गॅस्ट्रिक कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर खावीत ही फळं

सकाळचे जेवण उशीरा करणे किंवा नाश्ता न करणे यामुळे ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो आणि भविष्यात तुम्हाला गॅस्ट्रिक कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो.

गॅस्ट्रिक कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर खावीत ही फळं
गॅस्ट्रिक कॅन्सरपासून वाचवतील ही फळंImage Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Dec 17, 2022 | 4:56 PM

नवी दिल्ली – थंडीच्या दिवसात गॅस किंवा गॅस्ट्रिक (gastric problem) समस्या होणे हे खूप कॉमन आहे. आजकाल बहुतांश व्यक्तींना हा त्रास होतो. आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी (bad food habits) आणि व्यस्त लाइफस्टाइलमुळे हा त्रास होतो. मात्र ही सवय जास्त दिवस राहिल्यास ॲसिडिटीमुळे गॅस्ट्रिक कॅन्सरचा (gastric cancer) धोका वाढतो. सकाळचे जेवण उशीरा करणे किंवा नाश्ता न करणे यामुळे ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो आणि भविष्यात तुम्हाला गॅस्ट्रिक कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो.

महिला होतात अधिक प्रभावित

गॅस्ट्रिक कॅन्सरचे सर्वात मोठे कारण म्हणजे खराब आहार आणि जीवनशैली. महिलांना गॅस्ट्रिक कॅन्सर होण्याची अधिक शक्यता असते कारण त्यांची जीवनशैली अतिशय व्यस्त असते, तसेच त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळाही पाळल्या जात नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, मिझोराममध्ये गॅस्ट्रिक कॅन्सरची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

हे सुद्धा वाचा

या कारणांमुळे होतो गॅस्ट्रिक कॅन्सर

– फळं, भाज्या कमी खाणे

– धूम्रपान करणे

– खूप खारट अन्नपदार्थ खाणे

– हायपर ॲसिडिटी आणि गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लेक्स डिसीज

संशोधन काय सांगते ?

गॅस्ट्रिक कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी असे काही पदार्थ आहेत ज्यांचे सेवन केल्याने व्यक्तीला या समस्येपासून आराम मिळू शकतो. वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड आणि अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्चच्या अहवालानुसार, स्टार्चशिवाय अधिक भाज्या आणि फळे खाल्ल्यास गॅस्ट्रिक कर्करोगाचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतो.

या पदार्थांचे करा सेवन

पोटाच्या कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी ॲव्हकॅडो, पपईस भोपळा, रताळं, मका, अंड,, पालक अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे. त्याशिवाय तुम्ही संत्रं, मिरची, स्ट्रॉबेरी, ब्रोकोली, बटाटा, सिमला मिरची, टोमॅटो हे व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ खावेत, ज्यामुळे गॅस्ट्रिक कॅन्सरपासून बचाव होऊ शकतो. व्हिटॅमिन सी व कॅरोटेनॉयड्स हे अँटी-ऑक्सीडेंटच्या स्वरूपात कार्य करतात, जे कॅन्सरच्या पेशींची वाढ कमी होते.

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Non Stop LIVE Update
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण.
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात.
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज.
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ.
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन.
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण..
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले....
ठाकरेंच्या या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन
ठाकरेंच्या या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन.
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, 'मातोश्री'बाहेर महायुतीची बॅनरबाजी
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, 'मातोश्री'बाहेर महायुतीची बॅनरबाजी.
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल.