Health | हिवाळ्यामध्ये सकाळी उठल्यावर जाणवते अंगदुखी, अशी घ्या काळजी!

Cold weather and body aches : थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर अंगदुखीचा त्रास जाणवत असल्याचं आपण पाहिलं असेल. सर्व ऋतुंपैकी फक्त थंडीच्या दिवासांमध्येच असा त्रास का होतो? काळजी कशी घ्यायची जाणून घ्या.

Health | हिवाळ्यामध्ये सकाळी उठल्यावर जाणवते अंगदुखी, अशी घ्या काळजी!
Follow us
| Updated on: Dec 07, 2023 | 4:30 PM

मुंबई : हिवाळ्यात बहुतेक लोकांना सकाळी उठल्यानंतर अंगदुखीसारख्या वेदनांना सामोरे जावे लागते. हवामानातील अचानक बदलामुळे सुस्ती देखील येते. सांधेदुखीचा त्रास असलेल्यांना शारीरीक हालचालींच्या अभावामुळे सांधेदुखीची त्रास दिसून येतो. काहींना थंडीमुळे अस्वस्थता जाणवते जसे की डोकेदुखी. आपली हाडे, दात आणि सांधे यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी व्हिटॅमिन डी महत्त्वाची भूमिका बजावते. हिवाळ्यात त्याच्या कमतरतेमुळे, कॅल्शियम आणि फॉस्फरस योग्यरित्या शोषून घेण्यास शरीराची क्षमता कमी झाल्याने हाडांसंबंधी तक्रारी, फ्रॅक्चर्स, स्नायूंचा कमकुवतपणा दिसून येतो.

या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे दुखतात हाडे

हिवाळ्यात पुरेसा सुर्यप्रकाश नसल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता भासते जी आपल्या हाडांसाठी दुष्परिणाम करते. जेव्हा हवेचे तापमान कमी होते तेव्हा बॅरोमेट्रिक दाब कमी झाल्यामुळे स्नायू आणि ऊतींचा विस्तार होऊन शारीरीक वेदनांसारखी लक्षणे आढळून येतात.  यासंदर्भात आर्थ्रोस्कोपिक सर्जन आणि स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशलिस्ट डॉ. शरीफ दुडेकुला यांनी मार्गदर्शन केलं आहे.

कशी घ्याल काळजी?

थंडीच्या दिवसात उबदार कपडे घाला. नियमित व्यायामाला महत्त्व द्या. यामुळे हाडे आणि स्नायू लवचिक राहण्यासाठी नक्कीच मदत होईल. शरीरातील व्हिटॅमिन डी पातळी तपासून घ्या, व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स सांधेदुखी कमी करण्यात मदत करतात. रोजच्या जीवनात संतुलित आणि पोषक आहाराचा समावेश करा.

गरम पाण्याने अंघोळ करा, उबदार करडे वापरा (हातमोजे, लोकरीचे कपडे आणि पायात मोजे घाला), हीटिंग पॅडचा वापर करा. तुमच्या पाठीवरील तसेच गुडघे आणि नितंबांच्या सांध्यावरील ताण कमी करण्यासाठी संतुलित वजन ठेवा. गरम पेयाचे सेवन करा, पुरेशी झोप घ्या आणि संतुलित आहाराचे सेवन करा.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.