पोट फुगतंय? छातीत जळजळतंय, आई गं… अपचन होतंय? मग हा उपाय कराच
लेखात पचनसंस्थेच्या समस्या आणि त्यावर मात करण्यासाठी उपयुक्त अन्नाची चर्चा केली आहे. प्रोबायोटिक्स (दही, लोणचे), फायबरयुक्त पदार्थ (फळे, भाज्या), पूर्ण धान्ये (राजगीर, ओट्स), आले आणि त्रिफला यांचा पचनसंस्थेवर होणारा सकारात्मक परिणाम स्पष्ट करण्यात आला आहे. या आहारातील बदल करून पचनसंस्था मजबूत करणे आणि पोटदुखी, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून मुक्तता मिळवता येते असे सुचवले आहे.
आपण रोज काय खातो त्याचा आपल्या पाचनशक्तीवर परिणाम होत असतो. बदलत्या जीवनशैलीमुळे आपला ओढा फास्टफूडकडे गेला आहे. त्यामुळे पचनाची समस्या उद्भवते. अन्न पचन होत नाही. त्यामुळे छातीत जळजळणं, करपट ढेकर येणं आणि इतर समस्या निर्माण होतात. त्यातून एखादा गंभीर आजार होण्याची शक्यता असते. पचनशक्ती कमी झाल्याने पोटदुखी, पोटफुगणे, बद्धकोष्ठता, गॅस, अतिसार इत्यादी समस्या निर्माण होतात. त्यामुळे, आपल्या आरोग्याला मदत करणारे काही पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे.
प्रोबायोटिक अन्न
प्रोबायोटिक अन्न पाचन शक्तीला महत्वाचे आहे. हे पदार्थ आपल्या शरीरात चांगले बॅक्टेरिया (गट फ्लोरा) वाढवते. आपल्या शरीरात असलेल्या कोशिकांपेक्षा बॅक्टेरियांची संख्या अधिक आहे. म्हणून, प्रोबायोटिक पदार्थ म्हणजे दही, लोणचं, तूप आणि घरात तयार केलेले लोणचं पचनसंस्था मजबूत करते.
फायबर्स असलेले पदार्थ
दररोज फायबर्स असलेले पदार्थ सेवन करणे गरजेचे आहे. फळे आणि भाज्या यामध्ये फायबर्स मिळतात. या पदार्थांमुळे चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास मदत होते. तसेच पचनसंस्थेचे चांगले संचालन करण्यास देखील मदत होते. त्यामुळे, बद्धकोष्ठतेची समस्या टळते. सफरचंद, संत्रे, केळी, गोड बटाटा आणि भेंडी या अन्नात नक्कीच समावेश करा.
पूर्ण धान्य
राजगीर, क्विनोआ आणि ओट्ससारखी पूर्ण धान्ये खाणे आवश्यक आहे. यातून आपल्याला फायबर्ससह कार्बोहायड्रेट देखील मिळते. असे अन्न पचनसंस्थेतील अन्नाच्या हालचालीला मदत करते. त्यामुळे, बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून मुक्तता मिळवता येते.
आले
आले केवळ औषधी गुणधर्म असलेले नाही, तर ते पचनशक्तीसाठी देखील फायदेशीर आहे. आले म्हणजेच अद्रक पचनसंस्थेला सक्रिय ठेवते. आले खाल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होते. मात्र, दिवसभरात 4 ग्रॅमपेक्षा जास्त आले खाणे टाळा.
त्रिफला
त्रिफला हे तीन फळांपासून तयार केले जाते, पचनसंस्थेला स्वच्छ ठेवण्यास मदत करते. याच्या अतिरिक्त, यामुळे अॅसिडिटी कमी करणे, भूकेचा वाढवणं, फुगलेले पोट कमी करणे आणि शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे देखील साध्य होते. तसेच, त्रिफला व्हिटॅमिन C चा एक उत्कृष्ट स्रोत आहे.