Marathi News Health Include these 5 foods in your diet to eliminate the problem of constipation
Constipation Remedies : बद्धकोष्ठतेमुळे हैराण आहात? तर मग ‘या’ पदार्थांचा आहारात नक्कीच समावेश करा!
बहुतेक लोकांना बद्धकोष्ठतेचा (Constipation Remedies) सामना करावा लागतो आहे. पुरेशा प्रमाणात फायबर आपल्या शरीराला मिळाले नाही की, शक्यतो बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. जर आपण आपल्या आहारामध्ये (Diet) जास्तीत-जास्त प्रमाणात फायबरचा समावेश केला तर ही समस्या नक्कीच दूर होण्यास मदत होईल.
बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय फायदेशीर आहे.
Follow us on
मुंबई : बहुतेक लोकांना बद्धकोष्ठतेचा (Constipation Remedies) सामना करावा लागतो आहे. पुरेशा प्रमाणात फायबर आपल्या शरीराला मिळाले नाही की, शक्यतो बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. जर आपण आपल्या आहारामध्ये (Diet) जास्तीत-जास्त प्रमाणात फायबरचा समावेश केला तर ही समस्या नक्कीच दूर होण्यास मदत होईल. बद्धकोष्ठतेमुळे तुम्हाला दिवसभर सुस्त आणि आजारी वाटते. यादरम्यान भूक न लागणे, डोकेदुखी, पोटदुखी, मळमळ यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. पोट साफ न राहिल्यामुळे अनेक वेळा त्वचेशी संबंधित समस्या जसे पिंपल्स देखील होतात. अशा परिस्थितीत फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. हे पदार्थ (Foods) बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यास मदत करतात.
केळ अत्यंत फायदेशीर
केळीमध्ये अनेक पोषक घटक असतात. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे अपचन आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. केळी तुमच्या पोटाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
काळे मनुके
रात्री भिजवून सकाळी काळे मनुके खाणे खूप फायदेशीर आहे. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. यामध्ये व्हिटॅमिन बी आणि सी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
पाणी
पुरेसे पाणी प्या. अधिकाधिक पाण्याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. पाणी आरोग्याशी संबंधित समस्यांवर मात करण्यास मदत करते. तसेच त्वचा निरोगी राहते.
हिरव्या पालेभाज्या
ब्रोकोली, पालक यांसारख्या हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर फायबर असते. ते फोलेट, व्हिटॅमिन सी आणि के सारख्या पोषक तत्वांनी देखील समृद्ध आहेत. ते आतडे निरोगी ठेवतात. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही या भाज्यांचे सेवन देखील करू शकता.
मुळा
मुळा फायबरने समृद्ध असतो. हे आतड्यासाठी चांगले आहे. तुम्ही याचे अनेक प्रकारे सेवन करू शकता. मुळा तुम्ही सांभर आणि भाज्यांमध्ये देखील वापरू शकता. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.
दही
दह्यामध्ये कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते. प्रोबायोटिक्ससारखे चांगले बॅक्टेरिया दह्यामध्ये आढळतात.