30 सेंकदात कळणार दूध असली आहे की नकली, आयआयटी मद्रासने बनविले डीव्हाईस
आयआयटी मद्रासमध्ये शिकविणारे प्रा. पल्लब सिन्हा महापात्रा यांच्या नेतृत्वाखाली सुभाशीष पटारी आणि प्रियंकन दत्ता यांनी हे संशोधन करण्यात पुढाकार घेतला आहे. हे संशोधन प्रसिद्ध विज्ञान पत्रिका नेचर मध्ये प्रसिद्ध झाले आहे.
नवी दिल्ली : दूधातील भेसळीची ( Milk Adulteration ) अनेक प्रकरणे आपण बातम्यांमध्ये वाचत असतो. भारत, पाकिस्तान, चीन आणि ब्राझील सारख्या देशांमध्ये भेसळयुक्त दूधाची समस्या सर्वात अधिक जाणवत आहे. परंतू आता दूधातील भेसळ झटपट ओळखता येणारे एक खास यंत्र मद्रास आयआयटीच्या (IIT Madras) तज्ज्ञांनी तयार केले आहे. त्यामुळे आता घरबसल्या बाजारात मिळणाऱ्या दूधातील भेसळ झटपट ओळखता येणार आहे.
दूधातील भेसळ हा भारतासारख्या विकसनशील देशातील मोठी समस्या आहे. दूधातील भेसळ ओळखण्याची अनेक प्रकार आहेत. परंतू ते सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. मद्रास आयआयटीने एक सोपे यंत्र बनवलेले आहे. पेपर बेस्ड असलेला हा पोर्टेबल डिव्हाईस दूधातील युरिया, डिटरजेंट, साबन, स्टार्च, हायड्रोजन, परऑक्साईड, सोडीयम-हायड्रोजन-कार्बोनेट आणि सॉल्टच्या भेसळीचा छडा लावणे सोपे होणार आहे. हे यंत्र केवळ दूधातील नव्हे तर पाणी, सरबत आणि मिल्कशेक मधील भेसळही शोधून काढू शकतो. कोणत्याही द्रव पदार्थांतील भेसळ ओळखण्यासाठी त्याचा केवळ एक मिलीलीटर लिक्वीड पुरेसे आहे.
आतापर्यंत दूधाची भेसळ ओळखण्यासाठी प्रयोगशाळेत तपासणी केली जात होती. ही प्रक्रीया खूप वेळ खाऊ आणि खर्चिक आहे. परंतू आयआयटी मद्रासने तयार केलेले हे यंत्र खूपच स्वस्त आहे. बिझनेस स्टॅंडर्डच्या बातमीनूसार आयआयटी मद्रासमध्ये मॅकेनिकल इंजिनियरींग शिकविणाऱ्या पल्लब सिन्हा महापात्र यांनी सांगितले की हे मायक्रोफ्लुईडीक यंत्र तीन लेयरचे आहे. वरचा लेयर आणि खालचा लेयर मध्ये सॅंडविचसारखा एक मधला लयेर आहे. यावर लिक्वीड टाकून थोडावेळ सुखू दिले जाते. सुखल्यानंतर दोन्ही पेपर लेयरवर टेप चिकटवली जाते, यात व्हाटमॅन फिल्टर पेपर ग्रेड 4 चा वापर केला जातो. जो लिक्डीड वाहण्यास मदत करतो. आणि रिएजेंट्सला स्टोर करायला मदत करतो.
विकसनशील देशांमधील समस्या…
सर्व reagent रिएजेंट्सला डिस्टील्ड वॉटर वा इथेनॉलमध्ये विरघळले जातात. सॉल्यूबिलिटीवर ते अवंलबून असते. कलरिमेट्रीक डिटेक्शन टेक्नीकचा वापर करीत द्रवपदार्थांतील भेसळचा छडा लावला जातो. तपासात असे कळले की या प्रकारचे रिएजेंट्स केवळ भेसळयुक्त पदार्थांनाच रिएक्ट होतात. दूधातील इतर सामान्य घटकांशी कोणताही प्रतिसाद देत नाहीत, हा एनाटीकल टूल लिक्वीड फूड सेफ्टीला मॉनिटर करायला मदत करू शकतो, विकसनशील देशातील दुर्गम भागातील दूधातील भेसळ त्यामुळे सहजरित्या ओळखण्यास मदत होणार आहे. भेसळयुक्त दूधामुळे किडनीचे आजार होतात. लहानमुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. पोटाचे विकार, डायरिया आणि कर्करोगासारख्या भयानक आजार त्यामुळे होऊ शकतात.