चेहरा ताजा आणि टवटवीत करायचा असेल तर कोथिंबि‍र अशी कामी येईल

स्वयंपाक घरात असणारी कोथिंबिर खूपच औषधी तर आहेच परंतू आपल्या त्वचेचा हेल्थी आणि चमकदार बनविण्यासाठी तिचा फेसपॅक, स्क्रबर, मास्क अशा विविध पद्धतीने वापर करता येतो.

चेहरा ताजा आणि टवटवीत करायचा असेल तर कोथिंबि‍र अशी कामी येईल
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 7:52 PM

आजकल सर्वांना आपली त्वचा हेल्थी आणि ग्लोईंग करणारी असावी असे वाटते. बाजारात यासाठी अनेक प्रोडक्ट उपलब्ध आहेत. परंतू ते प्रचंड महाग असतात. परंतू स्वयंपाक घरातील नेहमची कोथिंबि‍रीचा वापर तुम्ही करुन देखील तुम्हाला तुमचे नैसर्गिक सौदर्याची काळजी घेता येते. हिरव्या ताज्या कोथिंबि‍रीत विटामिन्स सी, एंटीऑक्सीडेंट्स, एंटीमायक्रोबियल आणि एंटी – इफ्लेमेंटरी गुण भरपूर आहेत. हे सर्व गुण तुमच्या त्वचेला अनेक समस्यांपासून वाचवतात. चला तर हिरवी कोथिंबीर तुमच्या त्वचेची कशी काळजी घेते ते पाहूयात…

सॉफ्ट स्कीन –

कोथिंबि‍रीत असलेले एंटीऑक्सीडेंट्स तुमच्या त्वचेला फ्री रेडिकल्सपासून वाचवतात. जे त्वचेला अनेक प्रकारे नुकसान पोहचवतात. हे तुमची स्कीन क्लीअर करुन तिला सॉफ्ट आणि ग्लोईंग बनविण्यास मदत करते.

डागांपासून सुटका –

कोथिंबिरीत असलेले विटामिन्स सी पिगमेंटेशनला कमी करण्यास मदत करते.यामुळे डाग रहात नाहीत आणि डार्क सर्कल कमी होतात.

हे सुद्धा वाचा

त्वचेला टाईट बनवा –

हिरव्या कोथिंबिरीत एण्टी एजिंग तत्वं स्कीनला टाईट आणि फर्म बनवितात. त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

पिंपल्स पासून सुटका –

यातील एंटी बॅक्टीरियल गुणांमुळे पिंपल्स कमी होण्यास मदत मिळते.

त्वचेला हायड्रेट करते –

कोथिंबिर त्वचेला हायड्रेट राखण्यास मदत करते त्यामुळे त्वचा कोरडी होत नाही.

कोथिंबिरीचा फेसपॅक कसा बनवाल –

कोथिंबिरीला तुम्ही अनेक प्रकारे वापरु शकता.

फेस पॅक – हिरव्या कोथिंबिरीला वाटून दही किंवा मधात मिक्स करुन फेसपॅक बनवू शकता. या फेसपॅकला चेहऱ्यावर लावल्याने त्वचा चमकदार आणि मुलायम होते.

टोनर – हिरवी कोथिंबिर पाण्यात उकळून त्या पाण्याने चेहरा धुतला तर त्वचा टोन होते

स्क्रब – कोथिंबिरीला साखरेसोबत मिक्स करुन स्क्रबर तयार करावा. हा स्क्रब चेहऱ्यावरील मृत त्वचा हटवून त्वचेला एक्सफोलिएट करतो.

मास्क – कोथिंबिरीला एलोव्हेरा जेल सोबत मिक्स करुन मास्क तयार करु शकता. यामुळे त्वचा आरोग्यदायी बनते

या गोष्टीची काळजी घ्यावी

आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोथिंबिराचा वापर करु शकता. जर तुमची त्वचा खूपच नाजूक आहे. तर आधी पॅच टेस्ट करावा.

– कोथिंबिरीचा वापर करण्यापूर्वी ती नीट धुवून घ्यावी

– कोथिंबिरीची एलर्जी असेल तर तिचा वापर करु नका

– कोणताही नवा फेस पॅक वा मास्क लावण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा

( डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.