटेशन किंवा ब्रिदींग एक्सरसाईज करावी. त्यामुळे ताणतणाव दूर होऊन चांगली झोप येईल आणि शुगर लेव्हल राखण्यास मदत मिळेल.
झोपण्यापूर्वी HbA1c Test
डायबिटीजच्या रुग्णांनी झोपण्यापूर्वी आपले ब्लड शुगर लेव्हल तपासून पाहावी. यामुळे तुम्हाला तुमची शुगर नियंत्रित राखण्यासाठी मदत मिळेल. त्यामुळे तुम्ही तुमची दैनंदिन जीवन सुखाने जगू शकता.
( हे उपाय सर्वसामान्य माहीतीवर आधारीत आहेत. योग्य सल्ल्यासाठी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा )