Health Checkup | वयाची तिशी पार केलीत? मग ‘या’ मेडिकल टेस्ट नक्की करा

तुम्हाला वर्षातून एकदा संपूर्ण शरीराचे मेडिकल चेकअप करण्याचा सल्ला देतात. (Important Medical Tests may do Once in a Year)

Health Checkup | वयाची तिशी पार केलीत? मग 'या' मेडिकल टेस्ट नक्की करा
वैद्यकीय परीक्षा
Follow us
| Updated on: Jan 30, 2021 | 8:23 AM

मुंबई : आपल्या वयानुसार शरीरात अनेक बदल होत असतात. अनेकदा आपण या बदलांकडे दुर्लक्ष करतो. जर तुम्ही वयाच्या तिशीकडे जात असाल किंवा ती ओलांडली असेल, तर तुमचे शरीर पूर्वीसारखे तंदुरुस्त राहत नाही. वयाच्या या टप्प्यावर, लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. या वयात हार्मोन्समध्ये देखील बरेच बदल होत असतात. जर वयाच्या 30 व्या वर्षी तुम्हाला कोणताही आजार झाला, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. यावर वेळीच उपचार करुन घ्या, असे अनेकदा सांगितले जाते. पण आपण कामाच्या गडबडीत, कुटुंबाची जबाबदारी यासर्व गोष्टींमध्ये याकडे दुर्लक्ष करतो. यामुळे बहुतेक वेळा हेच आजार गंभीर स्वरुप धारण करतात. (Important Medical Tests may do Once in a Year)

आपल्यातील अनेक जण फक्त पोटदुखी, ताप, सर्दी या छोट्या कारणांसाठी वर्षातून एखाद्या वेळीच डॉक्टरकडे जातात. त्या व्यक्तिरिक्त सहज मेडिकल चेकअप करण्यासाठी कधीही जात नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, वर्षातून किमान एकदा तरी तुमच्या शरीराचे पूर्ण चेकअप करणे गरजेचे असते. ज्यामुळे तुमच्या शरीरातील अवयव व्यवस्थितरित्या कार्यरत आहेत का याची तुम्हाला माहिती मिळते. त्यामुळे कित्येक वेळा फॅमिली डॉक्टर तुम्हाला वर्षातून एकदा संपूर्ण शरीराचे मेडिकल चेकअप करण्याचा सल्ला देतात.

?कोणते मेडिकल चेकअप गरजेचे??

cbc test

संपूर्ण रक्त गणना (CBC)

? संपूर्ण रक्त गणना (CBC)

Complete blood count याचा अर्थ संपूर्ण रक्त गणना असा होता. ही चाचणी आपल्या संपूर्ण आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी केली जाते. तसेच अॅनिमिया, संसर्ग आणि ल्युकेमियासह अनेक प्रकारचे विकार ओळखण्यासाठी वापरली जाते. विशेषतः भारतीय महिलांसाठी ही चाचणी अत्यंत गरजेची असते. कारण बहुतांश महिलांना अॅनिमिया म्हणजेच अशक्तपणाचा त्रास असतो.

Sugar test

ब्लड शुगर टेस्ट

? ब्लड शुगर टेस्ट (Diabetes Test)

ही चाचणी शक्यतो काहीही न खाता पिता केली जाते. यासाठी जवळपास 12 तास आधी काहीही खाऊ शकत नाही. या चाचणीमुळे तुम्हाला मधुमेह आहे का? हे ओळखलं जाते. जर तुमच्या या चाचणी रीडिंग <99 असेल, तर ते सामान्य मानले जाते. जर हे 100 आणि 110 इतके असेल, तर प्री-डायबिटीज असल्याचे निदान केले जाते आणि जर हे रीडिंग 110 इतके असेल, तर तुम्हाला अधिक मधुमेह असतो. (Important Medical Tests may do Once in a Year)

heart test

लिपिड प्रोफाईल

? लिपिड प्रोफाईल (Lipid profile)

लिपिड प्रोफाईल ही एक रक्त तपासणीसारखीच चाचणी असते. ही चाचणी तुमच्या हृदयाच्या आणि रक्तवाहिन्यांच्या रोगाशी निगडित आहे. ही चाचणी रक्ताची चाचणी, टोटल कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्स, एचडीएल आणि एलडीएलची पातळी मोजण्यासाठी केली जाते. जर तुमच्या कुटुंबात कोणाला हृदयरोग किंवा मधुमेह असेल, तर त्या व्यक्तीने वर्षातून एकदा ही चाचणी करायला हवी.

पॅप स्मियर टेस्ट

? पॅप स्मियर टेस्ट (Pap test)

महिलांनी ही चाचणी करणे गरजेचे आहे. या चाचणीद्वारे तुमच्या शरीरातील पेशींमध्ये होणारे बदल समजतात. याद्वारे तुम्हाला किती वर्षातून ही चाचणी कधी करता येईल, याचा अंदाज केला जातो. पॅप स्मियर टेस्टद्वारे गर्भाशयाच्या कर्करोगाचे वेळेत निदान होते. तसेच गर्भाशयाबाबतचे विविध आजाराचे निदानही वेळेत होते.

ecg test

ईसीजी टेस्ट

? ईसीजी टेस्ट (ECG)

वयाच्या 35 वर्षांनंतर ही चाचणी करण्याचा सल्ला प्रत्येक डॉक्टरांकडून तुम्हाला दिला जातो. ही चाचणी मुख्यत: हृदय रोगाचे मूल्यांकन करण्यासाठी, ब्लॉक, ऑक्सिजनची कमतरता, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, हार्टअटॅक यासारख्या गोष्टींचे निदान करण्यासाठी केली जाते. (Important Medical Tests may do Once in a Year)

liver

यकृत कार्य चाचणी

? यकृत कार्य चाचणी (Liver function tests)

यकृताची स्थिती तपासण्यासाठी ही चाचणी केली जाते. वर्षातून किमान एकदा तरी ही चाचणी करावी. जर तुम्ही अतिप्रमाणात अल्कोहोलचे सेवन करत असाल, तर तुम्हाला फॅटी लिवर, हेपेटायटीस सी आणि बी यासारख्या आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही ही चाचणी करणे गरजेचे आहे.

Thyroid

थायरॉईड फंक्शन टेस्ट

? थायरॉईड फंक्शन टेस्ट (Thyroid function tests)

थायरॉईड फंक्शन टेस्ट हे आपल्या थायरॉईड ग्रंथी किती चांगले कार्य करतात यासाठी केली जाते. थायरॉईड ही आपल्या गळ्याच्या खालच्या भागामध्ये स्थित एक लहान ग्रंथी आहे. ही ग्रंथी शरीराच्या अनेक प्रक्रिया जसे की चयपचय, उर्जा निर्मिती आणि मूड नियंत्रित करण्यास जबाबदार आहे. या चाचणीमध्ये T3, T RU, T4, आणि TSH अशा चाचणी कराव्या लागतात. (Important Medical Tests may do Once in a Year)

Vitamin d (1)

व्हिटॅमिन डी चाचणी

? व्हिटॅमिन डी चाचणी

मजबूत आणि निरोगी हाडांसाठी व्हिटॅमिन डी महत्त्वपूर्ण आहे. व्हिटॅमिन डी हे बऱ्याच रोगांना प्रतिबंध करण्यास मदत करते. आपल्या शरीरातील व्हिटॅमिन डीची पातळी रक्त तपासणीद्वारे तपासली जाऊ शकते. भारतातील व्हिटॅमिन डीची कमतरता सामान्य आहे. त्यामुळे जर तुम्हाला व्हिटॅमिन डी ची कमतरता भासत असेल, तर तुम्ही ही चाचणी नक्की करुन घ्यावी.

aids

STD टेस्‍ट

? STD टेस्‍ट

जर तुम्ही एकापेक्षा जास्त पार्टनरसोबत शाररिक संबंध प्रस्थापित करत असाल किंवा ज्या स्त्रिया गर्भधारणेची योजना आखत असतील, त्यांनी ही चाचणी नक्कीच करावी. याद्वारे तुम्हाला लैंगिक आजाराचे निदान होते. (Important Medical Tests may do Once in a Year)

संबंधित बातम्या : 

Ear Pain Causes | कान दुखीच्या त्रासाची कारणे अनेक, जाणून घ्या घरगुती उपायांबद्दल…

Health Tips | पेरूच्या पानांचा आरोग्यवर्धक ‘हर्बल चहा’, नियमित सेवनाने होतील अनेक फायदे!

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.