वजन कमी करणाऱ्यांनो, चुकूनही हे पदार्थ किचनमध्ये ठेवू नका, नाही तर वजन वाढलंच म्हणून समजा…
जर तुम्हाला तुमचा वजन कमी करण्याचा प्रवास अधिक सोपा आणि प्रभावी बनवायचा असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही किचनमधून काही पदार्थ बाहेर काढले पाहिजेत.
नवी दिल्ली – आपला आहार हा चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. तुम्ही जे पदार्थ खाता त्यामुळे तुम्ही निरोगी राहता किंवा आजारी पडता. आपले स्वयंपाकघर हे आरोग्यामध्ये (food for good health) खूप मोठी भूमिका बजावते. स्वयंपाकघरात आणि पॅन्ट्रीमध्ये जे पदार्थ आहेत, तेच तुम्ही खाता आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. सहसा लोक याकडे लक्ष देत नाहीत आणि अनेक प्रकारचे फॅन्सी फूड आणि अस्वास्थ्यकर पदार्थ (unhealthy food) त्यांच्या स्वयंपाकघराचा भाग बनवतात. पण जर तुम्ही वजन कमी करण्याच्या आहारावर असाल तर अशा वस्तू स्वयंपाकघरात ठेवणे तुमच्यासाठी योग्य नाही. यामुळे तुमचे वजन कमी करणे (weight loss process) जवळपास अशक्य होईल. वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातून कोणते पदार्थ वगळले पाहिजेत, हे जाणून घेऊया.
किचनमधून जॅम करा हद्दपार
आपण नाश्त्यामध्ये अनेकदा जॅम आणि ब्रेड खातो. एवढेच नव्हे तर काही लोकं पोळीसोबतही जॅम खातात. पण तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातून जॅम हद्दपार केला पाहिजे. खरंतर बाजारात उपलब्ध असलेल्या जॅममध्ये कृत्रिम चव आणि अतिरिक्त साखरेचा समावेश केला जातो. अशा प्रकारे, अतरिक्त साखर खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होणार नाही. त्यामुळे स्वयंपाकघरात जॅमची बाटली न ठेवणे चांगले.
कोल्डड्रिंक्सची बाटली काढून टाका
जेव्हा आपल्याला काहीतरी चांगले प्यावेसे वाटते तेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवलेले कोल्ड ड्रिंक बाहेर काढतो आणि ते पितो. परंतु अशा पेय आणि सोडामध्ये केवळ कॅलरीज असतात, ज्यामुळे तुमचे वजन वाढते. एवढेच नाही तर ते हार्मोनल असंतुलन आणि इन्सुलिन रेझिस्टन्सला कारणीभूत ठरतात. म्हणूनच, जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर फिजी ड्रिंक्सचे सेवन पूर्णपणे टाळले पाहिजे.
रिफाइंड साखर
प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात साखर सर्रास वापरली जाते. पण जर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी त्रास होत असेल तर तुम्ही आधी स्वयंपाकघरातून शुद्ध साखर किंवा पांढरी साखर काढून टाकावी. साखरेमुळेकॅलरीजचे प्रमाण वाढते, त्यामुळे वजन कमी करणे अधिक कठीण होते. इतकंच नाही तर त्यामुळे हार्मोनल असंतुलन होऊन इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता बिघडते. रिफाइंड साखरेऐवजी मध, कोकोनट शुगर आणि खजूर इत्यादींचे सेवन करणे चांगले होईल.
बिस्कीट करा हद्दपार
आजकाल प्रत्येकाच्या घरात बिस्कीट्स असतात, चहासोबत बिस्कीट खायचा आनंद सर्वजण घेतात. पण तुम्हाला वजन कमी करायचे असेल बिस्कीट खाणे टाळले पाहिजे. मैदा, साखर आणि तेलापासून बिस्कीट तयार केले जाते, हे पदार्थ खाल्याने वजन वाढते. त्यामुळे वजन कमी करायची इच्छा असेल तर बिस्कीट बिलकूल खाऊ नका.