शर्टाखालून डोकावत्ये पोटाची चरबी ? रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्याने होऊ शकतो फायदा

How to Lose Belly Fat : पोटाची चरबी कमी करण्यासाठी अनेकांना कठोर मेहनत करावी लागते. मात्र आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असणाऱ्या काही पदार्थांच्या वापराने लठ्ठपणाला आळा घालता येऊ शकतो.

शर्टाखालून डोकावत्ये पोटाची चरबी  ? रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्याने होऊ शकतो फायदा
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 9:14 AM

नवी दिल्ली : लोकांचे वाढते वजन हे जगासाठी चिंतेचे कारण बनत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या ( WHO) सांगण्यानुसार, जगातील 2 अब्जाहून अधिक लोक लठ्ठपणाने त्रस्त आहेत. खाण्याच्या चुकीच्या सवयी, अरबट-चरबट खाणं, फास्ट फूड आणि जंक फूडमुळे (junk food) आजकाल लहान मुलेही सहज लठ्ठ होत आहेत. 2020 च्या आकडेवारीनुसार, 5 वर्षांखालील 3.9 कोटी मुलांचे वजन जास्त आहे. डब्ल्यूएचओच्या (world health organization) मते, जर एखाद्याचा बॉडी मास इंडेक्स 25 पेक्षा जास्त असेल तर त्याचे वजन (weight gain) वाढले आहे, परंतु जर बीएमआय 30 पेक्षा जास्त असेल तर त्याला लठ्ठपणाचा त्रास होतो. मुळात लठ्ठपणा हे अनेक रोगांचे मूळ आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयविकार, किडनी समस्या, मेंदूची समस्या अशा समस्यांना तोंड द्यावे लागते.

भारतासह जगभरात लठ्ठपणाचा आणखी एक प्रकार आहे. येथे बहुतेक लोकांच्या पोटात चरबी जमा होऊ लागते, हे जास्त धोकादायक असते. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रकारे मेहनत करतात पण वजन कमी होत नाही. अशा स्थितीत आपली कुठे चूक होत आहे, हेही बघायला हवे. मात्र आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवू शकता. आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असणाऱ्या काही पदार्थांच्या मदतीनेही लठ्ठपणाला आळा घालता येऊ शकतो.

मध आणि दालचिनीची मदतीने कमी करा लठ्ठपणा

हे सुद्धा वाचा

आपल्याच स्वयंपाकघरात सहजपणे उपलब्ध असलेले आणि रोजच्या वापरातील दोन पदार्थ म्हणजे मध आणि दालचिनी. ते जादुई सुपरफूड आहेत. मधाच्या औषधी गुणधर्माचे आपल्या आयुर्वेदात वर्णन केले आहेत, पण दालचिनी मधात मिसळून त्याचे सेवन केल्यास वजन सहज नियंत्रित करता येते. मध आणि दालचिनी दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. दोन्ही वजन कमी करण्यासाठी वापरले जातात. एका अभ्यासानुसार मध भूक कमी करते. यामध्ये अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट असतात जे वजन झपाट्याने कमी करण्यास जबाबदार असतात.

सकाळी रिकाम्या पोटी मध आणि पाणी प्यायल्याने वजन कमी होते. याचा आपल्या देशात शतकानुशतके वापर केला जात आहे. एका रिपोर्टनुसार दालचिनीचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखरही कमी होते. हे चयापचय अर्थात मेटाबॉलिज्म वाढवते, ज्यामुळे वजन देखील वेगाने कमी होते. दालचिनी चरबी जलद बर्न करते. दालचिनी वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे, हेही अभ्यासात सिद्ध झाले आहे.

अशा परिस्थितीत जेव्हा मध आणि दालचिनी एकत्र मिसळले जाते तेव्हा ते लठ्ठपणाच सर्वात मोठा शत्रू बनते. काही अभ्यासात असे दिसून आले आहे की जास्त कॅलरी किंवा जास्त चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने होणारे नुकसान दालचिनी कमी करू शकते. काही अभ्यासात असे म्हटले गेले आहे की दालचिनी ही ओव्हरऑल वेट ल़स प्लॅनलसाठीही उपयुक्त ठरते. दालचिनीमध्ये असलेले दाहक-विरोधी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी अतिरिक्त मदत करू शकतात.

मध आणि दालचिनीचा कसा करावा वापर ?

दालचिनी आणि मधाचे पाणी घरी सहज तयार करता येते. ते तयार करण्यासाठी, एक कप पाणी उकळा आणि त्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर घाला. नंतर गॅस बंद करून पाणी गार होऊ द्या व त्यामध्ये एक चमचा मध घाला. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी याचे सेवन करा. काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. या पाण्यात तुम्ही लिंबाचा रस देखील घालू शकता. हे पाणी तुम्ही व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतरही पिऊ शकता.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.