हार्ट अटॅकपासून बचाव करायचा आहे तर थंडीत हे ड्रायफ्रुट्स लाभदायक, परंतू प्रमाण लक्षात घ्या

हिवाळ्यात हृदयविकाराचे प्रमाण रोखण्यासाठी ड्रायफ्रुट्स खाण्याचा खूप फायदा होतो. ड्रायफ्रुटचे योग्य प्रमाणात सेवन केले तर हृदयविकारास रोखण्यास मदत होते. या ड्रायफ्रुटमध्ये अनेक पोषक तत्वे असल्याने ते हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत करतात.

हार्ट अटॅकपासून बचाव करायचा आहे तर थंडीत हे ड्रायफ्रुट्स लाभदायक, परंतू प्रमाण लक्षात घ्या
dry fruitsImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Dec 17, 2023 | 9:00 PM

मुंबई | 17 डिसेंबर 2023 : हिवाळ्यात हार्ट अटॅकचे प्रमाण जादा असते. त्यामुळे हिवाळ्यातील आपला आहार वेगळा असायला हवा. आपल्याकडील ड्रायफ्रुट्समध्ये अनेक पोषकतत्व असल्याने हिवाळ्यात त्यांचा वापर करायला हवा. अक्रोड, बदाम, काजू आणि पिस्ता यांचे जर योग्य प्रमाणात आहारात वापर केला तर हृदयाचे आरोग्य सुधारायला मदत होते. मात्र अधिक प्रमाणात ड्रायफ्रुट्स धोकादायक ठरू शकतात. तज्ज्ञांच्या मते बदाम, अक्रोड, काजू, मणुके, पिस्ता असे मिळून रोज 30 ग्रॅमपेक्षा जास्त खाऊ नये. चला पाहूयात याचा हृदयावर कसा परिणाम होतो.

मणुका –

मणुकात मॅग्निशियम, पोटॅशियम, आयर्न, झिंक, सारखे महत्वपूर्ण मिनरल्स असतात. हृदयाचे कार्य चांगले राखण्यास त्यामुळे मदत मिळते. यात फायबर आणि एंटीऑक्सीडेंट्स देखील असतात. त्यामुळे कोलेस्ट्रोल कमी होते. थंडीत मणुके खाल्ल्याने ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रोल कंट्रोलमध्ये रहाते. त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

अक्रोड –

अक्रोडमध्ये हृदयासाठी खूपच फायदेशीर घटक असतात. अक्रोडमध्ये मोनोअनसेचुरेटेड आणि पॉलीअनसेचुरेटेड फॅटी एसिड सारखे हेल्थी फॅट्स असतात. यामुळे रक्तातील कोलेस्ट्रोल कमी होते. यात फायबर आणि विटामिन्स ई देखील आढळते. त्यामुळे हृदयरोगापासून बचाव होतो.

बदाम –

बदामात ओमेगा – 3 फॅटी एसिड असते. हे हृदयासाठी खूपच फायदेशीर आहे. ओमेगा- 3 फॅटी एसिड रक्तातील एकूण कोलेस्ट्रोल आणि ट्रायग्लिसराईडच्या प्रमाणास कमी करण्यास मदत करते. याशिवाय रक्त पातळ बनविते. तसेच हृदयाची स्पंदने नियंत्रित करण्यात मदत करते.

पिस्ता –

रस्त्यात भरपूर प्रमाणात एंटीऑक्सीडेंट्स आढळते. जे हृदयासाठी आवश्यक असते. पिस्त्यातील एंटीऑक्सीडेंट्स फ्री रेडीकल्सला नष्ट करायला मदत करते. हे ऑक्सीडेटिव्ह तणावाला कारण बनतात. हे धमन्यांचा संकुचित होण्यास रोकते. तसेच कोलेस्ट्रोल जमण्यास रोकण्याची ताकद त्यात असते. पिस्ता खाल्ल्याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोक रोखण्यास मदत मिळते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.