फक्त 4 लोकांच्या मदतीने 2 तासात रुग्णालय उभं राहणार, कसं? वाचा सविस्तर…
आयआयटी मद्रास इनक्युबेटेट स्टार्टपण मोड्यूल्स हाऊसिंगने एक महत्त्वाचा शोध लावलाय. आयआयटीने कोरोना रुग्णांसाठी खास फिरतं रुग्णालय तयार केलंय.

नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातलंय. दुसऱ्या कोरोना लाटेत तर अनेक ठिकाणी रुग्णांना बेडही मिळणं कठिण होत आहे. दर दिवशी लाखो लोकांना संसर्ग होत असल्याने रुग्णालयं भरली आहेत. बेड्स कमी पडत आहेत. त्यामुळेच नवी रुग्णालयं आणि नवे बेड्स तयार होणं आवश्यक आहे. मात्र, रुग्णालय बांधणं हे मोठं आणि वेळखाऊ काम आहे. यावर उपाय म्हणून आयआयटी मद्रास इनक्युबेटेट स्टार्टपण मोड्यूल्स हाऊसिंगने एक महत्त्वाचा शोध लावलाय. आयआयटीने कोरोना रुग्णांसाठी खास फिरतं रुग्णालय तयार केलंय. हे रुग्णालय केवळ 4 लोकांच्या मदतीने 2 तासात उभं करता येतं. या उपकरणाचं नाव मेडिकेअर असं ठेवण्यात आलंय (IIT Madras students invents Medicabe portable hospital to fight corona in India).
IIT मद्रासच्या स्टार्टअपने हे पोर्टेबल कोविड-19 रुग्णालय विकसित केलंय. हे रुग्णालय उभं करण्यासाठी 2 तासात उभं राहतं. आयआयटी मद्रासच्या इनक्यूबेटेड स्टार्टअप ‘मॉड्यूल हाऊसिंग’ने एक असं पोर्टेबल रुग्णालय तयार केलंय. हे रुग्णालय उभं करण्यासाठी केवळ 4 माणसांची गरज पडते. हे लोक अवघ्या 2 तासामध्ये नवं सुटसुटीत रुग्णालय उभं करत आहेत. त्याला मेडिकेब असंही म्हटलं जातंय.
आईआईटी मद्रास के स्टार्टअप ने पोर्टेबल कोविड अस्पताल विकसित किया। इसे 4 लोग महज 2 घंटे में एक माइक्रो अस्पताल बना सकते हैं। देखिए पोर्टेबल अस्पताल मेडिकेब की और किन सुविधाओं से है लैस। #IndiaFightsCorona #TogetherWeCan @PMOIndia @PIBHindi @MIB_Hindi @MoHFW_INDIA pic.twitter.com/sQ3pFg9vOB
— MyGovHindi (@MyGovHindi) May 2, 2021
केरळमधील वायनाडमध्ये लाँचिंग
‘मेडिकेब’ नावाचं हे पोर्टेबल मायक्रो स्ट्रक्चरच्या मदतीने स्थानिक पातळीवर कोविड-19 बाधित रुग्णाची तपासणी, उपचार, अलगीकरण सहजपणे करता येईल. मॉड्यूल हाऊसिंग अशाप्रकारचे अनेक मायक्रो रुग्णालयं विकसित करत आहे. या रुग्णालयांचा देशभरात उपयोग करता येणार आहे. मेडिकेअरचं नुकताच केरळमधील वायनाड येथे लाँचिंग झालंय.
2018 मध्ये स्टार्टअप सुरु
या प्रकल्पाच्या सर्टीफिकेशन आणि उत्तम कार्यान्वयासाठी स्टार्टअपने श्री चित्रा तिरुनल इंस्टीट्यूट फॉर मेडिकल सायन्सेज अँड टेक्नोलॉजीसोबत भागीदारी केलीय. आयआयटीचे दोन माजी विद्यार्थी राम रविचंद्रन आणि डॉ. तमस्वती घोष यांच्याकडून 2018 मध्ये हा स्टार्टअप सुरु करण्यात आला. यात आयआयटी मद्रासच्या इंक्यूबेशन सेलचीही मदत मिळाली.
आयसीयूचीही व्यवस्था
हे रुग्णालय सर्व सुविधांनी युक्त आहे. मेडीकेअर तात्काळ एका मायक्रो रुग्णालयाच्या रुपात कामाला येतं. हे मेडिकॅब पूर्णपणे फोल्डेबल आहे. त्यामुळे याची वाहतूक सहज आणि कमी खर्चात करता येते. यात एक डॉक्टर रूम, एक आयसोलेशन रूम, एक मेडिकल रूम किंवा वार्ड आणि दोन बेडचे आयसीयूचीही व्यवस्था करण्यात आलीय.
हेही वाचा :
नागपूर शहरात धनदांडग्यांनी बेड अडवल्याने गरीब वंचित, खुद्द महापौरांची कबुली
व्हिडीओ पाहा :
IIT Madras students invents Medicabe portable hospital to fight corona in India